जाहिरात
11 hours ago

Maharashtra LIVE Blog: देशभरात सध्या दिवाळीच्या सणाची धामधुम सुरु आहे. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात एल्गार केला आहे. निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, अशी मागणी करत मविआमधील पक्षांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे. 

LIVE Update: भाजपच्या वतीने यंदाही ‘पालावरील दिवाळी’ उपक्रम

भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यभर ‘पालावर दिवाळी’ हा संवेदनशील आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

या उपक्रमाअंतर्गत भाजपचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी ऊसतोडणी कामगार, भटके-विमुक्त समुदाय, बांधकाम मजूर आणि इतर वंचित घटकांच्या पालावर जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.

LIVE Update: आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज 

काही ठिकाणी विजा आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज 

बंगालच्या उपसागरात चक्रकार  वाऱ्यामुळे लक्षद्वीप , केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवार पर्यंत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

मुंबई सह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हलक्या सरी बसण्याची शक्यता

LIVE Updates: बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र येणार

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत बारामती मध्ये नावाजलेली शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठानचा आज वर्धापन दिन आहे आणि याच संस्थेची आज सायंकाळी चार वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा देखील पार पडणार आहे. यानिमित्ताने काका पुतण्या एकत्र येणार आहेत. 

बारामती मधील विद्या प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. वर्धापन निमित्त शरद पवार विद्या प्रतिष्ठान संस्थेत कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

LIVE Update: दिवाळी साजरी करणार नाही, शरद पवारांचा निर्णय

"राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात शरद पवारांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून यंदाची दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे."

LIVE Updates: नंदुरबार बाजारपेठेत लसणाची आवक घसरली

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पपई, केळी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 15 दिवसांपूर्वी 50 रुपये किलो प्रमाणे मिळणारा लसूण आता 100 रुपये किलोने खरेदी करावं लागतं आहे. तसेच इतर भाजीपाला देखील महागला आहे. अतिवृष्टी मुळे भाजीपाला पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भाजीपाला मार्केटात आवक घटली आहे. यामुळे लसुण सह भाजीपाल्यांचे भाव देखील वाढले आहेत. भाव वाढले असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

LIVE Update: घरासमोर ठेवलेली चारचाकी गाडी चोरट्यांनी लांबवली

गजबजलेल्या परीसरातील घरासमोर ठेवलेली चारचाकी गाडी चोरट्यांनी लांबवली

वर्ध्याच्या तळेगांव पोलीसांत गुन्हा दाखल

तळेगांव येथील एका घरासमोर पार्क केलेली कारच चोरून नेल्याने पोलीसांच्या कार्यप्रणाली वर होतेय प्रश्नचिन्ह निर्माण

अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीसांच्या रात्र गस्तीत अडथळे येत असल्याची माहिती

चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसानी नियुक्त केले विशेष पथक

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com