जाहिरात
6 days ago

Maharashtra Live Blog: राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले,सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून यासह प्रतीक घुले, महेश केदार,जयराम चाटे याची 12 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने या सर्वांना बीड येथील जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.आता  न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करत,आई वडिलांचं टोकाचं पाऊल

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करत, तिच्या आई वडिलांनी आत्महत्या करण्याचं प्रयत्न केलाय. यात आईचा मृत्यू झालाय तर वडील गंभीर जखमी झालेत. या घटनेत धनराज वैभव हांडे या 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या करण्यात आलीय. तर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 36 वर्षीय शुभांगी वैभव हांडे यांचा मृत्यू झालाय. तर ,वडील वैभव हांडे हे जखमी झालेत. वैभव हांडे यांनी एका खाजगी सावकाराकडून अंदाजे 4 ते 8 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड करण्यासाठी सावकार शिवीगाळ व मारहाण करत होता. हांडे यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपी सावकार संतोष कदम, एक महिला आरोपी, संतोष पवार, जावेद खान  यांच्यावरवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलीय. 

पालकमंत्रिपदाची घोषणा

सातारा - शंभूराज देसाई

रायगड - आदिती तटकरे

लातूर - शिवेंद्रसिंहराजे भोसले

नंदूरबार - माणिकराव कोकाटे

सोलापूर - जयकुमार गोरे

हिंगोली - नरहरी झिरवाळ

भंडारा - संजय सावकारे

छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट

धाराशिव - प्रताप सरनाईक

बुलडाणा - मकरंद जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग - नितेश राणे

अकोला - आकाश फुंडकर

गोंदिया - बाबासाहेब पाटील 

कोल्हापूर - प्रकाश आबिटकर

कोल्हापूर - माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)

गडचिरोली - आशिष जयस्वाल (सह -पालकमंत्री)

वर्धा - पंकज भोयर

परभणी -  मेघना बोर्डीकर

पालकमंत्रिपदाची घोषणा

यवतमाळ               संजय राठोड 

मुंबई उपनगर         आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा 

रत्नागिरी                 उदय सामंत 

धुळे                       जयकुमार रावल

जालना                   पंकजा मुंडे 

नांदेड                     अतूल सावे 

चंद्रपूर                    अशोक उईके 

    

पालकमंत्रिपदाची घोषणा पाहा यादी

पालकमंत्रिपदाची घोषणा 

गडचिरोली          देवेंद्र फडणवीस 

ठाणे                   एकनाथ शिंदे 

मुंबई शहर           एकनाथ शिंदे 

पुणे                     अजित पवार 

बीड                    अजित पवार 

नागपूर                 चंद्रशेखर बावनकुळे 

अमरावती             चंद्रशेखर बावनकुळे 

अहिल्यानगर          राधाकृष्ण विखे पाटील 

वाशिम                  हसन मुश्रीफ 

सांगली                  चंद्रकांत  पाटील 

नाशिक                 गिरीश महाजन 

पालघर                  गणेश नाईक 

जळगाव                 गुलाबराव पाटील 

    

अखेर पालकमंत्रीपदाची घोषणा, बीडची जबाबदारी अजित पवारांकडे तर...

पालकमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार  अजित पवार यांच्याकडे बीड  आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर रायगडची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंकडे मुंबई आणि ठाण्याचे पालकमंत्रिपदा देण्यात आले आहे. तर  नांदेड,अतुल सावे,सातारा - शभुरादे देसाई,संभाजी नगर -संजय शिरसाट यांना जाबादारी देण्यात आली आहे. 

कृषी विभागातील सर्व लाभासाठी आता एक खिडकी योजना लागू होणार

कृषी विभागातील सर्व लाभासाठी आता एक खिडकी योजना लागू होणार आहे. अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार आहे असंही ते म्हणाले आहेत. यासोबतच राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार आहे.

Live Updates: अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक

नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानहा हल्ला झाला आहे. या दडफेकीनंतर खळबळ उडालीय. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. 

कोल्ड"प्लेच्या कार्यक्रमामुळे नवी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी

कोल्ड"प्लेच्या कार्यक्रमामुळे नवी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. डी वाय पाटील स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर वाहतूक पोलीसांचीही यामुळे अडचण झाली आहे. याचा फटका सर्व सामान्यांसह रुग्णांनाही बसत आहे.  

माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागला आहे. साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता acb ची नोटीस आली आहे.  

Live Updates: सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आकाश कानोजिया असं या आरोपीचं नाव आहे. त्याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. दीपक या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, अशी माहिती आहे.

Kolkata Doctor Death Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण: आरोपी संजय रॉय दोषी

संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या कोलकातामधील डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या भयंकर हत्याकांडामध्ये आरोपी संजय रॉयला कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्याला सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Champions Trophy team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा!

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपींना 14 दिवसांची कोठडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन कोठडी सुनावणी सुरु झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह सर्व आरोपींना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Dadar Accident: बेस्ट बसची फॉर्च्युनरला धडक, ठाकरेंचे आमदार बचावले

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसची धडक दिल्याचे समोर आले आहे. दादरच्या खेड गल्लीतील आज सकाळी पावणे बारा वाजताची घटना आहे.  आमदार सुनिल शिंदे गाडीतून उतरल्यानंतर बसने दिली मागून धडक. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी नाही,परंतु सुनिल शिंदे यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. 

Beed News: बीड खंडणी प्रकरण: वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची सुनावणी लांबणीवर

वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.  वाल्मिक कराड यांचे वकील आजारी असल्याने कोर्टात तारीख वाढवुन मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत. तर विष्णू चाटे यांचे वकील आज जामीन साठी प्रकरण दाखल करणार नसल्याची चाटे यांच्या वकिलाची माहिती.

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गासाठी दुराग्रह करू नये: पृथ्वीराज चव्हाण

शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने दुराग्रह करू नये. ज्या जिल्ह्यातून हा मार्ग प्रस्तावित आहे, त्या परिसरातील शेतकऱ्यांना आधी सरकारने विश्वासात घ्यावे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. सुपीक आणि बागायती जमिनी वाचविण्यासाठी जर शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात थोडा बदल केला, तर प्रवासात दोन-चार मिनिटांचा फरक पडेल, पण जमिनी वाचतील, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लाडकी बहिण योजना ही निवडणुकीपूर्वी घाईघाईने आणण्यात आली. लोकांना सरसकट पैसे वाटणे हाच या योजनेमागचा एकमेव उद्देश होता. त्यामुळे, कुठल्याही शासकीय योजनेप्रमाणेच, या योजनेतही महिलांना अटी आणि शर्तींना सामोरे जावे लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Walmik Karad News: वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती 

बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता ही तीच ज्योती मंगल जाधव आहे जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आलीय 

बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे. एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत

या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं . त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे

NCP Adhiveshan Shirdi: नाराज छगन भुजबळांची शिर्डी अधिवेशनाला हजेरी, धनंजय मुंडेंची दांडी

गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या शिर्डीमधील अधिवेशनाला हजेरी लावली आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र या अधिवेशनाला गैरहजर आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे मुंडे उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

Amravati News: अमरावतीच्या मेळघाटमध्ये जादूटोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची काढली धिंड

अमरावतीच्या मेळघाटमध्ये जादूटोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची काढली धिंड..

जादूटोण्याचा संशय व्यक्त करत वृद्धेला केली मारहान...

अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावातील घटना..

30 डिसेंबरला घडली होती घटना, त्यानंतर आता ही घटना समोर आली..

धिंड काढत असताना अख्खे गाव बघत होते, पण कोणीच विरोध केला नाही..

आरोपींवर पोलिसात गुन्हे दाखल.

Ajit Pawar Shirdi Visit: उपमुख्यमंत्री अजित पवार साईबाबांच्या दर्शनाला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डीमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये दाखल झालेत. यावेळी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. 

Solapur News: बार्शी तालुक्यातील उक्कडगावात वाघाने पाडला 3 जनावरांचा फडशा

बार्शी तालुक्यातील उक्कडगावात वाघाने पाडला 3 जनावरांचा फडशा

- बार्शी तालुक्यातील उक्कडगावात 50 जनावरांच्या कळपात घुसला वाघ 

- या कळपातील दोन म्हैस , एका गाईवर हल्ला करत पाडला फडशा 

- उक्कडगाव शिवारातील पठाडे तलावाजवळ घडली घटना 

- वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे 100 कर्मचारी तैनात 

- येडशी अभयारण्यात स्थिरावलेली ताडोबा टीमसह सर्व यंत्रणा उक्कडगाव शिवारात दाखल

Chhagan Bhujbal: ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 

नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार आमने- सामने 

माजी मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार 

प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार 

अधिवेशनात छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार 

१० पर्यंत छगन भुजबळ तर १२ वाजेपर्यंत धनंजयने मुंडे अधिवेशनाला हजेरी लावणार

Nandurbar News: जनावरांच्या चाऱ्याची किंमत वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे जानेवारी महिन्यातच पशुधनासाठी लागणारा चाऱ्याची किंमत वाढली आहे.  चाऱ्याची किंमत वाढल्यामुळे याचा फटका आता पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी चार विकत घ्यावा लागत आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात म्हशीच्या दूध सत्तर रुपये लिटर प्रमाणे विक्री होत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा आहे चाऱ्याची वाढलेली एक किंमतीमुळे 70 रुपये प्रति लिटर दूध विकणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींची आज बीड न्यायालयात सुनावणी

 वाल्मीक कराड,विष्णू चाटे याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आधीच सरकारी वकील जे. बी.शिंदे यांच्या माध्यमातून सीआयडीने याची उत्तर दाखल केले आहे. वाल्मीक करण्याच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा विरोध आहे.त्यातच विष्णू चाटे याच्या खडणी प्रकरणावर देखील केज न्यायालयात सुनावणी होणार आहे आता या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दुसरीकडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले,सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून यासह प्रतीक घुले, महेश केदार,जयराम चाटे याची 12 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने या सर्वांना बीड येथील जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.आता ला न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ratnagiri News: पोमेंडी बुद्रुकच्या सरपंच ममता जोशी यांना दिल्लीचे निमंत्रण

दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका सरपंचांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्याच्या पंचायत राज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

Bhandara Accident: भंडाऱ्याच्या तुमसर बस स्थानकासमोर ट्रकने महिलेला चिरडले

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बस स्थानकासमोर भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडल्याची घटना घडली होती. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता पुढे आला असून व्हिडिओमध्ये या भरधाव ट्रकचालकाची मजुरी स्पष्टपणे दिसून येत आहे. एका स्कुटी वरील महिलेला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने अक्षरशः चिरडून टाकले. सदर महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध भर धाव वाहनांची भरमार पाहायला मिळते. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने असे प्रकार दिवसागणित वाढत चालल्याचे पहायला मिळत आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com