पोषण आहारात मृत उंदीर सापडले! राज्य सरकारकडून गंभीर कारवाई

रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटाच मृत उंदीर आढळल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटाच मृत उंदीर आढळल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. या प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्या विधानसभेत बोलत होत्या. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न विचारला होता. आमदार प्रशांत ठाकूर, विश्वजीत कदम, सरोज आहिरे यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, वडखळ ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुरवठाधारकाकडून खुलासा मागवण्यात आला होता, आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, हा आहार पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे तयार होतो आणि उत्पादनानंतर अंगणवाडीत पोहोचण्यासाठी 15-20 दिवस लागतात. 

पाकीटात आढळलेले प्राणी सदृश अवशेष कोरड्या स्थितीत असणे अपेक्षित होते, मात्र ते ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच मृत झाले असावेत. तसेच, पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे अशा वस्तूंची उपस्थिती असणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा )
 

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असेही तटकरे यांनी सांगितले. 

Advertisement

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्ता

मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरूण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी 31.33 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर  सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
 

Advertisement
Topics mentioned in this article