जाहिरात

Sikandar Shaikh: 'रुममधल्या मित्रांनी फसवलं, पार्सल हातात दिलं...', सिकंदर शेखविरोधात मोठं षडयंत्र?

Maharashtra Kesari Sikandar Shaikh Arrest Case: सिकंदरला १४ थार, १० बुलेट आणि ४० म्हशी बक्षीस म्हणून मिळाल्या आहेत. एवढं सर्व असताना गुन्ह्यात सहभागाचा आरोप हास्यास्पद आहे. असंही उमेश पाटील म्हणालेत. 

Sikandar Shaikh: 'रुममधल्या मित्रांनी फसवलं, पार्सल हातात दिलं...', सिकंदर शेखविरोधात मोठं षडयंत्र?

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी:

Maharashtra Kesari Sikandar Shaikh Arrest Case: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी तसेच पपला गुर्जर गँग कनेक्शन उघडकीस आल्याने सिकंदर शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र माझ्या मुलाला फसवण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकतं असा संशय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले उमेश पाटील?

महाराष्ट्राचा अभिमान सिकंदर आणि मी एका गल्लीत, एका गावात राहिलो आहोत. त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी व्यक्तिशः ओळखतो. हमाली करणाऱ्या वडिलांनी मुलाला जागतिक दर्जाचा पैलवान बनवले. आज त्याला शस्त्रास्त्र प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मराठी पैलवानाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांनी केलेलं षडयंत्र असू शकते, असं उमेश पाटील म्हणालेत. 

कुस्तीचा किंग ते शस्त्र तस्कर.. सिकंदर शेख कसा अडकला? वाचा कुख्यात गँग कनेक्शन

'महाराष्ट्राच्या पैलवानाला अडकवण्याचे षडयंत्र'

सिकंदर शेखने पंजाब-हरियाणातील शेकडो पैलवानांना चितपट केलं आहे सिकंदर शेख हा वर्षभरात ४०० ते ५०० कुस्त्या खेळतो. ९९ टक्के तो कुस्ती जिंकतोच. यामधून त्याचे वार्षिक उत्पन्न ४ ते ५ कोटी रुपये इतके आहे. सिकंदरला १४ थार, १० बुलेट आणि ४० म्हशी बक्षीस म्हणून मिळाल्या आहेत. एवढं सर्व असताना गुन्ह्यात सहभागाचा आरोप हास्यास्पद आहे. असंही उमेश पाटील म्हणालेत. 

'मित्रांनीच सिकंदरला फसवलं'

"पंजाबमध्ये सिकंदर शेख ज्या खोलीत भाड्याने राहत होता, तिथे आणखी २- ३ जण राहत होते. सिझन संपल्यानंतर सिकंदर शेख महाराष्ट्राकडे निघाला होता. त्या रुमधील मित्रांनी आमचं एक पार्सल पोहोच करायचे आहे तेवढं दे.. असं सांगितले. सिकंदरला त्या पार्सलमध्ये काय आहे? हे माहितीच नव्हतं आणि तो फसला. ही माहिती आमच्या आणि पोलिसांच्या स्तरावरून मिळालेली आहे," असा खळबळजनक दावा करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली आहे. 

Sikandar Shaikh: महाराष्ट्र 'केसरी' चा बळी? सिकंदर शेखच्या अटकेनंतर वडिलांचा खळबळजनक आरोप

दरम्यान, पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर आता कोल्हापूर पोलीसही या प्रकरणाचा तपास करणार आहे. सिकंदर शेखचे रेकॉर्ड पोलीस तपासणार आहेत. शस्त्र तस्करी प्रकरणात कोल्हापूरशी कोणता संपर्क आला का याचाही शोध घेतला जाणार आहे. याप्रकरणी सिकंदरच्या मित्रांचीही चौकशी होण्याची शक्यता  असून  कोल्हापूर पोलीस दलाकडून शोध घेण्याचं काम सुरु आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com