Maharashtra Rain : नोव्हेंबर महिना उजाडला तरीही अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाही. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोंथा चक्रीवादळ निवळलं आहे. परिणामी छत्तीसगडमधील ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
यंदाची नवरात्र आणि दिवाळीदेखील पावसाने गाजवली. आता तुळशीचं लग्न केल्याशिवाय पाऊस एग्झिट घेणार नसल्याचं चित्र आहे. आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्या २ नोव्हेंबरला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पावसासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर ६ नोव्हेंबरपर्ंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
नोव्हेंबर (Rain in November) महिन्यात देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आयएमडीकडून व्यक्त केली जात आहे. मध्य महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीडचा काही भाग, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा; तुमच्या स्टेशनवर सुरु होणार खास सोय, पहा संपूर्ण यादी
#नोव्हेंबर महिन्यात देशात बहुतेक ठिकाणी #पाउस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक.फक्त उत्तरोत्तर भारतात काही ठिकाणी, द.भारतात काही ठिकाणी तो सरासरीपेक्षा कमी असू शकतो#राज्यात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता.ठिपक्यांच्या जागी Nov पावसाची आकडेवारी कमी.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 31, 2025
IMD pic.twitter.com/WcfKv1t123
शनिवारनंतर मुंबई कोरडं वातावरण...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. दिवाळीतही पाऊस असल्याने प्रदूषणाची पातळी कमी होती. शिवाय हवेत गारवाही आहे. मात्र शनिवार, १ नोब्हेंबरनंतर मुंबईतील हवा कोरडी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world