जाहिरात

महाराष्ट्रात मद्यप्रेमींचा ट्रेंड बदलला; विदेशी दारूला सारलं दूर; 'या' पेयाचा वर्षभरात 46 कोटी लिटर खप

महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे देशीचा खप सर्वाधिक होतो. मात्र देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमी नाराज झाले आहेत.

महाराष्ट्रात मद्यप्रेमींचा ट्रेंड बदलला; विदेशी दारूला सारलं दूर; 'या' पेयाचा वर्षभरात 46 कोटी लिटर खप

Maharashtra Beer Consumption record : काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना अतिरिक्त पैसे खर्च करून दारू खरेदी करावी लागत आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे देशीचा खप सर्वाधिक होतो. मात्र देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात तीन ते चारपट वाढ केल्याने मद्यप्रेमी नाराज झाले आहेत. अखेर त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवल्याचं दिसून येत आहे. 

राज्यात बिअरच्या मागणीत वाढ...

देशी आणि विदेशी मद्यावरील शुल्कवाढीमुळे मद्यपींनी आपला मोर्चा बिअरकडे वळवला आहे. परिणामी राज्यात बिअरचा खप वाढल्याचं दिसून येत आहे. उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते. मात्र यंदा ही मागणी गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचं चित्र आहे.

एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात ४६ कोटी १३ लाख लिटर बिअरची विक्री झाली. २०२५ या वर्षात भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा खप ३२ कोटी लिटर  होता. जो या वर्षी २७ कोटी लिटरवर घसरला आहे. तुलनेत ३८ कोटी लिटर खप असलेली बिअर मात्र यंदा ४६ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी ४० कोटी लिटर खप असलेली देशी दारूची विक्री यंदा ४२ कोटी लिटरवर पोहोचली आहे. गेल्या ११ महिन्यात बिअरच्या खपाचे आकडे वाढतच असल्याचं दिसून येत आहे. 

उत्पादन शुल्क २९,९५७ कोटींवर...

२०२५ या वर्षात चार प्रकारच्या मद्यावरुन उत्पादन शुल्कातून महाराष्ट्रात तब्बल २५ हजार ४६७ कोटी रुपये मिळाले होते. यंदा यामध्ये १८ टक्के वाढ झाली असून उत्पादन शुल्काचा आकडा २९ हजार ९५७ कोटींवर पोहोचला आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com