जाहिरात
10 minutes ago

एकीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारवरुन राजकारण सुरु असतानाच मनसेने पनवेलमध्ये राडा घातल्याचे समोर आले आहे. मनसेने पनवेलमध्ये एक बार फोडल्याची घटना घडली आहे. राज ठाकरे यांनी रायगडमधील शेकापच्या मेळाव्यातून हा मुद्दा छेडला होता. त्यानंतर लगेचच पनवेलमधील बार फोडण्यात आला. 

LIVE Updates: मनसेचा उद्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा

मनसेचा उद्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा 

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा 

 सकाळी १० वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे इथे मनसेचा मेळावा 

 मनसेचे नेते,सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी राहणार मेळाव्यासाठी उपस्थित 

 आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा उद्याचा मेळावा

LIVE Updates: शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेचे 54 लाख 60 हजार रुपये उकळले

 पिंपरी येथे शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 5 ते 20 % परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 54 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

LIVE Update: मंगळवेढ्यात भीषण अपघात..स्कूटरवरील महिलांना चिरडले

मंगळवेढ्यात भीषण अपघात...

मालवाहूट्रकने स्कूटरवरील महिलांना चिरडले...

ट्रकची धडक लागल्याने स्कूटरवरील महिला जागेवरच मृत्युमुखी

दामाजी कारखान्याच्या बायपास रोड नजीक झाला अपघात

LIVE Update: पोलीस ठाण्यात जावून दादा्गिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगल, मेघना बोर्डीकरांचा पलटवार

मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगीनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी  करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे. 

जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका…

कृपया, 

अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे टीव्ट करणे  बंद करा, 

पोलीस ठाण्यात जावून दादा्गिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगल… 

जय जिजाऊ , जय अहील्या , जय सावित

Jalgaon News: भुसावळ येथील साकरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची हरिणाला धडक

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील साकरी फाट्याजवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने हरिनाला धडक दिली असून यात हरीण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान स्थानिकांनी हरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले व याबाबत वनविभागाला माहिती देत जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी हरिनाला वनविभागाच्या ताब्यात दिले.

LIVE Update: बुटीबोरी येथे बंदुकीच्या धाकावर लूटमार करणाऱ्यांना वर्ध्यात अटक

बुटीबोरी येथे बंदुकीच्या धाकावर लूटमार करणाऱ्यांना वर्ध्यात अटक

- वर्ध्यातील मस्जिद चौकात पोलिसांची कारवाई

- गुन्हे शाखेतील पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींना केली अटक.

-  चार आरोपी अटकेत, एक फरार

- घटनेतील दोन आरोपी वर्ध्यातील आहे.

-  रात्री उशिरापर्यंत चालली पोलिसांची कारवाई.

- आरोपींना दिले बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात

- आरोपींकडे दोन माऊजर असल्याची माहिती

LIVE Update: बुटीबोरी येथे बंदुकीच्या धाकावर लूटमार करणाऱ्यांना वर्ध्यात अटक

बुटीबोरी येथे बंदुकीच्या धाकावर लूटमार करणाऱ्यांना वर्ध्यात अटक

- वर्ध्यातील मस्जिद चौकात पोलिसांची कारवाई

- गुन्हे शाखेतील पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींना केली अटक.

-  चार आरोपी अटकेत, एक फरार

- घटनेतील दोन आरोपी वर्ध्यातील आहे.

-  रात्री उशिरापर्यंत चालली पोलिसांची कारवाई.

- आरोपींना दिले बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात

- आरोपींकडे दोन माऊजर असल्याची माहिती

LIVE Update: मालेगावात पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

मालेगावच्या गुलशेर नगर भागात गावठी पिस्टलमधून गोळीबार करीत  कोयता व लोखंडी पाईपने एका तरुणाला जखमी करून दहशत निर्माण करणाऱ्या  शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी दादा याच्यासह चार सराईत गुन्हेगारांना पावरवाडी  पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.त्याची परिसरातील रस्त्यांवरून धिंड काढली.रब्बानी दादा त्याची टोळी परिसरात हप्ता वसुली, प्राणघातक हल्ले करून नागरिकांत दहशत निर्माण करीत होती.मात्र पोलिसांनी त्यांची धिंड काढत पोलिसांचा धाक व कायद्याचे राज्य  असल्याची ग्वाही देत नागरिकांना भयमुक्त केले.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com