जाहिरात

Nagpur News: 'एनडीटीव्ही'च्या बातमीचा दणका! 'PWD'मधील घोटाळ्याची बावनकुळेंकडून गंभीर दखल; कडक कारवाई होणार

Chandrashekhar Bawankule News: . सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयातील  भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडल्याबद्दल त्यांनी NDTV मराठीचे आभार मानले.

Nagpur News: 'एनडीटीव्ही'च्या बातमीचा दणका!  'PWD'मधील घोटाळ्याची बावनकुळेंकडून गंभीर दखल; कडक कारवाई होणार

संजय तिवारी, नागपूर: राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणात कडक कारवाई होईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. होळीनिमित्त घरी रंगांची उधळ करण्यासाठी बावनकुळे यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज देशभरासह राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सिनेविश्वातील सेलिब्रेटी, राजकीय नेते मंडळीही रंगांची उधळण करत मोठ्या जल्लोषात होळीचे सेलिब्रेशन करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसोबत होळी खेळली. यावेळी बोलताना त्यांनी एनडीटीव्ही मराठीने उघड केलेल्या अभियंता कार्यालयातील घोटाळा प्रकरणात कडक कारवाई होईल, असे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयातील  भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडल्याबद्दल त्यांनी NDTV मराठीचे आभार मानले. तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या प्रकरणी गुंतलेल्या दोषींवर कारवाई होईल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, महसूल खात्यातील सेवा सामान्य नागरिकांना तत्काळ उपलब्ध होतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आपण कार्यकर्ते असताना कशाप्रकारे होळीचे सेलिब्रेशन केले, याबाबतच्या आठवणीही त्यांंनी यावेळी सांगितल्या. 

( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )

काय आहे बांधकाम विभागातील टक्केवारीचा खेळ?

राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिरिक्त कामासाठी मुख्य अभियंता एक टक्के रक्कम घेतात, असा खळबळजनक खुलासा एका त्रस्त कामगाराने केला होता. याचा व्हिडिओही समोर आला होता, ज्यानंतर एनटीव्ही मराठीने हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये पैश्यांची मागणी केली जाते का, आणि टक्केवारी विचारली जाते का, मुख्य अभियंत्यांच्या नावावर अतिरिक्त कामासाठी एक टक्का रकमेची मागणी केली जाते का, आणि वाटाघाटी केली जाते का, आणि नोटा मोजणी करून त्या स्वीकारल्या जातात का? असा सवाल उपस्थित आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: