विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असून ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. मुंबईसह अहिल्यानगरमध्येही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून अहिल्यादेवीनगरमधील ठाकरेगटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
दुसरीकडे आजपासून संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. तत्पुर्वी आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. सकाळी अकरा वाजल्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल.
IND vs ENG T20 : टीम इंडियानं परंपरा राखली ! इंग्लंडविरुद्ध विजयासह रेकॉर्ड कायम
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना टीम इंडियानं 15 रननं जिंकला आहे. पुण्यात झालेल्या या सामन्यात भारतीय टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 आऊट 181 रन्स केले. त्याला उत्तर देताना इंग्लंडची संपूर्ण टीम 19.4 ओव्हर्समध्ये 166 रन्सवर ऑल आऊट झाली.
टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या (53), शिवम दुबे (53) यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर, इंग्लंडकडून साकीब महमूदनं एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली होती. पण, इंग्लंडच्या बॅटर्सना 182 रनचं आव्हान पेललं नाही. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकनं सर्वाधिक 51 रन काढले.
भारतानं या विजयासह पाच सामन्यांच्या T20 सीरिजमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध गेल्या 10 वर्षात T20 सीरिज जिंकण्याचा रेकॉर्ड भारतीय टीमनं कायम राखला आहे. या सीरिजमधील शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.
पालघरमधील शिवसेना नेते अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला?
पालघरचे शिवसेना नेते अशोक धोडी यांची कार गुजरातमधल्या एका दगडीच्या खाणीत सापडली आहे. त्यांची कार खाणीतल्या तलावात सापडली. त्या कारच्या डिकीमध्ये एक मृतदेह सापडला आहे. तो मृतदेह अशोक धोडी यांचा आहे की नाही याची अजून पुष्टी झालेली नाही. गेल्या 12 दिवसापासून ते बेपत्ता होते.
Live Updates: काँग्रेसनं केला राष्ट्रपतींचा अपमान, PM मोदींचं सोनिया गांधींना उत्तर
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काँग्रेसनं राष्ट्रपतींचा अपमान केला असल्याचं पंतप्रधानांनी सुनावलं आहे.
Live Updates: लातूर जिल्ह्यातल्या 25 हजार लाडकी बहिणींचे अर्ज अपात्र
लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील 25 हजार महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.अर्जातील त्रुटींची पूर्तता न केल्यानं 25 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 92 हजार 19 अर्ज प्राप्त झाले आहेत... त्यापैकी 5 लाख 67 हजार महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत.. तर 25 हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
Live Updates: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातमध्ये सापडले
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची कार अखेर सापडली
अशोक धोडी यांची कार गुजरात राज्यात सापडली
एका बंद असलेल्या दगड खदानित सापडली कार
अशोक धोडी प्रकरणी NDTV मराठीचे थेट गुजरात मधून कवरेज
भिलाड मधील माला फलीया या गावातील खादानित सापडली गाडी.
Hingoli Accident: हिंगोलीत भीषण अपघात. शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू
हिंगोली सेनगाव राज्य मार्गावरील राहोली फाट्याजवळ चालत्या आटोतून पडून एका 18 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अंजना तुकाराम कऱ्हाळे असं मृत तरुणीचं नाव असुन मायावती गायकवाड आणि पूजा पांढरे या दोन विद्यार्थिनी गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत.. जखमी विद्यार्थीनीला त्याच आटो चालकाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे..सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दोघीवर उपचार सुरू आहेत, नेमकं आटोतून पडण्याचं काय कारण ? याचा पोलीस शोध घेत आहेत...
Nashik News: किरीट सोमय्या गो बॅक, मालेगावमध्ये निदर्शने
बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनविण्याचा कारखाना मालेगावमध्ये सुरू असल्याचा आरोप करत माजी खा.किरीट सोमय्या यांनी तशा तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमैया हे मालेगावमध्ये दाखल होत असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ' मायनॉरिटी डिफेन्स कमिटी ' तर्फे शहरातील गांधी पुतळ्यावर सोमय्या यांना विरोध दर्शविण्यासाठी निदर्शने केली जात आहे..माजी आमदार आसिफ शेख, मुष्टकीन दिग्निटी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून हातात ' किरीट सोमय्या गो बॅक ' चे फलक घेत व काळया फिती लावून निदर्शने करण्यात येत आहे..या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
Pune News: पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, CM देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.
Pune News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर
पुण्यातील एका कार्यक्रमात दोन्ही नेते येणार एकत्र
थियेटरस् अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर
पुण्यातील मुकुंद नगर मध्ये संध्याकाळी पाच वाजता पडणार कार्यक्रम पार
थियेटरस् अकॅडमीचे प्रसाद पुरंदरे आणि राज ठाकरे हे चांगले मित्र.
Nashik News: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात निदर्शने
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात निदर्शने...
मॉयनॉयरेटी डिफेन्स कमेटीतर्फे केले जातेय निदर्शने.
..
तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केले जातेय आंदोलन
किरीट सोमय्याचा हस्ताक्षेप खपवून घेतला जाणार नाही, किरीट सोमय्या गो बँकचा झलकवले फलक..
किरीट सोमयांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...
आंदोलन स्थळी मोठ्या पोलिस बंदोबस्त...
किरीट सोमय्या दुपारी 1 वाजेनंतर येणार मालेगावात...
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आज बीड मकोका न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले होते
डिजिटल इव्हिडन्स च्या आधारे प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच दिवसाची एसआयटी कोठडी देण्यात आली होती
मात्र आज सरकारी वकील ॲड.बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयीन कोठडी मागितली
आणि न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
मात्र या प्रकरणात केव्हाही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार तपास यंत्रणेला असणार आहे.
Nashik News: नाशिकमध्ये तीन बिबट्यांचा वावर
गेल्या 4,5 दिवसांन नाशिकच्या बोराडे वस्ती पाथर्डी- वडनेर रोड येथील पिंपळगाव या ठिकाणी सोमनाथ बोराडे यांच्या बंगल्यावर बाहेर CCTV व्हिडिओमध्ये चक्क तीन बिबटे रेकी करताना दिसत आहेत. या बिबट्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून गावात धुमाकूळ घातला असून परिसरातील नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्यास देखील मुश्किल झाले आहेत..
केवळ एकाच दिवसात नाहीतर गेल्या तीन दिवसात हे बिबटे भिंतीवरून बंगल्यात शिरताना तर कधी रस्त्यावरून चालताना दिसत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत..
Live Updates: चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या - आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानिमित्ताने चौंडी येथे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकाचे आयोजन करावे,अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकाभिमुख राज्य कसं चालवावे हे दाखवून दिले आहे,आणि महाराष्ट्राचा विकास करण्याची ताकत चौंडी मध्ये आहे,तसेच महाराष्ट्र हे हिंदुत्ववादी सरकार,अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर चालतं,हा संदेश द्यावा,असं मत देखील आमदार पडळकर यांनी व्यक्त करत चौंडी मध्ये मंत्रीमंडळ बैठक घेण्याची मागणी केली आहे.
Pune GBS: पुण्यात GBSचा दुसरा रुग्ण दगावला, 36 वर्षीय युवकाचा मृत्यू
पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केली होती.
नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची आजचा शेवटचा दिवस
नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची आजचा शेवटचा दिवस..
राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबिन खरेदी विना नाफेड मध्ये...
सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी..
अमरावती मधील नाफेड केंद्रावर लागल्या सोयाबीनच्या वाहनांच्या रांगा..
नाफेड मध्ये सोयाबीनला मिळतोय 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव...
तर खाजगी बाजार पेठेमध्ये सोयाबीनचे दर 3 हजार 500 पर्यत.
सोयाबीन खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांच होणार मोठे नुकसान..
Pune News: 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा- अजित पवार यांचे निर्देश
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
Parliament Budget Session: आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, PM मोदी माध्यमांशी संवाद साधणार
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात: आज 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेपूर्वी मीडियाशी संवाद साधणार,त्यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला अभिभाषणाने होईल आणि अर्थमंत्री दुपारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर उद्या 1 फेब्रुवारी रोजी सामान्य अर्थसंकल्प सादर केला जाईल. सोमवारपासून लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार आहे. गुरुवारी सर्वपक्षीय बैठक झाली .
बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत केंद्र सरकारच्या सर्व पक्षांशी चर्चा करण्यात आली. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेत्यांना संसदेच्या अधिवेशनादरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले जेणेकरून सभागृहात चर्चा सुरळीत होईल.
Akola News: * बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम राबवून रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर पाठवा: हिंदू संघटना आक्रमक
महाराष्ट्रातील प्रत्येक शहर जिल्हा तालुका येथे 'बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम' राबवावी.. आणि सापडलेल्या घुसखोरां विरोधात कठोर कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढावे.. जगभरातील जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन या देशांमध्ये मध्य-पूर्व (मीडल ईस्ट), तसेच अफ्रिकेतून बेकायदेशीर घुसखोरीमुळे अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्याय.. देशांत सामाजिकदृष्ट्या गुन्हेगारी, दंगली, मादक पदार्थांचा व्यवसाय, मानवी तस्करी वाढली त्यामुळे बांगलादेशी शोधून देशाबाहेर काढावे.. अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या कडून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे.
Pune Crime: अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, वाकड पोलिसांची कारवाई
अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने वाकड पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. समीर नवाब शेख अस अटक करण्यात आलेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 1 पिस्तूल आणि 1 जिवंत काडतुस असा 52 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर वाकड पोलिसांत याच्या आधीही ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
Ratnagiri News: पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोनवडेपार पुलाचे होणार उद्घाटन
वेंगुर्लेत रशियन युतीचा विनयभंग एकावर गुन्हा दाखल
राजस्थान येथील शिवराज गॅंग च्या तिघासाथीदारांना शिरोड्यात अटक सिंधुदुर्ग एल सी बी ची कारवाई
मालवण येथे दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याने मोहोळ सोलापूर येथील पर्यटक गंभीर जखमी
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारीला लोकशाही दिनाला पालकमंत्री नितेश राणे राहणार उपस्थित
Dhananjay Munde: धनंजय मुंडे श्री क्षेत्र भगवानगडावर नतमस्तक
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे हे आज बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर थेट श्री क्षेत्र भगवानगड येथे मुक्कामी गेले आहेत. धनंजय मुंडे यांनी संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन वंदन केले. गडाचे द्वितीय महंत ह.भ.प. भिमसिंह महाराज यांच्याही समाधीस्थळी श्री मुंडे नतमस्तक झाले.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच गडावर आलो असून, संत भगवानबाबा यांचा मी एक निस्सीम भक्त आहे. या स्थळी नतमस्तक होऊन मला लढायची शक्ती आणि लोकांची कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते, आज या ठिकाणी मुक्कामी राहणार असून, गडाचा प्रसाद ही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.