देवा राखुंडे, पुणे:
Bhigwan Girl Kidnapping Case Update: गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. याप्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून पिडीत तरुणी आणि तरुण पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
भिगवण प्रकरणातील तरुण- तरुणी पोलिसात हजर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण प्रकरणातील तरुणी आणि अपहरणाचे आरोप असलेला तरुण दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. रात्री दीड वाजता दोघेही स्वतः बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. तब्बल 50 तासानंतर या तरुणीचा तपास लागलेला आहे. विशेष म्हणजे या मुलीने व्हिडिओद्वारे जी भूमिका मांडली होती त्याच भूमिकेवरती ही तरुणी ठाम असल्याची माहिती आहे. माझ्या प्रेम प्रकरणाबाबत घरी माहिती होती, मात्र दुसरीकडे लग्न ठरल्याने पळून गेले, असं मुलीने सांगितल्याचे समोर आले आहे.
Pune News : भिगवणमधील वातावरण चिघळलं; अपहरण झालेल्या मुलीचा Video समोर आला अन् प्रकरणात मोठा ट्विस्ट
तरुणी भूमिकेवर ठाम..?
मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार भिगवन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. भिगवण बाजारपेठ परिसरातून तरुणी आई अन् भावासोबत आली असताना तिचे अपहरण करण्यात आले, मारहाण करुन तिला पळवण्यात आले अशी तक्रार करण्यात आली होती.
याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. अशातच तरुणीने माझं मुलावर प्रेम आहे. मी स्वतःहून त्याच्यासोबत गेली आहे माझं अपहरण झालं नाही अशी भूमिका मांडली होती, ज्यामुळे या प्रकरणात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला होता.
Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world