13 days ago
मुंबई:

राज्यभरात आज पोलीस भरतीला सुरुवात झाली असून  एकूण 17000 जागेसाठी ही भरती होत आहे. दरम्यान पहाटेपासूनच विद्यार्थी भरतीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा संकुल आणि मैदानांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दुसरीकडे मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून येलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

Jun 19, 2024 14:05 (IST)

'एक दिवस तरी वारी अनुभवावी'; शरद पवारांसह मान्यवर चालणार एक दिवस वारीत

पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर  सहभागी होणार  आहेत. 

Jun 19, 2024 13:56 (IST)

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ उज्वला जाधव आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद पार पडेल. 

Jun 19, 2024 13:34 (IST)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 185 पोलीस शिपाई पदांची भरती पुढे ढकलली

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 185 पोलीस शिपाई पदांची भरती पुढे ढकलली

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदांची भरती घेण्यात येत आहे. आज 700 उमेदवार नवी मुंबईच्या मुख्यालयामध्ये मैदानी परीक्षेसाठी हजर झाले. मात्र काल रात्री झालेल्या पाऊसामुळे मैदानाची पाहणी करण्यात आली. यावेळी चाचणी घेण्यासाठी मैदान योग्य अवस्थेत नसल्यामुळे 19 जून आणि 20 जूनची मैदानी चाचणी ही 23 जूनला होणार आहे. 21 जून आणि 22 जूनच्या उमेदवारांची चाचणी  27 जूनला होणार आहे. मैदानावर हजर असलेल्या उमेदवारांना लेखी समजपत्र देण्यात आले आहे. जे उमेदवार येणार आहेत त्यांना संदेश, मेल, दूरध्वनी द्वारे माहिती कळवण्यात आली आहे.

Jun 19, 2024 13:31 (IST)

हर्शे चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर सापडल्याने खळबळ

हर्शे चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदीर सापडल्याने खळबळ

Advertisement
Jun 19, 2024 11:51 (IST)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र 

मुंबईत 21 जून रोजी राज्यातल्या भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे. 18 जून रोजी दिल्लीत भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यात लोकसभा निवडणूक आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. 

Jun 19, 2024 11:48 (IST)

रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट, सकाळपासून पावसाची संततधार

रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट, सकाळपासून पावसाची संततधार

रत्नागिरी जिल्हयात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. आज सकाळपासून  पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात  19 दिवसात पावसाने 300 मिलीमीटरची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस हा चिपळूण तालुक्यात पडला असून चिपळूणमध्ये आजपर्यंत 436 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये सरासरी 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 

Advertisement
Jun 19, 2024 11:34 (IST)

नरहरी झिरवळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिकमध्ये महायुतीला झटका, नरहरी झिरवळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा, कौटुंबिक संबंधांमुळे पाठिंबा दिल्याचं वक्तव्य 

Jun 19, 2024 11:25 (IST)

शरद पवार यांचे बारामती तालुक्यातील निरावागज गावात आगमन

शरद पवार यांचे बारामती तालुक्यातील निरावागज गावात आगमन झाले असून शरद पवारांकडून आज बारामती तालुक्यातील विविध गावांचा गावभेट दौरा आहे. दुस-या दिवशी ते बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. 

Advertisement
Jun 19, 2024 11:19 (IST)

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन अन् बॅनरबाजी...

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन आहे आणि त्याच्या कार्यक्रमाची तयारी वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडत आहे. डोम परिसरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून बॅनरबाजी होताना दिसत आहे. ज्यावर काही विधानं लक्ष वेधून घेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत विचारांच्या कट्टर शिवसैनिकांचे स्वागत असल्याचं विधान असेल किंवा 'भगवं आहे रक्त गर्वाने सांगावे' अशी विधानं आपल्याला ह्या पोस्टर्सवर दिसतायत. संध्याकाळी 7 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांशी संवाद साधताना दिसतील. लोकसभा निवडणूक आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचे असेल. 

Jun 19, 2024 11:17 (IST)

शरद पवार साहेब हे दैवत आहेत - नरहरी झिरवळ

शरद पवार साहेब हे दैवत आहेत - नरहरी झिरवळ 

Jun 19, 2024 09:38 (IST)

आईस्क्रिममध्ये आढळलेलं ते बोट कुठून आलं? मोठी अपडेट समोर

आईस्क्रिममध्ये आढळलेलं ते बोट कुठून आलं? मोठी अपडेट समोर

मालाडमधील एका व्यक्तीच्या आईस्क्रिममध्ये मानवी तुटलेलं बोट आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. ही आईस्क्रिम तयार केलेल्या पुण्यातील एका फॅक्टरीत बोटाला दुखापत झालेली व्यक्ती आढळून आली आहे. पोलिसांनी डीएनए मॅचिंगसाठी नमुना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबतची ठोस माहिती समोर येईल, असं पोलिसांचे म्हणणे आहे.

Jun 19, 2024 09:19 (IST)

पुढच्या वर्षीपासून काजवा महोत्सवावर बंदी आणण्याची सरकारकडे मागणी

राज्यात काजवा महोत्सव ज्या व्यक्तीने सुरू केला, त्या अंबरीश मोरे यांनी पुढच्या वर्षीपासून काजवा महोत्सवावर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या महोत्सवाच्या नावाखाली पर्यटकांकडून पर्यटनाला हानी पोहोचवली जात असून काजव्यांनाही धोका पोहोचवला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Jun 19, 2024 09:13 (IST)

6 जुलैपासून मराठवाड्यात मराठ्यांचा पुन्हा महाएल्गार

6 जुलैपासून मराठवाड्यात मराठ्यांचा पुन्हा महाएल्गार 

सगे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करण्यासाठी आठ जिल्ह्यात मराठा समाजाचा लॉग मार्च निघणार आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. मराठवाड्यात 6 जुलैपासून आठ जिल्ह्यातून लॉग मार्च निघणार आहे. 

Jun 19, 2024 09:11 (IST)

आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाकडून दणका

आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या 2 दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात 11 हजार 500 रूपयांचा दंड आकारण्यात आला. सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून घाटात अस्वच्छता करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कचरा टाकणाऱ्या 2, धूम्रपान करणाऱ्या 3, मद्यपान करणाऱ्या 2 तर माकडांना खाऊ घालणाऱ्या 6 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Jun 19, 2024 08:03 (IST)

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन, शिंदे-ठाकरे गटात चढाओढ

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोन्ही पक्षांकडून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यावरून चढाओढ पाहायला मिळत आहे. 

Jun 19, 2024 08:00 (IST)

पाण्यासाठी वणवण, नाशिकमधील धक्कादायक दृश्य

नाशिकमधील या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य असून अर्धा जून महिना उलटून गेला तरी येथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिकमधील धक्कादायक दृश्य

Jun 19, 2024 07:58 (IST)

चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे पाणीपुरीतून अनेकांना विषबाधा

चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे पाणीपुरीतून अनेकांना विषबाधा 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कमळगाव व परिसरातील गावांमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून उलटी, ताप, मळमळ यासारखी लक्षणे जाणू लागल्याने काही जणांना अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली असून सुदैवाने सर्वांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.