जाहिरात

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक! जूनमध्ये मोठा राजकीय भूकंप? खासदारांची चाचपणी, पडद्यामागे काय घडतंय?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी ऑपरेशन टायगरमध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे सांगण्यात येत असून ठाकरेंचे खासदार साथ सोडणार असल्याची चर्चा असून त्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक! जूनमध्ये मोठा राजकीय भूकंप? खासदारांची चाचपणी, पडद्यामागे काय घडतंय?
  • शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे
  • उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली पण फक्त 4 खासदार उपस्थित होते
  • जूनमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाकरेंचे 9 पैकी फक्त 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर 5 खासदार हे या बैठकीला ऑनलाईन हजर होते. या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक, जूनमध्ये राजकीय भूकंप?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून २० जून २०२२ रोजी बंड केले होते. या दिवशी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ते समर्थक आमदारांसह सुरतच्या दिशेने रवाना झाले ज्यामुळे महाराष्ट्रात सत्तापालट होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आता पुन्हा एकदा जून महिन्यातचं मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोलले जात आहे. 

 जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी ऑपरेशन टायगरमध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे सांगण्यात येत असून ठाकरेंचे खासदार साथ सोडणार असल्याची चर्चा असून त्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या खासदारांनी पक्ष सोडण्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांकडे विचारपूस केली असल्याचंही सांगण्यात येत असून शिंदे शिवसेनेत गेल्यास कितपत नुकसान होणार याची चाचपणी केली गेल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील उबाठाचे खासदार शिंदे शिवसेनेच्या मार्गांवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे जून महिना ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं बोलले जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com