देशभरात सध्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. विविध पर्यटनस्थळे, कार्यालये तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहेत. या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले गेले आहे.
LIVE Update: मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
लातूर :मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
प्रताप सरनाईक यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची मुंबईला जाण्यावरून चर्चा
मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम
जमलेल्या मराठा बांधवांनी केली जोरदार घोषणाबाजी
मंत्री प्रताप सरनाईक निघाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी
आता कुठे जायचे मुंबईला जायचे म्हणत मराठा बांधवांच्या जोरदार घोषणा
LIVE Update: महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मागे
महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मागे
राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठ एकत्रितपणे हाय पावर कमिटीकडे हे प्रकरण सोपवणार
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल न करता हाय पावर कमिटीने त्यावर निर्णय द्यावा अशी मठ आणि वकिलांकडून भूमिका
सर्वोच्च न्यायालयात जर प्रकरण गेलं तर ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता असल्याने हा निर्णय
आज आणि उद्या दोन दिवस वकिलांची टीम हायपावर कमिटीसोबत चर्चा करणार
LIVE Updates: पुणे विद्यापीठात विद्यार्थी पुन्हा आक्रमक, कॅरी ऑन च्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी धडकले विद्यापीठात
पुणे विद्यापीठात विद्यार्थी पुन्हा आक्रमक
कॅरी ऑन च्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी धडकले विद्यापीठात
कुलगुरूंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात केला जात आहे घोषणाबाजी
मागील ८ जुलैपासून सुरू असलेल्या कॅरी ऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला मात्र दीड महिना उलटूनही कुठलाही निर्णय देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.
2 वेळेस मोठी आंदोलन झाली
विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि भविष्य वाचवण्यासाठी वेळ नाही
LIVE Update: शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणाची ८ ऑक्टोबरला सुनावणी
शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, १४ जुलै २०२५ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण २० ऑगस्ट २०२५ रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी ८ ऑक्टोबर २०२५, बुधवारी पुन्हा होणार आहे.
LIVE Updates: सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी गयाबाई तोबरे यांची बिनविरोध निवड
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, या निवडीनंतर उधळण उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. पूर्वीचे उपसरपंच वैशाली मल्हारी शिद यांनी स्वच्छ राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती
LIVE Update: चिखल तुडवून अंतयात्रा स्मशानापर्यंत नेण्याची ग्रामस्थांवर वेळ
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पिळोदा खुर्द या गावात अंत्यविधीसाठी अंतयात्रा स्मशानभूमीत घेऊन जाण्याकरता अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत असून स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखल तुडवून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागत आहे. स्मशानभूमीपर्यंत रस्ता करावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मागणी करत असून देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे..
live Update: आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची ‘केस बंद’
आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची ‘केस बंद’
पोलिसांकडून न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट सादर
वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिला दुजोरा
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
या प्रकरणाच्या तपासाची ‘फाईल’ पोलिसांनी बंद केली असून न्यायालयात ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर करण्यात आला आहे
अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचे समोर आले होते
ऋषिराज हे मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे समोर आले होते
प्रकरणाचा सर्व उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत न्यायालयाला ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर केला
LIVE Updates: मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता?
मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता?
आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस मध्ये काही बदल होण्याच्या शक्यता
सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याचा चर्चा आहेत
वारंवार वर्षा गायकवाड यांच्याकडून पक्षातील विशेष म्हणजे मुंबईतील कमांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नेत्यांची आहे
मंगळवारी प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेत्यांनी पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली आहे
LIVE Updates: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगांची विद्युत रोषणाई
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी तिरंगा रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचे संत नामदेव पायरी महाद्वार , विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे शिखर आणि विठ्ठलाचा सभा मंडप अशा सर्वच ठिकाणी तिरंगा रंगांची सजावट केल्याने विठ्ठल मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. पंढरपुरात श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची गर्दी असतानाच तिरंगा रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे मंदिर अधिक खुलून दिसत आहे.
Mumbai Rain: मुंबईत पावसाला सुरुवात
मुंबईत रात्रीपासून पाऊस पडत आहे
मोठ्या विश्रांती नंतर पावसाचं आगमन झालं आहे
हवामान दिललेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हा पाऊस असाच राहणार आहे
LIVE Updates: पूरग्रस्त भागांची आमदार सुमीत वानखडेंनी केली तात्काळ पाहणी
पूरग्रस्त भागांची आमदार सुमीत वानखडेंनी केली तात्काळ पाहणी
आर्वीमध्ये भर पावसात पोहचले आमदार सुमीत वानखडे पुराच्या घटनास्थळी
पाण्याचा ओघ जास्त असलेल्या भागांतील नागरिकांना दिला दिलासा
नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नसल्याचे दिले वचन
LIVE Updates: जळगाव महापालिकेवर करण्यात आली तिरंग्याची विद्युत रोषणाई
79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवर आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली असून 17 मजली महापालिकेच्या इमारतीवर करण्यात आलेल्या विद्युत रचनेमुळे संपूर्ण परिसर हा उजळून निघाला आहे.
LIVE Updates: सर्विस रोडवर पथ दिव्याचा खांब कोसळला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा उघड
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तरसोद ते पाळधी दरम्यान बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण झाले असून मात्र या बाह्यवळण मार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलावर असलेल्या पथदिव्याचा खांब सद्यस्थितीत वाहतूक सुरू असलेल्या सर्विस रोडवर अचानक कोसळला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मुदतीच्या आत बाह्यवळण मार्गाचे काम घाईघाईत केले असून त्यामुळे या बाह्यवळण वर्गाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.