राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. भाजप आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराडची गुन्हेगारीबाबत तसेच त्याने जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे केले आहेत. दुसरीकडे आज जालन्यामध्येही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण, बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण, बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. अपघाताला बसमधील तांत्रिक बिघाड जबाबदार असल्याचा दावा करत संजय मोरेने केली होती जमिनीची मागणी. संजय मोरेच्या जामीनाला पोलिसांनी केला होता विरोध. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो पोलिसांनी व्यक्त केली होती भीती. 9 डिसेंबरला झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 42 जण जखमी झाले होते.
मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालना येथे मराठा समाजाचा आक्रोश मोर्चात सहभाग झाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. थकवा जाणवत असल्याने त्यांनी भाषण करणेही टाळले. अखेर उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी आहे, बॅक पेन जास्त आहे. त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढचे उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
पुरंदरमध्ये एसटी आणि बाईकचा अपघात, एकाचा मृत्यू
पुणे : पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू, विजय कोंढाळकर असं मृत व्यक्तीचं नाव.
धनंजय मुंडे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
धनंजय मुंडे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. छगन भुजबळ साहेब यांची आज मुंबईत सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अनेक वर्ष श्री. भुजबळ साहेबांनी मंत्री म्हणून काम केलेले असल्याने या खात्यातील कामकाजासंबंधी त्यांनी मार्गदर्शनही केले.… pic.twitter.com/LkQBadBWRu
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 10, 2025
Live Updates: बीड व परभणी प्रकरणी उद्या वाशिममध्ये मोर्चा
बीड येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणी सर्व आरोपिंना फाशी द्यावी यासाठी उद्या वाशिम जिल्ह्यात सर्व पक्षीय-सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था, आणि संवेदनशील नागरिकांच्या वतीनं महा मूकं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आमदार सुरेश धस, खासदार संजय देशमुख आणि इतर राजकीयनेते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या मोर्चाच्या तयारीसाठी आज वाशिमच्या विश्रामगृह इथं बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं.
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंची घेतली सांत्वनपर भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे काही दिवसा अगोदर वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यानिमित्त नाना पटोले यांच्या घरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी आले.नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे त्यांच्या राहत्या घरी आईच्या निधनानंतर तेराव्या दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्त देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले.
Washim News: वाशिमच्या अनसिंगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन
वाशिमच्या अनसिंग येथे जल जीवन मिशन अभियानांतर्गत शहरातील प्रकल्पाचा कालावधी पूर्ण होऊनदेखील ग्रामस्थांना फिल्टर केलेले पाणी मिळाले नाही, या विरोधात यश चव्हाण आणि अन्य ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आलं आहे
ग्रामस्थांनी या आंदोलनाद्वारे त्वरित फिल्टर केलेले पाणी सुरू करावे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये होणारी विलंबाची कारवाई थांबवावी अशी मागणी केली. यश चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी एकत्र येऊन या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केल असून स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांकडून त्वरित कार्यवाई करण्याची मागणी करण्यात आली.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची कोठडी संपत असल्याने आज त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. केज न्यायालयात झालेल्या या सुनावणीत विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mulshi News: मुळशी तालुक्यात बिबट्याची दहशत, अनेक पाळीव प्राणी फस्त
पुण्यातील मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या निवे सारोळे गावाच्या परिसरामध्ये बिबटयाची दहशत. गेल्या आठवड्याभरात शेळ्या, बकऱ्या, कोंबड्यांसह बिबट्याकडून अनेक पाळीव प्राणी फस्त. निवे सारोळे येथील टाटा धरणाच्या ऑफिस बाहेरील cctv मध्ये बिबट्याचा वावर कैद, परिसरातल्या गावातील नागरीक भीतीच्या छायेत. स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी सूचना दिल्यानंतर,वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला पकडण्यासाठी उपायोजना सुरू
Pune Crime: धक्कादायक! हॉर्न वाजवल्यामुळे एका व्यक्तीला बेदम मारहाण
पुण्यात मुंढवा परिसरात चक्क हॉर्न वाजवल्यामुळे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात राजेश नाथोबा वाघचौरे (५०) आणि सुवर्णा वाघचौरे यांना बेदम मारहाण करण्यात आली
आरोपी शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड यांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास चालू आहे आरोपींनी फायटर सारख्या हत्याराने व शहस्त्राने वाघचौरे यांना बेदम मारहाण केली. एवढच नसून आरोपींनी त्यांच्या गाडीवर मोठा दगड देखील फेकून मारला. राजेश वाघचौरेच्या पत्नीला आणि मुलीला छातीत बुक्क्या मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना मुंढवा परिसरात घडली आहे
Chhatrapati Sambhajinagar: ठाकरे गटाला मोठा धक्का, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा शिवसेनेत प्रवेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आठवडाभरापूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी शिंदे गटात प्रवेश केला असतानाच, आता आणखी एक मोठा नेता शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का समाजाला जात आहे....
Live Updates: महाराष्ट्रातील पाणथळ जमिनीच्या जतनावर लक्ष ठेवण्यासाठी याचिका
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील पाणथळ जमिनीच्या जतनावर लक्ष ठेवण्यासाठी एक याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने अभ्यासक म्हणून नियुक्त वकील जनक द्वारकादास यांची नियुक्ती केली, ज्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायचा आहे त्याबद्दल तपशीलवार नोटीस दाखल करून अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 2.25 हेक्टरपेक्षा मोठ्या असलेल्या सर्व पाणथळ जमिनींचे तीन महिन्यांच्या आत सीमांकन आणि पडताळणी करण्याचे निर्देश राज्य पाणथळ प्राधिकरणांना दिले होते. पाणथळ जमीन संवर्धनासाठी प्रचारक असलेले वनशक्ती आणि आनंद आर्य यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला खंडपीठ पुन्हा सुमोटो याचिकेवर सुनावणी करणार आहे.
Uddhav Thackeray: ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही.. उद्धव ठाकरेंचूी भूमिका
"पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही" "ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे"
पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंच्या शिवसेनेत काही पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजीचा सूर आवळला, पक्षात विश्वासात घेत नसल्याचं आणि योग्य मान मिळत नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली
विधानसभा निवडणुकीनंतर काही पदाधिकारी माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याचे तयारीत आहेत. अशा मध्ये माजी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक प्रकारे पक्षाला ब्लॅकमेल केलं जात आहे, पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसून शिवसैनिक हा लढणारा आहे. "त्यामुळे ज्याला जायचं त्यांनी जा मी कोणाला थांबणार नाही" शिवसैनिक लढणार आणि जिंकणार... असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी पधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले... त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
Pune Crime: शुभदा कोहारे हत्या प्रकरण: महिला आयोगाकडून गंभीर दखल
पुण्यात एका २८ वर्षीय महिलेची तिच्या सहकाऱ्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये केलेली हत्या केल्याबद्दल आयोगाने कठोर कारवाईचे निर्देश दिलेत. आयोगाने अधिकाऱ्यांना निष्पक्ष आणि वेळेच्या चौकटीत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. मंगळवारी ही घटना घडली जेव्हा ही महिला तिच्या पुरुष सहकाऱ्याने चाकूने हल्ला केला, असा आरोप आहे. कारण तिने त्याच्याकडून खोट्या बहाण्याने पैसे उधार घेतले होते.
राष्ट्रीय महिला आयोगाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रीय महिला आयोग पुण्यात एका २८ वर्षीय महिलेची क्रूर हत्या झाल्याबद्दल तीव्र निंदा करते, ज्याला तिच्या सहकाऱ्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये चाकूने हल्ला केल्याचे वृत्त आहे, तर आसपासचे लोक हस्तक्षेप करण्यात अपयशी ठरले."
NCW ने अधिकाऱ्यांकडून दोन दिवसांत FIR ची प्रतांसह एक सविस्तर कारवाई अहवाल मागितला आहे.
Live Updates: भविष्यात इंद्रायणी आणि पाहुणा नदी ही पूर्णपणे शुद्ध झालेली दिसेल: मंत्री उदय सामंत
नदीपात्रा लगत असलेल्या उद्योग धंद्याचे रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित पाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सोडलं जात असल्याने , इंद्रायणी नदीची ही अवस्था झालीय , दरम्यान याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प हा एम आय डी सी, पीसीमसी आणि प्राधिकरण असे मिळून आम्ही हा प्रकल्प करतोय त्याचे सल्लागार ही नेमले आहेत त्याचे रिपोर्ट ही 7 ते 8 महिन्यात येतील भविष्यात तुम्हाला इंद्रायणी आणि पाहुणा नदी ही पूर्णपणे शुद्ध झालेली दिसेल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
Beed News: मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच वैद्यनाथ दर्शनाला
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या प्रथमच परळी येथे आल्या आहेत.आज त्यांनी प्रभु वैद्यनाथाचे सहकुटुंब दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांची देखील उपस्थिती होती. पंकजा मुंडे या आज परळी तालुक्यातील तसेच अंबाजोगाई शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
Shirdi Sai baba News: शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण मुकूट, मुंबईतील भाविकाकडून खास दक्षिणा
शिर्डीच्या साईबाबांना नवी मुंबई येथिल एका भाविकांन सुवर्ण मुकूट दान केलाय.. नवी मुंबईतील राघव नरसाळे यासाईभक्त सत्तावीस वर्षीपुर्वी साईंकडे यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली होती त्यानंतर आता त्यांनी आपल्या इच्छाशक्ती नुसार बाबांना 66 ग्रॅम वजनाचा साधारण पाच लाख रुपये किंमतीचा मुकुट श्रद्धापुर्वक दान केलाय..
मध्यान्ह आरती नंतर हा मुकुट साईंना अर्पण करण्यात आला असून साईंच सर्वकाही करवून घेतात, साईंच्या रुग्णसेवेचे वसा जोपासत नवी मुंबईत गरजूंना फक्त शंभर रुपयात रुग्णवाहीका सेवा पुरवत असल्याचे त्यांनी सांगीतल तर त्याच बरोबर साईंना आपण देणार कोण, जे काही आहे ते साईंच असल्याची भावना यावेळी दानशूर भाविकान व्यक्त केलीये..
Kolhapur News: रील्सवरून दहशत पसरवण्याचा ट्रेंड; कोल्हापूर पोलीस वॉच ठेवणार
दहशत पसरवत असलेल्या रील्सचा वाढत असलेला ट्रेंड पाहून ही परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत. पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या कोल्हापूरची वाटचाल यूपी बिहारच्या दिशेनं चालली आहे का? अशी विचारण्याची वेळ आली आहे. एखादा मोक्काअंतर्गत आरोपातील गुंड जेलमधून सुटल्यानंतर एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी हिरो असल्यासारखा व्हायरल करतो. हा व्हायरल व्हिडिओ पाहून कोल्हापुरात गुंडांना पुजण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली? असा संताप निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Vasai Lady Doctor Death: पतीचे अनैतिक संबंध.... मानसिक छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या
पतीचे अनैतिक संबंध आणि त्याच्या शारिरिक - मानसिक छळाला कंटाळून महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वसईमध्ये घडली आहे. डेलिसा परेरा असं या आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी चर्चच्या फादरांना भेटून एक लिफाफ्यात आईला देण्यासाठी चिठ्ठी दिली होती. आईला दिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचा खुलासा झाला असून वसई पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती रॉयल परेरा ला अटक
डॉक्टर डेलिसा परेरा यांच्या आत्महत्येने वसईत खळबळ
आत्महत्येपूर्वी चर्चच्या फादरांना भेटून एक लिफाफ्यात आईला देण्यासाठी चिठ्ठी दिली होती*
आईला दिलेल्या चिठ्ठीतून झाला आत्महत्येचा खुलासा
वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर डेलिसा परेरा यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
वसई पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती रॉयल परेरा ला अटक
Ram Mandir News: श्रीराममंदिर प्रतिष्ठापनेचा पहिला वर्धापनदिन सोहळा 11 जानेवारीला घ्या, विश्व हिंदू परिषदेचे आवाहन
अयोध्येतील श्रीराममंदिर प्रतिष्ठापनेचा पहिला वर्धापनदिन सोहळा 22 जानेवारी ऐवजी तिथीप्रमाणे या शनिवारी 11 जानेवारीला म्हणजे उद्या साजरा करावा, असे विश्व हिंदू परिषदेने आवाहन केले आहे .
अयोध्या येथील श्रीराम मंदिरात गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापना झाली होती. या प्रतिष्ठापनेला या वर्षी तिथीप्रमाणे 11 जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवार दिनांक 11 जानेवारीला प्रथम वर्धापनदिन साजरा करण्याचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले असून त्या दिवशी साठी कार्यक्रम देण्यात आला आहे.
हिंदू बंधू-भगिनीनी जवळच्या मंदिरात एकत्र येऊन रामनामाचा जप करावा, संकीर्तन करावे आणि सामूहिक आरती करुन प्रसाद वितरीत करावा. शिवाय त्या सायंकाळी घराच्या बाहेर पाच दिवे लावावेत. याशिवाय ज्यांना जे जे शक्य असेल त्यांनी विविध पद्धतीने वर्धापन दिनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद कडून करण्यात आले आहे.
Chandrashekhar Bawankule: विरोधकांना आणखी अभ्यासाची गरज.... चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
शरद पवार यांनी मान्य केलं बरं झालं. काल ईव्हीएम आणि मशीनला दोष द्यायचे त्यांनी थोडा अभ्यास केला आहे अजून थोडा अभ्यास करायचा गरज आहे. काय चुकलं याचं आकलन केलं तर गाडी पट्टीवर येवू शकते. लोकसभेच्या निवडणुकीत आमचा एक्सीडेंट झाला ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारल्या आणि जनतेपर्यंत गेलो जनतेला सांगितलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतो, जनतेने मान्य केलं,जनता आमच्यासोबत आहे, महाविकास आघाडी आपापसातल्या वादात पेटले आहेत, महायुती महारष्ट्र व्हिजन घेऊन पुढे जाऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
Western Railway: पश्चिम रेल्वेची लांब पल्याची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेची लांब पल्याची वाहतूक विस्कळीत
मुंबईकडे येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या उशिराने
तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोळमडले.
गुजरात, डहाणू, पालघर हून मुंबईकडे येणारे प्रवासी अडकले.
अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
पश्चिम रेल्वे कडून गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त.
Jalna Morcha News: संतोष देशमुख हत्या प्रकरण: जालन्यामध्ये आज महा जनआक्रोश मोर्चा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला काल एक महिना पूर्ण झालाय या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी व परभणील सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणाची साखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागांसाठी आज मराठा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून महा जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचा आणि दलित संघटनांचा पण सहभाग असणार आहे.
Jalna Morcha News: जालन्यातील जन आक्रोश मोर्चातील आयोजकांना पोलिसांची नोटीस
संतोश देशमुख यांच्या न्यायासाठी जालण्यातील जन आक्रोश मोर्चातील आयोजकांच्या नावे पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत...छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अंबड चोफुली दरम्यान हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे..एकीकडे कदीम पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली तर दुसरीकडे पोलिसांनी नोटिसा देखील पाठवल्या आहेत...मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख , अशोक पडूळ, विश्वभर तीरुखे यांना नोटिसा देण्यात आल्यात...भारतीय नागरिक सुरक्षा सहिता कलम 168 प्रमाणे नोटीसा दिल्या आहेत..
Maharashtra Politics: धाराशिवमध्ये ठाकरे गटाला धक्का, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा भाजप प्रवेश
स्थानिक गटबाजीला कंटाळून ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या विभागीय सचिव पदाचा राजीनामा देत अक्षय ढोबळे यांचा भाजपात पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश झाला.
अक्षय ढोबळे यांनी युवासेना विभागीय सचिव तथा धाराशिव युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. वरूण सरदेसाई यांचे निकटवर्तीय असलेल्या अक्षय ढोबळे यांनी केला अनेक वर्षांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काम केले आहे, मात्र स्थानिक गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे, त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे
Vaduj Crime: तहसीलदार बाई माने यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
55 हजार लाच प्रकरणी तहसीलदार बाई माने यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
वडुज येथील महसूल सहायक प्रवीण नागरे याला 55 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. सदर गुन्ह्यात तहसीलदार बाई माने दोषी आढळल्याने त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. या गुन्ह्यात 5 आरोपी होते. या प्रकरणात तहसीलदार माने यांनी अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालय अर्ज केला होता. तो अर्ज आज न्यायालय ने फेटाळला.
अजुन ही बाई माने यांच्या वर कोणतीही कारवाई झाली नसल्याने या प्रकरणामध्ये माने यांच्यावर कुणाचा हात आहे अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये होत आहे.
Jalgaon Crime: तीस वर्षीय तरुणावर गोळीबार.. जळगाव हादरलं
भुसावळ शहरात तीस वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. खडका रोड अमरदीप टॉकीज जवळील एका चहाच्या दुकानात तहरीन नजीर शेख या तरुणावर गोळीबार करण्यात आला. तहरीन शेख हॉटेलमध्ये चहा पीत असताना दुसऱ्या एका तरुणाने तहरींवर झाडल्या पाच फैरी झाडात केला गोळीबार. गोळीबार नंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवले. सकाळी सात वाजता घडलेल्या या घटनेमुळे भुसावळ शहरात उडाली खळबळ . घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
Nashik News: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्याने खळबळ
- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्याने खळबळ
- सर्कल दोन मधील बॅरेक क्रमांक आठ जवळ जमिनीत एका कर्मचाऱ्याला आढळून आला मोबाईल
- शौचालयाच्या मागील बाजूस तंबाखुच्या पिशवीत गुंडाळून जमिनीत पुरण्यात आला होता मोबाईल
- कारागृहात मोबाईल कसा आला आणि कोणाचा ? याबाबत तपास सुरू
- तुरुंगाधिकारी हिरालाल भामरे यांच्या तक्रारीनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Latur Accident: दुचाकी- बसचा भीषण अपघात, 1 ठार
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव रोडवर एस.टी बस व मोटरसायकलचा अपघात होऊन मोटर सायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. महावीर विश्वनाथराव गुंटे वय वर्ष ३८ रा. ढाळेगाव अस मयत व्यक्तीचं नाव आहे.. विश्वनाथ गुंटे हे मोटरसायकल क्रमांक एम एच 23 एस.8096 बजाज डिस्कव्हर गाडीवरून हे धसवाडी रोडवरील शेताकडून घराकडे जात असताना एस.टी बस व मोटरसायकलचा समोरा समोर अपघात होऊन जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला... पुढील तपास पोलीस करत आहेत..
Santosh Deshmukh Murder: मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धसांकडून वंजारा समाजाची बदनामी
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे, अंजली दमानिया आणि आ.सुरेश धस हे वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत असून चिथावणी देत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी वंजारी समाजाची भूमिका आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आकसबुद्धीने आरोप करण्यात येत असून, वंजारी समाजाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे जरांगे, दमानिया आणि आ.धस यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वंजारी समाजबांधवांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील 7 पंचायत समितीची आज आरक्षण सोडत
जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या सभापती पदाचा सध्याचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आता या सातही पंचायत समितीत नवे सभापती व उपसभापती निवडले जाणार आहेत. सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे.मे-2022 मध्ये सातही पंचायत समितीवर सभापती आरूढ झाले होते. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यातच संपला आहे. नियमानुसार सभापदासाठी मुदतीपूर्वी आरक्षण काढणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी 3 ऑक्टोबर 2024 रोजी आरक्षण सोडतीची तारीख व वेळ निश्चित केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही जारी केला होता.
Palghar News: मनसेला मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रची नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील ३० ते ३२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या टेंभी नाका येथे जाहीर प्रवेश सोहळा पार पडला असून मनसे पक्षात पदाधिकाऱ्यांना पाठबळ मिळत नसल्याचा आरोप यावेळी मनसैनिकांकडून करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या भावाला मारहाण केली होती. त्यावर पक्षाकडून कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.