मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. याबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आजपासून सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे सर्व मंत्री आणि पालकमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
Rain Update : पुढील तीन ते चार दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
नागपूर - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन ते चार दिवस विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितले आहे. या काळात विदर्भातील तापमान आणखी कमी होणार आहे. पूर्व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने सांगितले केले आहे. यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, आगामी तीन ते चार दिवस हवामान अस्थिर राहणार आहे. दरम्यान नागपूर साठी
पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Live Update : धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील पेरूची बाग भुई सपाट
धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील पेरूची बाग भुई सपाट
वालवड येथील पाझर तलाव फुटल्याने परिसरातच असलेली बाग भुई सपाट
दिलीप मधुकर मोहिते आणि कैलास मधुकर मोहिते यांची दीड एकरावरील बाग जमीनदोस्त
मदत मिळावी अशीच शेतकऱ्याने व्यक्त केली भावना
Live Update : धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील शेतीमध्ये पाच फुटांचे खड्डे
धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील शेतीमध्ये पाच फुटांचे खड्डे
दुधनी नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या वाहून
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारी ते भूम तालुक्यातील वालवड येथील नुकसानी ची पाहणी करणार आहेत
Rain Update : सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 126 गावांना पुराचा वेढा
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांना पुराचा वेढा
दोन दिवसांत सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रातले पीक वाहून गेले
Rain Update : जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी 9 कोटी 86 लाखांच्या मदतीची घोषणा
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 8 हजार 27 हेक्टर क्षेत्रावरील 17 हजार 332 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने 18 सप्टेंबर रोजी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर अवघ्या 5 दिवसात शासनाने निर्णय देत 23 सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीसाठी जिल्हा करता 9 कोटी 86 लाख 26 हजार 245 रुपयांचा निधी घोषित केला असून लवकरच हा निधी उपलब्ध होणार असल्याने ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Rain Update : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबाचे संसार पाण्याखाली
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबाचे संसार पाण्याखाली
अनेकांची घरं पाण्याखाली बुडाल्याने स्थलांतर करण्यात आलेल्या जागेत राहण्याची वेळ
सणासुदीच्या काळात अशा पद्धतीने राहण्याची वेळ आल्याने ग्रामस्थ हतबल
शिवणी गावातील एक कुटुंब अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्या मुलगी आणि एक पाच वर्षांची मुलगी घेऊन या स्थलांतर करण्यात आलेल्या ठिकाणी राहतायात
गावात झालेली भीषण अवस्था पाहता एका वृद्ध महिलेला पुन्हा गावात जाऊच नये असे वाटतंय
Rain Update : किल्ले रायगड पायरी मार्गावर दगड कोसळून वीज मंडळाच्या डीपीचे नुकसान
रायगड किल्ल्यावर पावसाळ्यात पायरी मार्गावर दगड कोसळण्याच्या घटना वाढल्या असून महादरवाजा परिसरात दगड पडून वीज मंडळाच्या डीपीचे मोठे नुकसान झाले. यामुळे गडावरील काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता, मागील दोन वर्षांत झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ऑगस्टअखेर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, अलीकडील घटनेनंतर शिवभक्त पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून बांधकाम व पुरातत्व विभागाने धोका असलेल्या ठिकाणी सावधानतेचे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Rain Update : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्हा दौऱ्यावर
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्हा दौऱ्यावर, सकाळी साडेआठ वाजता करणार बदनापूरच्या सोमठाणा परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
Rain Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची करणार पाहणी, दोन दिवसांच्या पावसात लाखो हेक्टर शेती पाण्याखाली
Rain Update : पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाचे सर्व 14 दरवाजे उघडले
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या तामसवाडी येथील बोरी धरणाचे सर्व 14 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 12 हजार 642 क्युसेक पाण्याचा बोरी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे
Rain Update : मराठवाड्यात गेल्या 24 तासात राज्यात 6 बळी
मराठवाड्यात गेल्या 24 तासात राज्यात 6 बळी
पावसामुळे पुरात अडकलेल्या 4 हजार 88 लोकांचे स्थलांतर करण्यात आले
लष्कर, एनडीआरएफ-एसडीआरएफकडून 3 हजार 643 लोकांचे शोध घेऊन बचावकार्
नागरिकांचे स्थलांतर
धाराशिव : 182
जळगाव : 231
सोलापूर : 1015
बीड : 1617
परभणी : 578
अहिल्यानगर 465
बचावकार्य
धाराशिव : १८२ (NDRF, लष्कर)
जळगाव : १६० ( स्थानिक प्रशासनाची पथके)
सोलापूर : १०१५ (NDRF, स्थानिक प्रशासन)
बीड : १६१७ (NDRF, स्थानिक प्रशासन)
परभणी : ५७८ ( NDRF, स्थानिक प्रशासन)
अहिल्यानगर : ९१ (SDRF. NDRF, स्थानिक प्रशासन)