जाहिरात

Maharashtra Rain: मुंबईत संततधार! रायगडसाठी रेड अलर्ट; राज्यात पावसाचा जोर कायम, कुठे-कुठे कोसळणार? वाचा...

आगामी २४ तासांत पावसाचा जोर ओसरण्याऐवजी तो अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Maharashtra Rain: मुंबईत संततधार! रायगडसाठी रेड अलर्ट; राज्यात पावसाचा जोर कायम,  कुठे-कुठे कोसळणार? वाचा...

Maharashtra Mumbai Rain IMD Alert News: राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले असून, कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनच्या सक्रियतेमुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. आगामी २४ तासांत पावसाचा जोर ओसरण्याऐवजी तो अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पावसाचा जोर वाढणार!

रायगड जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सातारा येथील घाट मार्गांवर दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासात विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश यंत्रणांनी दिले आहेत.

​दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे. धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे, तर जालना, परभणी आणि बीडमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांतही मान्सूनचे आगमन सक्रिय असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Mumbai Rain LIVE: मुंबईत आजही मुसळधार! लोकलचा खोळंबा; वाचा LIVE अपडेट्स

पुणेकरांसाठी 48 तास महत्त्वाचे 

१ जुलैपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत पावसाचा जोर वाढला असून, सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पुणे वेधशाळेने पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

३ जुलैसाठी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ जुलैसाठी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, गेल्या तीन ते चार दिवसांत बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासांत मान्सून संपूर्ण देशभर पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

School News: शाळांच्या मनमानीला चाप बसणार, शिक्षण राज्यमंत्र्याच्या या निर्णयामुळे पालकांचे पैसे वाचणार

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com