जाहिरात

Sikandar Shaikh: 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख लग्नाच्या बेडीत! लाल मातीतील बादशहाला चितपट करणारी सुंदरी कोण?

Maharashtra Kesari Sikandar Shaikh Wedding: रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरीसारखे मानाचे किताब पटकावणारा मल्ल सिकंदर शेख विवाह बंधनात अडकला आहे.

Sikandar Shaikh: 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख लग्नाच्या बेडीत! लाल मातीतील बादशहाला चितपट करणारी सुंदरी कोण?

Sikandar Shaikh Wedding: महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू, रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरीसारखे मानाचे किताब पटकावणारा मल्ल सिकंदर शेख विवाह बंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर कुस्तीशौकिनांसह, सिकंदर शेखच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा प्रसिद्ध कुस्तीपटू, लाल मातीतील नावाजलेला मल्ल सिकंदर शेख आता विवाह बंधनात अडकला आहे. स्वतः सिकंदर शेखने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. नायरा शेख असे सिकंदरच्या पत्नीचे नाव आहे. नायरासुद्धा सिकंदरप्रमाणेच मल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मी विवाहबद्ध होत आहे आणि मला आनंद आहे की मी माझे आयुष्य माझ्या प्रिय मुलीसोबत घालवणार आहे, म्हणून माझा नवीन जीवन प्रवास सुरू झाला आहे. ती माझ्या दुःखात आणि माझ्या आनंदात असते. ती माझी जीवनसाथी आहे, जी नेहमीच मला सांत्वन देते. मी त्यात खूप आनंदी आहे, असे सिकंदरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

नक्की वाचा - Sudhakar Pathare: तेलंगणात अपघाती निधन झालेले आयपीएस सुधाकर पठारे कोण?

पैलवान सिकंदर शेखने याआधीही नायराचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही घोडेस्वारी करताना दिसले होते. त्या पोस्टमध्येही सिकंदरने तिचा बायको असा उल्लेख केला होता. माझ्या वाईट काळात माझ्या हाताला हात धरणारी मला सावरणारी येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जाणारी आत्मविश्वास देणारी एकमेव ती च होती. असं म्हणतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक सल्लागार असतो मार्ग दाखवणारा असतो तसेच माझ्या आयुष्यात माझ्या बायकोच्या रुपात माझ्या आयुष्याचा सल्लागार माझी बायको... असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.

दरम्यान, सिकंदर शेख हा गरीब कुटुंबातून आलेला आणि लाल मातीत कुस्ती मारत एक नावाजलेला मल्ल आहे. देशभरातील मानाच्या कुस्त्यांच्या मैदानात मोठमोठ्या मल्लांना चितपट करत सिंकदरने नाव कमावले. त्याने 2024 चा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचाही पराक्रम केला. त्यापाठोपाठ रुस्तम ए हिंद केसरीची गदाही उंचावली. म्हणूनच सिकंदर शेख कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत मानला जातो. 

Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप