जाहिरात
3 months ago

राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ओबीसी मतदारांची नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये लवकरच धनंजय मुंडेंना स्थान दिले जाणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंकडे नव्याने कोणते खाते दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

Live Update : वाहनांची शो रुम खचली, 3 जणांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातल्या आरोमोरी येथील हिरो कंपनीच्या टू व्हीलर वाहनांच्या  शोरूमची इमारत खचली. या दुर्घटनेत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणखी काही जण इमारतीमध्ये अडकल्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.  

Live Update : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, 4 आरोपींना पोलीस कोठडी

भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे अपहरण प्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर  आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती आरोपींच्या वकिलानं केली. त्यानंतर न्यायालयानं आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

LIVE Updates: महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईविरोधात सर्व धर्मीय जनआक्रोश मोर्चा

: छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण करवाई विरोधात आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून भव्य जन आदर्श महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व धर्मीय,सर्व पक्षीय, आंबेडकरी,संविधान वादी आणि समतावादी व मानवतावादी संघटनांनी  या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चात सहभागी झाले असून क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुरू असलेली बोललो तर कारवाई तात्काळ थांबवावी आणि आणि अतिक्रमण बाधितांना तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

LIVE Update: ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत...

ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत...

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाची ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेला पत्र...

शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवाजी पार्कच्या परवानगीवरून राजकारण झालं होत

यानंतर सावध भूमिका घेऊन गेल्या दोन वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसऱ्याच्या सहा ते सात महिने अगोदर पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करत आहे

यावेळी देखील जानेवारी महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्कची परवानगी मिळावी म्हणून पत्र देण्यात आलं असल्याची सूत्रांची माहिती

2 ऑक्टोबर रोजी दसरा असून उद्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे...

LIVE Updates: कोथरुडमधील गोल्डन बेकरीला पहाटे आग

पहाटे साडेचार वाजता कोथरूड, सुतार दवाखान्यानजीक असणाऱ्या गोल्डन बेकरीत आग; आतमध्ये अडकलेल्या सहा जणांची स्थानिक नागरिकांकडून सुटका केल्याची प्राथमिक माहिती तर अग्निशमन दलाची पाच वाहने दाखल होत तेथे वरील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या सुमारे तीस रहिवाशांना सुरक्षित बाहेर घेत आगीवर नियंत्रण. बेकरीमधून वेळीच जवानांनी सहा सिलेंडर बाहेर घेतल्याने धोका टळला.

LIVE Updates: मालेगाव बॉम्बस्फोट निकालाविरोधात कायदेशीर लढाई

मालेगाव भिक्कू चौक बॉम्बस्फोट निकालानंतर आता मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने आता कायदेशीर लढण्याची तयारी सुरू झाली असून, कमेटीचे समन्वयक माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने दिल्ली येथे माजी राज्यसभा खासदार श्री. मोहम्मद अदीब यांची भेट घेतली. सुप्रसिद्ध वरिष्ठ वकील कपिल सिब्बल,सलमान खुर्शीद व त्यांचे पुत्र बॅरिस्टर जफर खुर्शीद यांच्या सहकार्याने एक स्वतंत्र कायदेशीर पॅनल तयार करून,न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून कायदेशीर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.खरे गुन्हेगार कोण? पीडितांच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार असल्याचे आसिफ शेख म्हणाले...

LIVE Update: अजित पवारांची राष्ट्रवादी बिहार निवडणूक लढवणार

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

बिहारमधील काही जागांवर पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशात जारी NDA चा घटकपक्ष असला तरी बिहारमध्ये मात्र स्वतंत्र निवडणूक लढवणार

निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी सुरू

राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून किती जागा लढवायच्या याचा होणार  निर्णय

LIVE Updates: 'हर घर तिरंगा' प्रभावीपणे अंमलबजावणी करा' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

'हर घर तिरंगा' ही मोहीम गेले तीन वर्ष लोक चळवळ बनली आहे. याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. 

LIVE Updates: कळवणमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक, चक्क टपावर बसून केला जातो धोकादायक प्रवास

आदिवासी बहुल कळवणच्या अभोणा, कनाशी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून अक्षरक्ष  वाहनाच्या टप्प्यावर पाठीमागे लटकून प्रवाशी प्रवास करतात. विशेष म्हणजे मजूर वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसही या बेकायदा प्रवासी वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून तात्काळ ही बेकायदा वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.

LIVE Updates: अजित पवार भल्या पहाटे पुण्यात हजर

पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज दौऱ्यावर निघाले, यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भारत माता चौक परिसराची सुरुवातीला पाहणी करत ,अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली .भल्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अधिकारी आणि पोहोचण्याआधीच अजित पवार पोहोचल्याने अधिकाऱ्यांची दमछक झाल्यास बघायला मिळालं आहे.

LIVE updates: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हतनूर धरणावर करण्यात आली तिरंग्याची रोषणाई

जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली असून तिरंग्याच्या रोषणाईमुळे हतनुर धरण परिसर उजळून निघाला आहे. हर घर तिरंगा पंधरवड्या अंतर्गत राष्ट्रध्वजाचा गौरव हा केला जात असून या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या वतीने धरणांवर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हतनुर धरण हे जळगाव मधील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेले धरण असून धरणाच्या सर्व 41 दरवाजांवर करण्यात आलेली तिरंग्याची विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com