जाहिरात
1 day ago

Maharashtra LIVE Blog: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून मुंबई, पुण्यामध्ये असणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. मुंबईमधून कोकणवासियांनी गावी जाण्यासाठी बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर गर्दी केली असून विकेंडमुळे रस्त्यांवरही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यामध्येही गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Live Update : शिंदेंच्या संगमनेर सभेत अतिउत्साही कार्यकर्तांना पोलीसांकडून लाठीचा प्रसाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगरच्या संगमनेर दौ-यावर आहेत.. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळालीये.. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केल्याच दिसून आलय. संगमनेर मधील जाणता राजा मैदान वर आमदार अमोल खताळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेच आयोजन केल.. शहरातून रॅली काढून सभे स्थळी आली असता आत जाण्याचा प्रयत्न करणा-या काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी चोर दिलाय. सुरक्षाच्या कारणास्तव हा लाठीचार्ज करावा लागल्याचं सांगितलं जात असून अति उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलीसांनी हा प्रयत्न केलाय.

Live Update : इंदूर - पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प, मनमाड शहरात लांबच लांब रांगा

नाशिकच्या इंदूर-पुणे महामार्गावर अंकाईजवळ एक कंटेनर पलटी झाल्याने येवला - मनमाड रोडवर वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती,जवळपास  10 ते 15 किलोमीटर अंतरावर वाहनाच्या रांगा लागल्या आहे,काल संध्याकाळी उशिरा कंटेनर बाजूला काढण्यात आला मात्र वाहतूक धिम्या गतीने सुरू झाली असली तरी अद्याप वाहतूक सुरळीत सुरू झालेली नाही,त्यातच अनेक वाहनधारक रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये वाहन लावून उभी राहल्याने वाहतुक सुरळीत होण्यात अडचणी होत आहे त्यामुळे मनमाड शहरातील  स्थानिक नागरिकांना आपली वाहने घेऊन जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सातत्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन जाम होत असल्याने अवजड वाहन धारकांसाठी बायपास करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा 

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना

- सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत

- मोहोळ तालुका भाजपच्यावतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आलेय

- यावेळी भाविकांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला

Live Update : लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर चोरांचा डल्ला

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. लहान–मोठ्या चोऱ्यांसह देवणी, भादा, किल्लारी आणि नांदेड जिल्ह्यातील बारड येथील साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधील महत्वाच्या वस्तू चोरीस गेल्याने औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरील गुन्हेतील लाखो रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.. साखर कारखान्यांसारख्या महत्त्वाच्या उद्योगांवरही चोरट्यांचा डोळा लागतोय, ही बाब नक्कीच धक्कादायक आहे. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे.

Live Update : कोल्हापुरातील 21 फुटी महागणपतीचा जल्लोषात आगमन सोहळा

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या 21 फुटी महागणपतीचा आगमन सोहळा पार पडला.  ढोल ताशांचा गजर, आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, मोरया मोरया... असा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात बाप्पाचं आगमन करण्यात आलं. महागणपती पाहण्यासाठी दसरा चौकात भक्तांनी मोठी गर्दी केली होती. येत्या बुधवारी गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे.

Live Update : शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर?

शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर?

पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाला दोघे नेते एकत्र येणार?

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान सुद्धा राहणार उपस्थितीत

पिंपरी चिंचवडमधील हॉटेलमध्ये अधिवेशनाचे आयोजन

सकाळी १० वाजता अधिवेशनाला होणार सुरुवात

Live Update : अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, कार्यालय आणि रुग्णालयाचे उद्घाटन

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, कार्यालय आणि रुग्णालयाचे उद्घाटन

अजित पवारांच्या हस्ते विवीध आस्थापनांचं पुण्यात उद्घाटन

अजित पवार करणार कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि रुग्णालयाचे उद्घाटन

Live Update : जळगाव अहमदाबाद विमान सेवेचे बुकिंग पुन्हा सुरू

जळगावहून अहमदाबाद विमानसेवा तांत्रिक कारणास्तव 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आली होती. मात्र आता पुढील आठवड्यापासून अलायन्स एअर या कंपनीकडून जळगाव अहमदाबाद बुकिंग सुरू करण्यात आले असून त्यामुळे 28 ऑगस्ट पासून जळगाव अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदाबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे..

Live Update : गणपतीसाठी कोकणवासीयांची गावी जाण्यासाठी लगबग, वसई विरारमधून अडीच ते तीन हजार एसटी बस होणार रवाना

बाप्पाच्या आगमनाची सध्या लगबग जोरात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणासाठी कोकणवासीय कोकणात आपल्या गावाकडे निघाले आहेत.  वसई विरार नालासोपारा या भागात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहत असून गणपती निमित्त गावी जाण्यासाठी आतूर झाले आहेत. वसई विरार नालासोपारा परिसरातून जवळपास अडीच ते तीन हजार एसटी बस गाड्या गणपती सणानिमित्त कोकणात जात असतात.

Live Update : सोन्याच्या दरात एका दिवसात एक हजारांची तर चांदीच्या दरात एकाच दिवसात तीन हजारांची वाढ

सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात एकाच दिवसात 3 हजार रुपयांची वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर जीएसटी विना 1 लाख 600 कृपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे दर 1 लाख 3 हजार 618 रुपयांवर पोहोचले आहे . सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला असून जीएसटीविना चांदीचे दर 1 लाख 18 हजार रुपयांवर तर जीएसटी सह चांदीचे दर 1 लाख 21 हजार 540 रुपयांवर पोहोचले आहे. फेडरल बँकेच्या बैठकीत व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्याने सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाल्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

Live Update : आणखी एका गोविंदाचा रुग्णालयात मृत्यू

आमदार सुनील राऊत यांनी बांधलेल्या 25 लाखाच्या हंडीत एक गोविंदा खाली कोसळला होता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. विक्रोळीत आमदार सुनील राऊत यांनी लावलेल्या 25 लाखाच्या हंडीत पवईमधील गोखले नगर गोविंदा पथकातील आनंद सुरेश दांडगे हा गोविंदा चौथ्या थरावरून ट्रीपला एका घेऊन उतरताना खाली कोसळला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जवळील सुश्रुषा या खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते मात्र त्याचा आता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे 

Live Update : ट्रकची दुचाकीला धडक; पैठणच्या युवकाचा मृत्यू: एक जण गंभीर

छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील कातपूर फाट्याजवळ पुलावर मालवाहू ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे,तर सोबतचा एक जण गंभीर जखमी झाला. महेश पांडुरंग शेंबडे असे मयताचे नाव असून, अनिल कानाडे हे गंभीर जखमी आहेत. महेश शेंबडे व अनिल कानाडे हे दोघेही श्रीराम फायनान्स कंपनीत काम करीत होते. शनिवारी ते वसुलीसाठी पिंपळवाडी परिसरातून दुचाकी ने परत येत होते. दरम्यान कातपूर फाट्याजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की महेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल हे गंभीर जखमी झाले याप्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा केली.

Live Update : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची आज निर्णायक बैठक, हजारोंच्या संख्येने समाज बीडमध्ये दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा पुन्हा तीव्र होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मांजरसुंबा येथे निर्णायक बैठक होत आहे. या बैठकीतून सरकारला ठोस इशारा दिला जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करण्यापूर्वी होणारी ही सभा मराठा समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. जिल्हाभरातून हजारो समाज बांधव आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. विशेष म्हणजे ही शेवटची निर्णय बैठक देखील मानली जाणार आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com