जाहिरात
4 hours ago

Maharashtra Live Blog: राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या मदतीच्या निधीवरुनही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, असं संतापजनक विधान केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. 

LIVE Update: मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुंड डीके रावला अटक

- मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुंड डीके रावला अटक 

- आज D K राव आणि त्याच्या सहकाऱ्यांना कोर्टात हजर करणार

- चेंबूरमधील एका बिल्डरने एका व्यक्तीकडून पैसे उधार घेतले होते, आणि ते परत करण्यास तो असमर्थ होता, म्हणून त्याने डीके रावची मदत घेत त्या व्यक्तीला धमकी दिली

- सूत्रांकडून असेही समोर आले की अंदाजे १.२५  रुपयांच्या रकमेचे हे प्रकरण आहे

- मुंबई पोलिसांना या प्रकरणात तक्रार मिळाल्यावर, त्यांनी खंडणी आणि धमकी देण्यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली त्याला आज कोर्टात हजर करणार

LIVE Update: विरोधी पक्षातील नेते घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मोठी घडामोड..  शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट 

LIVE Update: विरोधी पक्षातील नेते घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मोठी घडामोड..  शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट 

LIVE Update: जैन समाजाकडून मृत कबुतरांसाठी शोकसभा

जैन समाजाकडून कबुतरखाने आज अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे

या सभेत कबूतरखाने सुरू व्हावेत यासाठी लढा उभा राहणार असून सकाळी ९ वाजता दादरमधील योगी सभागृहात होणाऱ्या या धर्मसभेत पुढची दिशा ठरवली जाणार आहे

मुंबई महापालिकेने दिलेल्या निर्णयानुसार कबुतरांना खाणं टाकणं सध्या बंद करण्यात आलं आहे

मात्र जे कबुतर मृत पावले आहेत त्यांच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे

LIVE Update: भाजप सत्तेत येण्यासाठी हिंदू मुस्लिम लढाई लावत आहे: माजी मंत्री के.सी. पाडवी

भाजप सत्तेत येण्यासाठी हिंदू मुस्लिम भांडण लावत आहे. देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवळी हे मागासवर्गीय आहे त्यामुळे त्यांच्यावर बूट फेकणे हे किती नीच प्रवृत्ती आहे. जातीयता किती भयानक आहे त्याच्यातला हा प्रकार आहे. तुम्ही लढाई करा आणि आम्ही सांगू तेव्हा भाजपाला मदत करा आणि सत्ता बघू ही भाजपची रणनीती आहे. देशातले तीन-साडेतीन टक्के लोक ये सगळ्यांना खेळवत असल्याचा आरोप माजी मंत्री के.सी. पाडवी केला

LIVE Update: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु 

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार 

वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार

वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचा अजित पवार यांच्याकडून पाहणी 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित

LIVE Update: वारजे परिसरातल्या नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडला समस्यांचा पाढा

वारजे परिसरातल्या नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडला समस्यांचा पाढा 

वारजे परिसरातील रस्त्यांचा आणि वाहतूककोंडी चा प्रश्न सोडवा - नागरिकांची अजित पवारांकडे मागणी 

मी अधिकाऱ्यांना घेऊन आलो आहे, तुमच्या जागांचा योग्य मोबदला देऊ, प्रशासनाला काम करू द्या आणि आडकाठी आणू नका, तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतो - अजित पवारांच आश्वासन

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com