5 months ago
मुंबई:
Monsoon Session of Maharashtra Legislature :विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून पेपर फुटीच्या विरोधात महाविकास आघाडी नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज विधान परिषदेच्या चार जागांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे. 
Jul 01, 2024 14:45 (IST)

नागपूर-दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाला यश, अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती

Jul 01, 2024 13:09 (IST)

मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला, उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 5,800 मतं लागणार

मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला, उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीचे 5,800 मतं लागणार

Jul 01, 2024 11:55 (IST)

नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणीदरम्यान तीन मतं जास्त

नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणीदरम्यान 22 नंबर टेबलवर तीन मते जास्त आढळल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी आक्षेप नोंदवला असून चौकशीची मागणी केली आहे 

Jul 01, 2024 11:40 (IST)

पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार, फडणवीसांचा मोठी घोषणा

पेपर फुटी विरोधातील कायदा याच अधिवेशनात आणणार, फडणवीसांचा मोठी घोषणा

पेपर फुटी प्रकरणात विधानसभेत कोण काय म्हणालं?

रोहित पवार - 

तलाठी भरतीच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी गोंधळ झाला आहे. पेपर फुटी विरोधातील कायदा याच अधिवेशनात आणणार का? 

देवेंद्र फडणवीस - 

दोन वर्षात एक लाखपेक्षा जास्त भरती. या राज्य सरकारने भरती पारदर्शी पद्धतीने करून दाखवली. तुमच्या सर्व चांगल्या सूचना मान्य. शिक्षण, ऊर्जा, म्हाडा, औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागांमध्ये भरती झाली. सर्व विभागात पारदर्शी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. तलाठी भरतीसंदर्भात पेपर सेट करणाऱ्यांचे उत्तर चुकले होते. त्यामुळे परीक्षा रद्द केली आणि पुन्हा घेण्यात आली. एका वर्षात एक लाख नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने देण्यात आल्या. विरोधकांकडून पेपर फुटी तयार झाल्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कमी वेळात इतक्या नियुक्त्या दिल्या जाणार हा रेकॉर्ड आहे. केंद्राने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने पेपर फुटीसंदर्भात कायदा करण्याचा विचार, चर्चा सुरू आहे. याच अधिवेशनात हा कायदा आणणार आहोत.


Advertisement
Jul 01, 2024 11:29 (IST)

एका वर्षात एक लाखापेक्षा जास्त भरती - देवेंद्र फडणवीस

एक वर्षात एक लाखापेक्षा जास्त भरती. या राज्य सरकारने भरती पारदर्शी पद्धतीने करून दाखवली. तुमच्या सर्व चांगल्या सूचना मान्य. शिक्षण, ऊर्जा, म्हाडा, औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागांमध्ये भरती झाली. सर्व विभागात पारदर्शी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या.  - देवेंद्र फडणवीस

Jul 01, 2024 11:23 (IST)

गट क च्या जागांसाठी एमपीएससीमार्फत परीक्षा, फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

बाळासाहेब थोरातांच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पेपर फुटी कोणाच्या काळात झाली?  मात्र मला राजकारण करायचे नाही. तलाठी भरतीत पेपर फुटला नाही परीक्षेत उत्तर चुकले त्यावरून रद्द केली. आता या आधी टीसीएस केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. संख्या जास्त असल्यामुळे इतर केंद्र ठेवली जात. 

घोटाळ्याविना ७७ हजारांहून अधिक जणांना नोकऱ्या दिल्या. गट क च्या जागा एमपीएससीकडे वर्ग करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यामुळे एमपीएससी या जागेसाठी परीक्षा घेणार आहे. पुढील सहा महिन्यात याची प्रक्रिया सुरू पूर्ण होईल, असंही फडणवीस म्हणाले. 

Advertisement
Jul 01, 2024 11:18 (IST)

रिक्त पदं कधी भरणार? बाळासाहेब थोरातांचा सवाल

स्पर्धा परीक्षा झाल्या, मात्र अद्यापही भरती झालेली नाही. रिक्त पदं कधी भरणार? असा सवाल बाळासाहेब थोरात विधानसभेत उपस्थित केला.