Palghar Nashik Earthquake: महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये भुकंपाचे हादरे बसल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक आणि पालघर जिल्हे आज भुकंपाच्या धक्क्यांनी हादरुन गेले. या धरणीकंपाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पालघरमध्ये भुकंपाचा धक्का
पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र कायम असून, आज सकाळी १० वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. जिल्ह्यातील कासा आणि धुंदलवाडी परिसरात हे हादरे स्पष्टपणे जाणवले. गेल्या काही वर्षांपासून या भागात लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसराले आहे. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी नागरिकांमधे भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Raj Thackeray : मुंबईमधील मोर्चासाठी राज ठाकरेंचे कडक नियम! मनसैनिकांना थेट आदेश; कुणाला दिला इशारा?
नाशिकही हादरलं
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे चार सौम्य धक्के बसल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी 9.55 वाजल्यापासून चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार परिसरात सौम्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भुकंपामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड, घागबारी,बोरगाव या परिसरात आज सकाळी 9.56 ते 10.1 दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले. काही नागरिक कामानिमित्त शेतात होते तर घरी असलेले नागरिक भीतीने भर पावसात सैरावैरा पळत घराबाहेर पडले. सलग चार वेळेस हे धक्के जाणवले, त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते, भूकंपाच्या धोक्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
Happy Ashadhi Ekadashi 2026 Wishes: विठू माऊली तू, माऊली जगाची! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world