2 months ago

Maharashtra Heavy Rain : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईकरांची तर पुरती दैना उडाली आहे. लोकलचा खोळंबा, प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान आज 21 ऑगस्ट रोजी राज्यातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

Aug 21, 2025 22:39 (IST)

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिम्नॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओसाठी निवड झाली असून काल ब्राझील देशात स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताला दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच  भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करीत तिला "महाराष्ट्राची हिरकणी" म्हणून संबोधत तिचा गौरव केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाच तिच्या प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांच्यासह संयुक्ताच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच येत्याकाळात आवश्यक असलेल्या क्रीडा सोयी सुविधासाठी थेट फोन करण्यावचे आवाहन करायला क्रीडा मंत्री कोकाटे विसरले नाहीत. ब्राझील आणि भारत देशाच्या टाइम झोनमध्ये आठ तासाचा फरक असल्याने तिकडे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतातून रात्री उशिरा हा फोन केल्याचे समजते.

Aug 21, 2025 20:18 (IST)

Live Update : सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधीच मिळणार

गणेशोत्सव सणामुळे शासकीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना पेंशन लवकर देण्यात येणार आहे.  ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधीच  दिला जाणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुष खबर आहे. 

Aug 21, 2025 19:18 (IST)

Live Update : तारापूर औद्योगिक वसाहती गॅस गळती, 4 कामगारांचा मृत्यू

बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहती मधील मेडली कंपनीत गॅस गळती

प्लॉट नंबर F 13 मधील मेडली फर्मासु्टिकल लिमिटेड कंपनीत गॅस गळती

गॅस गळतीमुळे  6  कामगार बाधित, 4 कामगारांचा मृत्यू

बाधित कामगारांवर बोईसर मधील खासगी रुग्णालयात उपचार सूरु

Aug 21, 2025 18:03 (IST)

उजनी धरणातील विसर्ग पुन्हा एकदा वाढवला...

उजनी धरणातून पंढरपूरच्या भीमा नदीत येणाऱ्या विसर्गामध्ये आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज दिवसभरात दुसऱ्यांदा उजनीतील भीमेत येणारा विसर्ग वाढवण्यात आला. आज पहाटे एक लाख तीस हजार क्यूसेक इतका प्रवाह सुरू होता. तर आता 1 लाख 51 हजार600 क्युसेक इतक्या क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 1 लाख 64 हजार क्युसेक इतका विसर्ग येत आहे. सकाळच्या तुलनेत दौंड मधील आवक दहा हजार क्युसेकने कमी झाली आहे.

Advertisement
Aug 21, 2025 18:03 (IST)

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 43 फुटावर

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 43 फुटावर आहे. पाणी पातळी सध्या स्थिर आहे. पाणी वाढल्याने  नदी काठी कोण्ही येऊ नये. गर्दी करू नये अथवा गुन्हे दाखल करण्यात येतील.  अन्यथा प्रतिबंधक आदेश जारी करावा लागेल. असे पोलीस अधीक्षक संदीप घुंगे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे. 

Aug 21, 2025 15:06 (IST)

सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंब्यासाठी फडणवीसांचा ठाकरे पवारांना फोन

उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला.  राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती दोघांनाही केली आहे. 

Advertisement
Aug 21, 2025 14:56 (IST)

Live Update : उरण जवळ समुद्रात बोट उलटली, सात जणांना वाचवण्यात यश

उरणमध्ये बोटीत पाणी शिरल्यामुळे बोट बुडत होती. एकूण सात खलाशांना वाचवण्यास यश मिळालं आहे. बोटीला टोविंग करून किनाऱ्यावर आणायचे प्रयत्न सुरू आहेत.

Aug 21, 2025 13:46 (IST)

Live Update : जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

जळगाव मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली असून पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवल्याने त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement
Aug 21, 2025 13:03 (IST)

Live Update : कथित शिखर घोटाळा प्रकरण, आमदार रोहित पवार यांना जामीन मंजूर

कथित शिखर घोटाळा प्रकरण, आमदार रोहित पवार यांना जामीन मंजूर

Aug 21, 2025 12:41 (IST)

Live Update : पंढरपूरच्या पात्रात 1 लाख 30 हजार क्युसेक इतका विसर्ग?

पंढरपूरमध्ये भीमा अर्थात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. अशातच कर्नाटकाच्या विजापूरकडे जाणाऱ्या गोपाळपूर येथील जुना दगडी पूल आता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. पंढरपूरच्या पात्रात 1 लाख 30 हजार क्युसेक इतका विसर्ग आहे.  त्यामुळे आता गोपाळपुरात पाणी वाढताना दिसत आहे. सध्या नव्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र पुढील काही तासात या पुलावर पाणी येऊन हा नवा पूल वाहतुकीसाठी बंद होईल. परिणामी कर्नाटकातील येणाऱ्या विठ्ठल भक्तांचा आता संपर्क तुटण्यास सुरुवात झाली आहे. तर पंढरपूरच्या ग्रामीण भागातील चळे, आंबे , रांजणी , ओझेवाडी आणि मंगळवेढा तालुक्याशीही संपर्क तुटत आहे.

Aug 21, 2025 11:44 (IST)

Live Update : उजनीतून भीमा पात्रात 1 लाख 41600 क्युसेकने विसर्ग....

सध्या उजनी धरून 103 टक्क्याहून अधिक भरलेय. तर उजनी धरणाच्या वरील धरण साखळीतून उजनीत 1 लाख 77 हजार क्युसेक इतक्या दाबाने प्रवाह येतोय. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनी धरणांमधून 16 दरवाज्यातून 1 लाख 41 हजार 600 क्युसेक इतक्या दाबाने भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जातय. त्यामुळे भीमा नदीच पात्र ओसंडून वाहू लागलंय.

Aug 21, 2025 11:25 (IST)

Live Update : इंदापूर लोणी देवकरजवळ क्लुझर जीपचा अपघात, एका महिलेचा मृत्यू तर 13 जण जखमी...

इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर गावच्या हद्दीत आज पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. एका क्लुझर जीपने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात कर्नाटकातील यल्लावा चौंडकी या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून १३ प्रवासी  जखमी झाले आहेत.जखमींना भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल सह इंदापूरमधील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Aug 21, 2025 10:06 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद 

Aug 21, 2025 09:40 (IST)

Live Update : राज ठाकरे मुख्यमंत्री भेटीसाठी वर्षा निवासस्थानी

राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहे

Aug 21, 2025 09:39 (IST)

Live Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला कमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला कमी 

आज 10 वाजल्यापासून खडकवासला धरणातून 32290 क्युसेक पाण्याचा करण्यात येणार विसर्ग 

39 139 वरून कमी करून खडकवासला धरणातून 32290 होणार विसर्ग 

धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार कमी 

Aug 21, 2025 09:39 (IST)

Live Update : पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम

पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम 

शहरातील कोंढवा परिसरात पुणे महानगरपालिकेकडून कारवाई 

अनधिकृत बांधकाम, आस्थापना आणि अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा 

पुण्यातील सोमवार पेठ ,घोरपडे पेठ आणि कोंढवा परिसरात काल दिवसभर महानगरपालिकेची अतिक्रमणाची कारवाई

अनेकदा नोटीसा देऊन देखील अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने चालवला हातोडा

Aug 21, 2025 09:38 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार

एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार

राज्यातील राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली. राज्यसभेत एनडीए उमेदवार अधिक मताने विजयी व्हावे यासाठी सीएम फडणवीस राज्यातील काही नेत्यांशी स्वतः फोनवर बोलतील तसंच काहींना प्रत्यक्ष भेट घ्यायची शक्यता

Aug 21, 2025 09:37 (IST)

Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

चार दिवस मुसळधारपणे रत्नागिरी जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसाचा जोर मात्र सध्या ओसरलेला आहे. कालपासून तुरळक सरी कोसळताहेत.. आजही सकाळी ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून मात्र पावसाची रिमझिम सुरू आहे.. तर काही ठिकाणी सकाळपासून ऊनही पडलं आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळीही कमी झालेली, सध्या फक्त जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. तसेच पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे.. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 33.76 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. चिपळूण आणि राजापूरमध्ये 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली

Aug 21, 2025 09:36 (IST)

Live Update : कोल्हापूर - गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला

कोल्हापूर - गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला

 

 कोल्हापूर - गगनबावडा  मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झालं 

पावसाचा जोर ओसरल्याने प्रशासनाकडून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे

Aug 21, 2025 08:44 (IST)

Rain Update : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्ली, वडणगे फाटा या भागात पाणी आल्यामुळे मार्ग बंद

 कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाणी आल्यामुळे काही प्रमुख मार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. पोलिसांकडून नागरिकांना तुम्ही जीवितास धोका होईल असं  धाडस करू नये वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केर्ली, वडणगे फाटा या ठिकाणी पाणी आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे आज दिवसभर असंच प्रमाण राहिलं तर कोल्हापूरकरांना मोठा दिलासा असणार आहे. 

Aug 21, 2025 08:43 (IST)

Live Update : पंढरपुरात आज दिवसभरात 70 हजार क्युसेकने वाढणार पाणी

पंढरपूरमध्ये आज दिवसभरात एक लाख 80 हजार क्यूसेक इतक्या विसर्गाच्या क्षमतेचे पाणी येऊन पोहोचणार आहे. सध्या 1 लाख 11 हजार इतके पाणी आहे. तर  दिवसभरात 70 हजार क्युसेक इतके पाणी वाढेल. त्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी नंतर संतपेठ हा शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरेल. असा प्रशासनाचा अंदाज आहे. 

Aug 21, 2025 07:55 (IST)

Rain Update : नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू 

गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ 

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी 

नदीपात्रात सातत्याने पाण्याची वाढ होत असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Aug 21, 2025 07:54 (IST)

Live Update : पंढरपुरात भीमा नदीने इशारा पातळी ओलांडली, 125 कुटुंबांचे स्थलांतर

पंढरपुरात भीमा नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहाने व्यास नारायण झोपडपट्टी , अंबिका नगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सध्या पंढरपुरात 125 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखाचा विसर्ग पंढरपुरात येत आहे. त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल. 

Aug 21, 2025 07:46 (IST)

Rain Update : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस प्रदेराध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृधीमुळे अनेक भागांत पूरस्थिती उद्रवली आहे. पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून सध्याची परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अरी मागणी काँग्रेस प्रदेराध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

Aug 21, 2025 07:28 (IST)

Live Update : मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

जायकवाडी धरणातील पाणीसाठी 95.16 टक्क्यांवर 

Aug 21, 2025 07:23 (IST)

Live Update : 5 दिवस झालेल्या अतfवृष्टीचा रायगडच्या कुंभे गावाला फटका

गेली पाच सहा दिवस सुरु असलेल्या अतीवृष्टीचा माणगाव तालुक्यातील कुंभे गावाला फटका बसला असून अतिवृष्टीदरम्यान कुंभे गावाला जोडणारा एकमेव मार्ग दुभंगला आहे.  कुंभे हे गाव मुळातच दुर्गम असून त्याला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.  अतीवृष्टी दरम्यान हा रस्ता दुभंगुन खचला आहे.  या मुळे कुंभे गावाकडे जाणारा हा एकमेव मार्ग बंद होण्याच्या भिती निर्माण झाली आहे.  स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून चार चाकी वाहन बंद केली असून कुंभे ग्रामस्थ सद्या पायी ये जा करीत आहेत.  कुंभे येथे प्रसिध्द धबधबा असून मार्ग बंद झाल्याने पर्यटकांचा देखील हिरमोड होणार आहे.  शासनाने याची वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

Aug 21, 2025 07:21 (IST)

Live Update : मनमाड - नांदगाव परिसरात समाधानकारक पाऊस; परिसरात आनंदाचे वातावरण

नाशिकच्या मनमाड व नांदगाव परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील छोटे मोठे धरणे आणि जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली असून, नांदगावचे नाग्या - साक्या धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो  झाले आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. विशेष म्हणजे यंदा एक महिना अगोदरच नाग्या - साक्या धरण ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Aug 21, 2025 06:43 (IST)

Live Update : जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 12 हजार 326 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 12 हजार 236 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मक्याच्या पिकाचे झाले आहे त्यासोबतच उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी यासह केळीच्या बागांनाही अतिवृष्टीचा फटका बसला असून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाकडून पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.   जिल्ह्यात पुढील दोन दिवस तुरळात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Aug 21, 2025 06:41 (IST)

Live Update : मराठवाड्यासाठी Good News! जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95.16 टक्क्यांवर

 बातमी मराठवाड्याला आनंद देणारी  आहे. कारण जायकवाडी धरणाचा साठा 95.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ज्यात जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येत असून, एकूण 9432 क्यूसेकने विसर्ग सुरु  होणार आहे.

Aug 21, 2025 06:38 (IST)

Live Update : सततच्या पावसामुळे तापी नदीला मोठा पूर....

पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे 41 पैकी 24 दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर....

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेज मधून तापी नदीत 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....

प्रकाशा आणि सारंगखेडा तापी नदीच्या काठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा....

प्रकाशा बॅरेज चे 6 दरवाजे उघडले पूर्ण क्षमतेने.....

संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...

धरणातून तापी नदीत पत्रात 1 लाख 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....

Aug 21, 2025 06:38 (IST)

Live Update : कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली, 20 ऑगस्टला रात्री 11 पर्यंत कृष्णेची पातळी 40:3 फुटावर

सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत पातळी 40 :3 फुटावर आहे. आज दिवसभरात 8 फुटाने पाणी पातळी वाढली  आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित झाले आहेत तब्बल 617  लोकांचा यामध्ये सहभाग आहे.  आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. सकाळ पर्यंत आणखी पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे.