IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, पुण्यातील कारभारी बदलले; 4 अधिकाऱ्यांची निघाली ऑर्डर

पुण्यासह गोंदिया, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra IAS Officer Transfer Order:  गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु आहे, जे अजूनही सुरु आहे. गुरुवारी पुन्हा एकदा चार बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह गोंदिया, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. 

HSRP number plates: 'HSRP'नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास...

बदल्यांचे सत्र सुरुच 

समोर आलेल्या माहितीनुसार,  राज्य प्रशासनाने गुरुवारी आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त आणि क्रीडा आयुक्तांसह वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची मुंबईत ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

​डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (२००८ बॅच) यांनी पुणे विभागाच्या आयुक्तपदी राहून अनेक महत्त्वाचे निर्णय मार्गी लावले होते. आता त्यांच्यावर मंत्रालयातील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी आता शीतल तेली-उगळे (२००९ बॅच) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. आता त्या पुणे विभागाच्या नव्या विभागीय आयुक्त असतील.

​दुसरीकडे, वैद्यकीय रजेवर असलेले दीपक सिंगला (२०१२ बॅच) यांची पुण्याच्या क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी वर्णी लागली आहे. विदर्भातही प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनांतम एम. (२०२० बॅच) यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासकीय कामात गती आणण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे समजते.

नक्की वाचा - Purandar News: हातात कोयते घेत टोल नाक्यावर दहशत, बुलेट गँगचा कारनामा समोर, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या? 

१. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (IAS:२००८)
​पूर्वी कार्यरत: विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
​नवीन बदलीचे ठिकाण: सचिव (ग्रामविकास आणि पंचायत राज), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

​२. श्रीमती शीतल तेली-उगळे (IAS:२००९)
पूर्वी कार्यरत: आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, पुणे.
​नवीन बदलीचे ठिकाण: विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.

Advertisement

​३. श्री. दीपक सिंगला (IAS:२०१२)
पूर्वी कार्यरत: वैद्यकीय रजेवर.
​नवीन बदलीचे ठिकाण: आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, पुणे.

​४. श्री. मुरुगनांतम एम. (IAS:२०२०)
पूर्वी कार्यरत: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
​नवीन बदलीचे ठिकाण:अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर.