Maharashtra LIVE Blog: गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर ओसरला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
Live Update : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत मोठी बातमी
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणूकीत प्रभाग रचनेत मोठे बदल नाहीत. 2017 च्या निवडणूकीतील प्रभाग रचना जवळपास जैसे थे, राहिल अशी माहिती सुत्रांनी दिलीय. कोस्टल रोड, मेट्रो सारख्या विकासकामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात येणार आहेत.
वॉर्डातील लोकसंख्यावाढीचा प्रभाग रचनेवर परिणाम नाही. मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. सूचना आणि हारकतीनंतर 6 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रारुप आराखडा सादर होणार आहे. जानेवारी 2026 मध्ये मुंबईच्या नव्या महापौराची निवड होण्याची शक्यता आहे.
Live Update : माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर ठोकला मानहानीचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मानहानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांनीच ट्वि्ट करत ही माहिती दिली आहे.
'माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला?' , असा सवाल पवार यांनी या ट्विटमध्ये विचारला आहे.
माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती… pic.twitter.com/jZhq2phiK1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2025
Live Update : बीडमध्ये वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावरच जीवघेणा हल्ला
बीडमधली वाढती गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनला आहे. एकापाठोपाठ खुणाच्या घटना ताज्याच असताना आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून गीताई या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विलास मस्के असं गंभीर असलेल्या समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून विलास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे.
भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल, भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याच्या आदेशाला स्थगिती. भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश बदलला जात आहे. कुत्र्यांना किडेनाशक औषधं दिली जातील.
वैक्सीन दिली जाईल आणि पुन्हा त्याच क्षेत्रात सोडले जाईल. कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न दिलं जाणार नाही. कुत्र्यांसाठी अन्न देण्यासाठी वेगळी सोय करावी. नसबंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. हा अंतरिम आदेश आहे.
Dharashiv News: मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा ताफा अडवला
धाराशिवच्या सारोळा गावात मराठा आंदोलकांनी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा ताफा अडवला. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका, त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची रामदास आठवले यांच्यासमोर एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आठवले यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदनही दिले.
Live Update: पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. मुठा नदीत आता ६६०३ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मुठा नदीतील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नदी लगत असलेल्या ज्या भागात पाणी शिरले होते ते आता बंद झाले आहे. आज सकाळपासून पुणे शहरात पावसाची विश्रांती आहे.
Nagpur News : नागपूरमधील डान्सबारवर पोलिसांचा छापा; मध्य प्रदेश, पुण्यातून आले होते ग्राहक
नागपूरातील कळमना परिसरात शिवशक्ती डान्सबारवर पोलिसांचा छापा. तोकड्या कपड्यात नृत्य करणाऱ्या डान्सरवर सुरु होती पैशाची उधळण. २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, मध्य प्रदेश, पुण्यातून पोहोचले ग्राहक. नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं केली कारवाई. सर्व आरोपींना कळमना पोलीस स्टेशन यांच्याकडे सोपवण्यात आलं. बुधवारी मध्यरात्री एक वाजता करण्यात आली कारवाई.
Live Update : पुणे जिल्ह्यातील गणपती मंडळाची देखील पोलीस अधीक्षकांसोबत बैठक
पुणे जिल्ह्यातील गणपती मंडळाची देखील पोलीस अधीक्षकांसोबत बैठक
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासोबत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व मुख्य मंडळांची बैठक पार पडली.
गणेशोत्सवात लाईट-लेझर शो टाळा ग्रामीण भागातील गणेश मंडळांना पोलीस अधीक्षकांच्या सूचना
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी एका मंडळांनी किमान ४ CCTV बसवण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्या गणेश मंडळाना सूचना
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ध्वनिप्रदूषण वाढविणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक व लाईट-लेझर शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिल्या
ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे लोणावळा, खेड, जुन्नर आणि शिरूर उपविभागातील १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १२८ गणेश मंडळाध्यक्ष, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली
Live Updates: ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? या महिन्यात लवकर पगार होणार?
ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? या महिन्यात लवकर पगार होणार?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपती आधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश
आजच्या आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश
याचसोबत वित्त विभागात देखील बोलणी करून एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी एक ते दोन दिवसात हस्तांतरील करण्याची केली विनंती