सुरज कसबे, पुणे:
Mulshi Sikandar Shaikh Mauli Kokate Fight VIDEO: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत शनिवारी रात्री मोठा राडा पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा नामवंत पैलवान सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यातील 11 लाखांची महत्त्वाची कुस्ती वादामुळे निकाली होऊ शकली नाही. सामना अनिर्णित सुटल्याने कुस्तीप्रेमींनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कुस्तीच्या फडात राडा, माऊली कोकाटेचा चिडका मुळशी पॅटर्न
समोर आलेल्या माहितीनुसार, मैदानात सिकंदर आणि माऊली यांच्यात कुस्तीला सुरुवात झाली. निकाल लागेपर्यंत कुस्ती सोडवणार नाही या अटीवर तब्बल एक तास दोघांमध्ये अटीतटीची झुंज सुरू होती. मात्र, तासाभरानंतर कुस्तीत आक्रमकता वाढली. माऊली कोकाटेने सातत्याने मानेवर प्रहार करण्यास सुरुवात केल्याने आखाड्यात तणाव निर्माण झाला.
Sikandar Shaikh: 'रुममधल्या मित्रांनी फसवलं, पार्सल हातात दिलं...', सिकंदर शेखविरोधात मोठं षडयंत्र?
यावरून सिकंदरने माऊलीला जाब विचारला असता, अचानक एका बाहेरील तरुणाने आखाड्यात उडी घेतली आणि सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे आखाड्यात मोठी गर्दी झाली आणि तणाव वाढला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सिकंदरचे गुरू विशाल हारगुले यांनी स्वतः मैदानात उतरून मध्यस्थी केली.
मुळशीमध्ये राडा... सिकंदर शेखवर हल्ल्याचा प्रयत्न... pic.twitter.com/i8JMMsUhxn
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) February 20, 2026
कुस्तीप्रेमींमध्ये संताप, कारवाईची मगाणी
गोंधळ शांत झाल्यानंतर पुन्हा कुस्ती लावण्यात आली, परंतु बराच वेळ होऊनही निकाल लागत नसल्याने पंचांनी अखेर ही कुस्ती बरोबरीत सोडवली. दोन्ही पैलवानांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुस्ती प्रेमींच्या मते, माऊली कोकाटेने कुस्ती करण्याऐवजी मारामारीचा पवित्रा घेतला होता.
तसेच, ज्या तरुणाने मैदानात घुसून सिकंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता कुस्ती क्षेत्रातून होत आहे. एवढ्या मोठ्या गोंधळात सिकंदर शेखने संयम राखल्याने अनर्थ टळल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कुस्तीच्या फडात येऊन मल्लावर हात उचलल्याने खेळाला गालबोट लावलं आहे.
Pune Bhigwan Case: भिगवण प्रकरणात मोठा ट्वीस्ट! तरुण- तरुणी पोलिसात हजर; मुलीने सत्य सांगितलं...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world