जाहिरात

Sikandar Shaikh Arrested: कुस्तीचा किंग ते शस्त्र तस्कर.. सिकंदर शेख कसा अडकला? वाचा कुख्यात गँग कनेक्शन

Maharashtra Kesari wrestler Sikandar Shaikh News: ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sikandar Shaikh Arrested: कुस्तीचा किंग ते शस्त्र तस्कर..  सिकंदर शेख कसा अडकला? वाचा कुख्यात गँग कनेक्शन

Maharashtra Kesari Sikandar shaikh Arrest Case: कुस्ती क्षेत्राला हादरवुन टाकणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटून सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक केल्याने कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेख याच्यावर पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने  पपला गुर्जर टोळीशी त्याचे कनेक्शनही उघड झाले आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा... 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

समोर आलेल्या माहितीनुसार,  मोहाली पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्रपुरवठा  करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मोहालीच्या सीआयए पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत या टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच अवैध बंदुका  जप्त करण्यात यश मिळवले आहे. या अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चार  ३२ बोरच्या पिस्तुल आणि एक ४५ बोरची पिस्तुल, जिवंत काडतुसे  रोख रक्कम आणि दोन लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले दानवीर आणि बंटी हे दोघे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्रे पुरवण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीआयए पथकाने या माहितीच्या आधारे सापळा (Trap) रचला आणि तिघांनाही शस्त्रांसह अटक केली. अधिक चौकशी केल्यानंतर ही शस्त्रे मोहालीच्या नव्या गावातील रहिवासी कृष्णकुमार ऊर्फ हॅपी गुर्जर  याला पुरवली जाणार होती, हे उघड झाले. पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News : भरदिवसा प्रसिद्ध कबड्डीपट्टूची गोळ्या झाडून हत्या! मित्रांच्यासोबत गेला अन् नको ते घडलं..

सिकंदर शेखची भूमिका काय? 

सिकंदर शेख हा “फ्रंट” म्हणून काम करत होता. त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा आणि पैलवान म्हणून राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा फायदा घेऊन शस्त्र खरेदी-वितरण करत होता. सध्या तो कुस्तीच्या सरावासाठी मुल्लानपूर गरिबदास (मोहाली) येथे राहत होता. पोलिसांच्या कारवाईमध्ये पपला गुज्जर गँग  ही हरियाणा-उत्तर प्रदेश-राजस्थानमध्ये काम करणारी हत्येचे, दरोड्याचे, शस्त्र कायद्याचे गुन्हे असलेली टोळीशी कनेक्शन उघड झाले. दुर्दैवी म्हणजे सिकंदरला पंजाबमध्ये कुस्तीत यश मिळले, पण तिथेच गुन्ह्यात अडकला. 

Sikandar Shaikh: 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख लग्नाच्या बेडीत! लाल मातीतील बादशहाला चितपट करणारी सुंदरी कोण?

कोण आहे सिकंदर शेख? Who is Sikandar Shaikh

सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा राहणारा असून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल आहे. 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला मानाची कदा पटकावता आली नाही. मात्र त्यानंतर त्याने 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा उंचावली ज्यानंतर तो चर्चेत आला. हमालाचा पोरगा ते कुस्तीच्या मैदानातील किंग अशी त्याची खास ओळख आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com