राज्यात सध्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेला आणि् खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला 15 दिवसाची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या वाल्मिक कराडची सीआयडीकडून कसून चौकशी सुरु असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आहे का? याबाबत आता धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधकांनी या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
SIT चा अहवाल आल्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय - विखे पाटील
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी SIT चा अहवाल आल्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
वाल्मिक कराडला जेलमध्ये मिळत आहेत सर्व सुविधा - धनंजय देशमुख
वाल्मिक कराडला जेलमध्ये सर्व सुविधा मिळत आहे. सरकारी यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे असा आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. शिवाय आपल्याला पोलिस स्टेशनमध्येच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा ही आरोप त्यांनी केला आहे.
Khel Ratna Award: मनू भाकर, डी गुकेशसह चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर; कोल्हापूरच्या स्वप्निलचाही सन्मान
क्रीडा मंत्रालयाने 2024 साठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यावेळी चार खेळाडूंची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी खेलरत्न मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये जागतिक चॅम्पियन ग्रँडमास्टर डी गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकर यांचा समावेश आहे.
यावेळी क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कारासाठी १७ पॅरा ॲथलीट्ससह एकूण ३२ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेचाही समावेश आहे. हे सर्व पुरस्कार विजेत्यांना 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील.
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा मोठा निर्णय! शायकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्य सरकारचे वेतन मुंबई जिल्हा बँकेमधून केला जाणार असून मुंबई जिल्हा बँकेत खासगी खाती काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर हे या मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत.
PM Modi News: CM देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा, PM मोदींकडून कौतुक
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन! असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष… https://t.co/IbDVZ4GO2v
Ajmer Dargah: पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेरच्या शरीफ दरगाहला चादर पाठवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेरच्या शरीफ दरगाह ला चादर पाठवणार आहेत. आज ६ वाजता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चादर घेऊन अजमेरला जाणार आहेत. ४ जानेवारीला अजमेरच्या दरग्यामध्ये चढवली जाणार चादर असून आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वेळा चादर पाठवली आहे. दरगाहला ८५० वर्षाचा इतिहास आहे.
हिंदूसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ख्वाजा मोइद्दीन चिश्ती अजमेर हा दर्गा नसून हे एक शिव मंदीर असल्याचा दावा केला आहे, त्या पार्श्वभूमीवर चादर पाठवण्याला महत्त्व आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवणं योग्य नाही. प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं जर पंतप्रधानांकडून चादर पाठवली तर दबाव निर्माण होईल आणि याचिकेवर परिणाम होईल. या प्रकरणात अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल देखील करण्यात आली आहे.
Nagpur Crime: धक्कादायक! हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेस मध्ये तरुणाची हत्या
दिल्लीकडे जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेस मध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. जनरल च्या डब्यात ही घटना घडली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकात हा प्रकार उघडकीस आला असून पोलिस तपास सुरू आहे. मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे..हत्या झालेला तरुण कोण आहे याविषयी चौकशी करण्यात येत आहे. त्या तरुणाला मारहाण करणारे चार जण होते, चौघांना अटक करण्यात आली आहे.
Mahayuti Cabinet Meeting: महायुतीच्या कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि खाते वाटपानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे मंत्री या बैठकीला हजर झालेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले धनंजय मुंडेही या बैठकीला पोहोचले आहेत.
Kalyan Crime Update: कल्याण अत्याचार प्रकरण: आरोपी विशाल गवळीसह पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Kalyan Crime: कल्याण अत्याचारातील आरोपीला फाशी द्या, नागरिकांचे न्यायालयाबाहेर मूक आंदोलन
कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर आंदोलनासाठी मेसेज व्हायरल झाल्याने पोलिसांनी न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त वाढवला असून न्यायालयाच्या दोन्ही गेटवर बॅरिकेड्स लावून मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनात करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी करीत काही महिला नागरिक कल्याण कोर्टाबाहेर पोस्टर घेऊन उभे आहेत. कल्याण न्यायालयावर नागरिकांचे मुक आंदोलन सुरु असून जज साहब इन्साफ करो बिटिया के हत्यारे को फासी दो.. अशी मागणी केली जात आहे.
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटी आज बीडमध्ये दाखल होणार
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेले एसआयटीची आज बीड जिल्ह्यात दाखल होणार आहे .आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणाचां सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे..
सरपंच संतोष देशमुख हत्यां प्रकरणाला 23 दिवस होवूनही अद्याप तीन आरोपी फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. काल यां एस आय टीचें गृह विभागाकडून अधिकृत आदेश आलेत.
Mumbai Air Pollution: मुंबईतील हवा सुधारण्यास सुरुवात
बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील खराब हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेने जी पाऊलं उचलली होती त्याचे परिणाम हळू हळू दिसू लागले आहेत. . बोरिवली येथील दोन एअर मॉनिटरिंग स्टेशन्सवरील AQI बुधवार संध्याकाळपर्यंत समाधानकारक पातळीवर सुधारले
तर भायखळा येथील एका केंद्रात कमीत कमी सुधारणा दिसून आली आणि हवेची गुणवत्ता उच्च पातळीवर कायम राहिली. सॅटिस- फॅक्टरी झोन पर्यंत येण्यासाठी मुंबई महापालिकेने मंगळवारी सर्व सुरु असलेल्या बांधकामांवर बंदी घातली. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत जरा सुधारणा झालेली दिसून आली
Pune News: पुण्यातील चापेकर बंधू वाड्याचं होणार क्रांतितीर्थ स्मारक
पुण्यातील चापेकर बंधू वाड्याचं होणार क्रांतितीर्थ स्मारक
चिंचवड मधल्या वाड्याऐवजी सहा मजली इमारत बांधण्यात येणार
सुमारे ४५ हजार चौरस फुटाच बांधकाम करण्यात येणार
या इमारतीत गौतम बुद्धांच्या कालखंडापासूनची छायाचित्रे देखील असतील
ऐयिहासिक संदर्भ असलेले ग्रंथालय आणि दोन हजार क्रांतिकारांची सहचित्र माहिती देखील या स्मारकात लावली जाणार
Latur News: थर्टी फर्स्टला 55 मद्यपी वाहन चालकावर गुन्हे दाखल
नववर्षाचे सेलिब्रेशन करताना दारू पिऊन वाहन चालवणार्या चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 55 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, अश्या 461 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 03 लाख 41 हजार 200 रुपये इतका दंड वसूल केला आहे.
Ekvira Fort News: एकविरा देवीच्या गडावर मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला
लोणावळ्यातील एकवीरा गडावर काल नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे चे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचल्याने मधमाश्यांनी भविकांनवर हल्ला केला आहे,
यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेतल्याने ते जखमी झालेत. मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी कार्ला एकविरा ग्रामस्थांनी केली आहे.
Accident News: हॉटेलमध्ये जेवण करुन घरी जाताना ट्रकने चिरडलं, आई वडिलांसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू
हॉटेलमधून जेवण करून येत असताना ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आई-वडिलांसह बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ घटना घडली. सतीश नागपुरे (51) ,मंजुषा नागपुरे (47) सह माहिरा नागपुरे वय दोन वर्षे असे मृतकांचे नाव असून मृतक हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील रहिवाशी आहेत. स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिस घटनास्थळी दाखल होत ट्रक चालक नंदू चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Jalgaon News: अवकाळी पावसानंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा तापमानात घट
जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर सलग दोन दिवस ढगाळ वातावरण होते त्यामुळे तापमानातही काहीशी वाढ झाली होती मात्र अवकाळी पावसानंतर जिल्ह्यात पुन्हा तापमानात घट झाली असून तापमानात घट झाल्याने पहाटे दाट धुके पडत आहे. या दाट धुक्यांमुळे मात्र गहू मका हरबरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News: वैद्यकीय महाविद्यालयाच्या गलथानपणामुळे डॉक्टरचा मृत्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ची इंटरंशिप करणाऱ्या आणि अवघ्या 2 महिन्यात लग्न होवू घातलेल्या डॉक्टरचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक 1 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता घडली. डॉ लोकेश सैनी असे या मृत डॉक्टरचे नाव आहे. इंतरणशिप करताना ग्रामीण रुग्णालयात काही काळ या विद्यार्थ्यांना सेवा द्यावी लागते. पण रुग्णालयात ये जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था महाविद्यालयाने करावी किंवा अश्या ग्रामीण रुग्णालय परिसरात राहण्याची व्यवस्था करावी असा नॅशनल मेडिकल कौन्सिल चा नियम आहे. पण याच नियमाचे पालन नांदेड मेडिकल कॉलेजने न केल्याने एका तरुण डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला. आता हे डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत आहेत.
Nandurbar News: नंदुरबारचा भाजीपाला मार्केट संध्याकाळीही राहणार
नंदुरबार येथील महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट येथे संध्याकाळी साडेचार वाजता होणारे भाजीपाल्याचे लिलाव कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण आणि सोशल डिस्टेंसिंग पाळले जावे यासाठी सकाळ संध्याकाळच्या लिलाव बंद करून पहाटे तीन वाजता लिलाव करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता मात्र आता पूर्वीप्रमाणे सायंकाळी साडेचारला भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्यात यावे अशी मागणी व्यापारी हमाल तसेच शेतकऱ्यांकडून केली जात होती यावर बाजार समितीत झालेल्या बैठकीत पूर्वीप्रमाणे संध्याकाळच्या लिलाव देखील चालू करण्यात येणार असल्याचे निर्णय घेण्यात आले आहे यामुळे बाजार समितीतील व्यापारी शेतकरी हमाल यांनी याच्या फायदा होणार आहे.
Wardha News: निवृत्त कर्मचाऱ्याला वाजत गाजत निरोप
वर्ध्याच्या आर्वी पंचायत समितीचे शाखा अभियंता हे सेवानिवृत्त झाल्याने त्याना निरोप देण्यासाठी नागरिकांनी चक्क त्यांची बँड बाजा सहीत मिरवणूक काढत व फटाक्यांची आतिषबाजी करत निरोप दिल्याने सगळीकडे या निरोप समारंभाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Beed News: संतोष देशमुख हत्येचे पडसाद: 521 ग्रामपंचायतीचे कामकाज राहणार बंद
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सूचना केल्या आहे. हा बंद शुक्रवारपर्यंत राहणार आहे.