जाहिरात

Crime News : भरदिवसा प्रसिद्ध कबड्डीपट्टूची गोळ्या झाडून हत्या! मित्रांच्यासोबत गेला अन् नको ते घडलं..

Kabaddi Player Tejpal Singh Murder : पंजाबच्या लुधियानामध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका कबड्डी खेळाडूची भरदिवसा गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे.

Crime News :  भरदिवसा प्रसिद्ध कबड्डीपट्टूची गोळ्या झाडून हत्या! मित्रांच्यासोबत गेला अन् नको ते घडलं..
Kabaddi Player Tejpal Singh
मुंबई:

Kabaddi Player Tejpal Singh Murder : पंजाबच्या लुधियानामध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका कबड्डी खेळाडूची भरदिवसा गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. हत्येची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. तेजपाल सिंह (26) असं हत्या झालेल्या कबड्डीपटूचं नाव आहे. पोलीस या हत्या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. एसएसपी कार्यालयाच्या बाहेरच हा हत्याकांड झाल्यानं जगराव येथील ग्रामस्थांना धक्का बसला आहे. आपापसातील वादविवाद प्रकरणामुळे ही हत्या घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

त्या ठिकाणी तेजपालला गोळ्या का मारल्या?

पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे की, तेजपाल सिंह त्यांच्या काही मित्रांसोबत हरी सिंह रोड येथील फॅक्ट्रीजवळ जात होता. याच दरम्यान आपापसातील वादामुळे काही मुलांनी त्या ग्रुपला घेराव घातला आणि नंतर त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. वाद इतका विकोपाला गेला की, एका आरोपीने बंदूक काढून तेजपाल सिंहला गोळ्या मारल्या. घटना घडल्यानंतर जखमी तेजपालला तातडीनं रुग्णलयात दाखल करण्यात आलं. पंरतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या हत्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून छापेमारीही सुरु करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> RRB Jobs 2025 रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना येथील जगराव येथे कबड्डी खेळाडू तेजपाल सिंहची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. या हत्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. दोन ग्रुपमध्ये झालेल्या हाणामारीत तेजपालचा खून झाला. आरोपींपैकी एकाने रिव्हॉल्वर काढून तेजपालवर फायरिंग केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तेजपालला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचार घेण्याआधीच डॉक्टरांनी तेजपाल मृत झाल्याचं सांगितलं. 

नक्की वाचा >> Video: पालकांनो! आत्ताच अलर्ट व्हा..डायपर घातल्याने मुलांची किडनी खराब होते? चाईल्ड स्पेशलिस्टने जे सांगितलं..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com