जाहिरात
1 hour ago

 Mumbai Pune Rain LIVE Updates:  दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले. रात्रभर झालेल्या या धुवाँधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दहिहंडीच्या दिवशीही मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहिला. आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरु असून अनेक भागात पाणी साचल्याचे पाणी पाहायला मिळत आहे. 

Rain Live Update: जुन्या मुंबई पुणे मार्गावर दरड कोसळली

खोपोली शहरातील जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे मार्गालगत असणाऱ्या काजूवाडीच्या टेकडीवरुन मोठा दगड मार्गांवर कोसळला. मात्र कोणतीही जीवित हानी नाही. कायम रहादारी असणाऱ्या मार्गवर मोठे दगड अनेक वेळा या मार्गवार कोसळले असले तरीही वनखात्या कायम स्वरूपी कोणतीच उपाय योजना करण्यात येत नाही. पावसाळ्यात या भागामध्ये अनेक वेळा दरड कोसळण्याची भीती वाहन चालकांना असते.

Rain Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामांचा वाहनचालकांना फटका 

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा

पुलाच्या अपूर्ण कामामुळे आणखीन वाहतूक कोंडी

पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न

विकेंड असल्यामुळे वाहनाची महामार्गावर मोठी वर्दळ

Rain Live Update: नालासोपाऱ्यात इमारतीचा भाग कोसळला

नालासोपारा पूर्वच्या प्रगती नगर परिसरात अमन अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्याचा काही भाग अचानक खाली कोसळला असून  यावेळी उभी असलेली एक रिक्शा पूर्णपणे चिरडली गेली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्शा पूर्णतः चेंगरून  गेली, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे पसरली आहे. वसई-विरार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक इमारतींच्या सुरक्षेचा गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Rain Update: वाशिम जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस, पुरामुळं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान

वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार ढगफुटीसदृश्य पावसानं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेत जमिनीमधील हजारो हेक्टर वरील खरिपाची सोयाबीन,तूर,कपाशी,हळद यासह भाजीपाला पिकांचं होत्याचं नव्हत झालं आहे. पीक नुकसानीमुळं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Rain Live Update: वर्ध्यात सोरटा ते पिंपळगाव वडाळा मार्गावरील भोग नदीवरील पूलाचे नुकसान

नागरिकांना करावी लागत आहे नुकसानग्रस्त पुलावरून जीवघेणी वाहतूक

पूलाच्या कडा वाहून गेल्याने होऊ शकतो मोठा अपघात

पावसामुळे पुराचा तडाका बसल्याने पुल झालाय क्षतिग्रस्त

पुलाच्या बाजूच्या कडा गेल्या वाहून तसेच पुलावर पडलाय जीवघेणा खड्डा 

पूल दुरुस्तीची कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे मागणी

नागरिकांसह विद्यार्थ्यांना करावी लागत आहे क्षतीग्रस्त पुलावरून जीवघेणी वाहतूक

सोलापुरात लवकरच आयटी पार्क, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

सोलापुरात लवकरच आयटी पार्क

पुण्याच्या आयटी पार्क मध्ये अर्धे लोक सोलापूर मधील आहेत

सोलापुरात आयटी पार्क साठी उत्तम जागा शोधून काढा...

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

एमआयडीसी मधून आपण आय टी पार्क सोलापुरात उभे करूयात...

LIVE Updates: पुण्याच्या पाणी वाटपच्या नियोजनावर एक समिती गठीत

पुण्याच्या पाणी वाटपच्या नियोजनावर एक समिती गठीत 

जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा असणार समावेश 

पुणे शहरातील पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती करणार प्रयत्न 

पुण्याच्या पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्या वाद पाहायला मिळतोय 

मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलते अस जलंसपदा विभागाच म्हणणं आहे 

मात्र आता दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची तयार केली कृती समिती 

शहरातील पाण्याच्या वापरावर समिती ठेवणार लक्ष

LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस 

मुसळधार पावसामुळे सोयगावच्या सोना नदीला आला पूर 

नदीला पूर आल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सतरतेचा इशारा

सोयगाव तालुक्यातील अनेक भागात रात्रीपासून जोरदार पाऊस

LIVE Updates: पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार 

आईला निरोप देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आश्रु अनावर 

ज्योती चांदेकर यांचं काल पुण्यात झालं होत निधन 

वयाच्या ७९ व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी काल घेतला अखेरचा श्वास 

चांदेकर या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या तर तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई होत्या 

ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपट कला विश्वात शोककळा

अंत्यसंस्काराला राज ठाकरे देखील उपस्थित 

Mumbai Live Update: चिंचपोकळीचा चिंतामणीचे जल्लोषात स्वागत

गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत गणेश आगमनाची लगबग सुरू आहे. आज परळ वर्क शॉप मधून चिंचपोकळीचा चिंतामणी च्या मूर्तीचे आगमन होणार. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा १०६ वे वर्ष. १९२० साली या गणपती मंडळाची स्थापना झाली. आगमनाधीश बाप्पा म्हणून या मंडळाची ख्याती आहे. २२ फुटाची ही मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली आहे. काही वेळात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमनास सुरुवात होईल. परळ च्या वर्कशॉप मधून बाप्पाची मूर्ती चिंचपोकळी कडे निघेल.

Maharashtra Rain Update: जळकोट तालुक्यात अनेक गावांचा तुटला संपर्क

लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तीरू नदीला पूर आला असून या पुरामुळे जळकोट तालुक्यात अनेक गावांचा सपर्क तुटल्याचे चित्र पहायला मिळाले. जळकोट तालुक्यातील अतनुरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शिवाजी नगर तांडा , मेवापूर , चिंचोली, अतनुर , गव्हान , रावनकोळा , गुत्ती या गावात जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. 4 ते 5 तास या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहने अडकुन पडल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान पुर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे जळकोट तहसीलदारांकडून सांगण्यात आले. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Rain: कामारी गावाला पाण्याचा वेडा, हनुमान मंदीर पाण्याखाली

  पैनगंगा नदी काठच्या कामारी गावाला शनिवारी झालेल्या पावसामुळे वेढा घातला असुन हनुमान मंदीर देखील पाण्यात दिसत आहे.या भागातील सर्व शिवार पाण्याखाली गेला असुन दरवर्षी अतिवृष्टी सदृश परिस्थितीने या गावासह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

पाणी पातळी वाढत असल्याने कामारी गावात पाणी शिरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे...

Mumbai Rain Update: प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गडावर दरड कोसळली

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गडावर मोठी दरड कोसळण्याची घटना पहाटे घडली. गडावरील पायी जाणाऱ्या मार्गावर गडाचा काही भाग कोसळल्याने अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गडावरील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरड कोसळल्यामुळे सध्या गडावर पायी जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने भाविक आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावर जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक ती दुरुस्ती आणि सुरक्षेची उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LIVE Updates: त्र्यंबकराजाच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला मारहाण

- पवित्र श्रावण महिन्यातच त्र्यंबकेश्वरमध्ये संतापजनक प्रकार समोर

- त्र्यंबकराजाच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला करण्यात आली बेदम मारहाण 

- काल दुपारची मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील घटना 

- मंदिर संस्थानने मुख दर्शन अचानक बंद केल्याने भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये झाली होती बाचाबाची, याच वादातून मारहाण करण्यात आल्याची चर्चा

- सलगच्या सुट्ट्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये झाले आहेत दाखल

Mumbai LIVE Updates: दहिहंडीमध्ये 14 वर्षाखालील मुलांचा वापर, पोलीस कारवाई करणार

मुंबईत गोपाळकाल्यानिमित्त  गोविंदा पथकांमध्ये मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी चुरस लागली

गोविंदा पथके मुंबई-ठाण्यात दहीहंडी फोडत फिरत होती

थरांमध्ये सरास १४ वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचे निदर्नास आले

पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचे चित्रीकरण केले असून चित्रीकरणाच्या तपासणीत लहान मुलांचा थरात वापर केल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधाक गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Mumbai Rain LIVE Update: पावसाचा लोकल सेवेवर परिणाम! मध्य रेल्वे 15-20 मिनिटे उशिरा

रात्रभर सुरु असलेल्या पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीवर पाहायला मिळत आहे

माध्य रेल्वे 15-20 मिनिट उशिराने धावत आहे

पश्चिम रेल्वेवार फारसा परिणाम दिसून आलेला नाही

पश्चिम रेल्वे मार्गावर केवेला 5-10 मिनिट गाड्या उशिराने धावत आहेत

Rain LIVE Updates: नंदुरबार जिल्ह्यात सरासरी २९ टक्के पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस बरसला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे तसेच नंदुरबार तालुक्यात मागील महिन्याभरापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांना याच्या फटका बसत आहे खरीप हंगामातील पिकांवर विविध रोगराई पसरली आहे 

LIVE Updates: इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले

मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ईसापुर धरण क्षेत्रामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.. त्यामुळे ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले..असून त्यापैकी 11 दरवाजांमधून 50 सेंटिमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर दोन दरवाजे एक मीटरने उघडले आहेत, या तेरा दरवाजांमधून  25 हजार 300 क्यूसेक्सने पैनगंगा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे,  ईसापुर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..

Mumbai Rain LIVE Update: तुळशी तलाव भरला

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव आज (१६ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com