जाहिरात
2 months ago

Maharashtra Live Blog: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली असून देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

दुसरीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद उमटताना पाहायला मिळत असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत नागरिक आक्रमक झाले आहेत. या विषयावर झालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्च्यात आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

कल्याणमधील खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला अटक करण्यात आली आहे. या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार आहे. शिवाय  तीन महिन्यात आरोपीला फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांना दिले आहे. 

आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा प्राजक्ता माळींकडून निषेध

बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना जी वक्तव्य केली त्याचा निषेध करते.  गेल्या दीड महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु आहे. गेली दीड महिने अत्यंत शांततेनं मी याला सामोरी जात आहे. ही माझी शांतता, माझी मूकसंमती नाही. मी, माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सर्वांची ही हातबलता आहे. असं प्राजक्ता माळी यावेळी म्हणाल्या.

Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त होणार

बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त होणार आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.  

त्याचबरोबर बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना दिला आहे. 

अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारला अपघात

अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारला अपघात झाला आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. उर्मिला कानेटकर या ही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कांदीवली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.  

Live Update : देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या - सोनावणे

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका सोनावणे यांनी केली. 

Live Update न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका - आव्हाड

बापाला पुरल्याशिवाय शांत बसू नका, संतोषच्या लहान मुलांकडे बघा आणि त्यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका, असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं. 

Live update : अटक करण्यात आलेल्या आरोपींची DNA टेस्ट करा

अटक केलेल्या सर्व आरोपींची DNA टेस्ट करा.. होऊ द्या 'दूध का दूध पाणी का पाणी' अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

Live update : पंकजा ताई, 'या' प्रश्नाचं उत्तर द्या - भाजपा आमदाराचीच मागणी

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेट का घेतली नाही याचं उत्तर पंकजा मुंडे यांनी द्यावं अशी मागणी बीड जिल्ह्यातले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. 

वेळेत कारवाई झाले नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही : जितेंद्र आव्हाड

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. वेळेत कारवाई झाले नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

Beed Morcha: माणुसकीची हत्या, न्याय पाहिजे... बीडमधील विराट मोर्चाला सुरुवात

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या मुख आरोपीला तात्काळ अटक करून त्यांना फाशी द्यावी या हत्या कांडातील मास्टर माइण्डचा शोध तात्काळ घ्यावा या मागणीसाठी बीड च्या आंबेडक चौकातून सर्व पक्षीयांच्या वतीने  मोरच्याला सुरवात झालीय, या मोर्च्यांत मनोज जरांगे, छत्रपती संभाजीराजे,संदीप क्षीरसागर,ज्योती मेटे, दीपक केदार, सुरेश धस आदी नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

Daund Blast: दौंडमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 1 कामगार जखमी

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट झालाय.आज शनिवारी पहाटेच्या सुमारस ही घटना घडली आहे. डिस्टिलेशन रेसिडेंट प्रेशर जास्त झाल्यामुळे तो टँक फुटला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेत एक कामगार गंभीरपणे भाजलेला आहे. आणखी किती कामगार भाजलेले आहेत, यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाही. जो व्यक्ती भाजला आहे त्याला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सागर प्रल्हाद रणभावरे वय २३ वर्षे रा. नेवासा, जि.अहिल्यानगर असे भाजलेल्या कामगाराचे नाव आहे.

घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अकुंश खराडे, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट दिली आहे.

Manmohan Singh Last Rites: डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. काँग्रेस मुख्यालयातून निगमबोध घाटकडे डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव नेले जाणार असून  बारा वाजण्याच्या सुमारास मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

Dr. Manmohan Singh: मनमोहन सिंग यांचा अखेरचा प्रवास! पार्थिव काँग्रेस मुख्यालयाकडे रवाना; VIDEO

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत. निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार केल जातील. त्याआधी मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.   काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मुख्य नेते कार्यालयात दाखल झाले आहेत.

Manmohan Singh Last Rites: मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, देशभरातील नेते दिल्लीत

देशाचे ्माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत. त्याआधी काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढली जाईल. साडे बारा वाजता अंतिमविधी पार पडतील. 

Mumbai Sakinaka Fire: साकीनाका परिसरात भीषण अग्नितांडव, परिसरात धुराचे लोट

मुंबईतील खैराणी रोड साकिनाका परिसरात भीषण आग लागली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाला आग लागल्याचे सांगण्यात येत असून आगीत 2 गोदामने पेट घेतला आहे.  झोपडपट्टी भागात ही आग लागल्याने अग्निशामक दलाला शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत.  अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

Sansip Kshirsagar: व्हायरल फोटोमुळे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अडचणीत

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एका रेस्टॉरंट मध्ये तरुणीसोबत चा फोटो सध्या जालना जिल्ह्यातील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यात क्षीरसागर एका रेस्टॉरंट मध्ये तरुणीला ग्लास देताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी क्षीरसागर हे बीडच्या विकासावर चर्चा करत असल्याचं ट्रोल केलंय तर काही नेटकऱ्यांनी 31डिसेंबरची तयारी असल्याचं ही म्हंटल आहे. हा फोटो कुठला आहे हे नेमकं कळू शकेल नाही मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी यावर चांगलीच टिंगलटवाळी ची झोड उठवली आहे.

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली असून जळगाव मध्ये 5 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असून या अभियानासोबतच घर चलो अभियान देखील राबवले जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली असून जळगाव मध्ये 5 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असून या अभियानासोबतच घर चलो अभियान देखील राबवले जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मराठा बांधवांचा मूकमोर्चा

 बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड शहरात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात संभाजी राजे देखील उपस्थित राहणार आहे. यासाठी संभाजी राजे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले असून, काही वेळेत ते बीडकडे रवाना होणार आहेत. त्याचसोबत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.