जाहिरात

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बंद पाकिटातून नाव सुचवलं अन् या नेत्याचे स्टार चमकले

पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे.

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बंद पाकिटातून नाव सुचवलं अन् या नेत्याचे स्टार चमकले
Pune Jilha Parishad Group Leader Shrimant Dhole

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Pune NCP News Today : पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंद पाकिटातून श्रीमंत ढोले यांच्या नावाची शिफारस केली आहे.आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हे बंद पाकिट उघडले आणि गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. या निवडीमुळे इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे.

श्रीमंत ढोले यांच्या गटनेता या निवडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.त्यानंतर गट स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांवर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढोले यांनी पक्षश्रेष्ठींसह सर्वांचे आभार मानले आहेत. आज शुक्रवारी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली.

कशी आहे श्रीमंत ढोले यांची राजकीय कारकिर्द?

यावेळी आमदार सुनील शेळके,माजी आमदार रमेश थोरात,माजी आमदार अशोक पवार,माजी आमदार संभाजी कुंजीर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, देवराम लांडे,पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर,राजेंद्र कोरेकर,विठ्ठल शिंदे,जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते. श्रीमंत ढोले यापूर्वी 2012 ते 2017 या कालखंडात जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत.  याशिवाय श्रीमंत ढोले हे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत ढोले यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी सर्वात अगोदर जाहीर केली होती.अजित पवार यांच्याशी श्रीमंत ढोले यांचे अत्यंत जवळचे संबंध होते.

नक्की वाचा >> Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 जण राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?

दादांच्या अपघाती निधनानंतर आजही ढोले कुटुंबाचे पवार घराण्याशी असणारे संबंध तितकेच मजबूत आहेत. याशिवाय श्रीमंत ढोले हे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे कार्यकर्ते मानले जातात. मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विशेष लक्ष ढोले परिवारावर असून नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत ढोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले होतं. यात इंदापूर तालुक्यात 20799 सर्वाधिक मते मिळवत श्रीमंत ढोले यांनी विजयश्री खेचून आणला आहे.

गटनेता का महत्त्वाचा असतो?

जिल्हा परिषद गटनेता हा आपल्या राजकीय पक्षाचे जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रतिनिधी असतात. ते सभागृहात पक्षाची भूमिका मांडतात, सदस्यांमध्ये समन्वय साधतात आणि पक्षाच्या धोरणांनुसार विकासकामे व धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव पाडतात. ते पक्षाच्या अध्यक्षांशी व सदस्यांशी संवाद साधून तांत्रिक व कायदेशीर बाबींवर पक्षाचे मत ठरवतात. थोडक्यात, गटनेता हा जिल्हा परिषदेतील पक्षाचा "सुकाणू" म्हणून कार्य करतो आणि राजकीय स्थिरता व विकासाच्या कामांमध्ये संतुलन राखतो.

नक्की वाचा >> Beed News : बीड बस स्थानक परिसर हादरलं..रात्री 2 वाजता घडली भयंकर घटना! संपूर्ण शहरात पोलीस अलर्ट मोडवर

जिल्हा परिषद गटनेत्याचे कार्य 

पक्षाची भूमिका मांडणे: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व इतर महत्त्वाच्या सभांमध्ये आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे.
सदस्यांमध्ये समन्वय: पक्षाच्या सदस्यांना (सभागृह सदस्य) धोरणात्मक मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यात एकता राखणे.
विकासकामांचा आढावा: जिल्ह्यात चाललेल्या विकासकामांचा (शिक्षण, आरोग्य, रस्ते) आढावा घेणे आणि आवश्यक ते बदल सुचवणे.
बैठकांचे आयोजन: पक्षाच्या अंतर्गत बैठका बोलावून धोरणे ठरवणे आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे.
अध्यक्षांशी चर्चा: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासन (CEO) यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या विकासकामांना प्राधान्य देणे. 

जिल्हा परिषद गटनेत्याचे अधिकार : 

ह्विप जारी करणे (Whip): पक्षीय निर्णयानुसार सभागृहात मतदान करण्यासाठी सदस्यांना 'ह्विप' बजावण्याचा सर्वोच्च अधिकार, ज्याचे पालन न केल्यास सदस्यांचे पद धोक्यात येऊ शकते. महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती: विषय समित्या किंवा स्थायी समित्यांवर आपल्या पक्षाच्या सदस्यांची वर्णी लावणे.
धोरणात्मक निर्णय: जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आणि नवीन योजनांवर पक्षाचे मत मांडून निर्णयावर प्रभाव पाडणे.
सदस्यांच्या समस्या मांडणे: आपल्या गटातील सदस्यांना प्रशासकीय किंवा इतर समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
अविश्वासाचा प्रस्ताव: आवश्यकतेनुसार अध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव किंवा इतर तांत्रिक प्रक्रियांत पुढाकार घेणे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com