अजिंक्य धायगुडे, पाटील: पुणे
Bacchu Kadu Ashok Kharat Viral VIDEO: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातशी अनेक राजकीय नेत्यांशी कनेक्शन समोर येत असून बडे नेते त्याचं भक्त असल्याचे दिसत आहे. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून प्रहारचे नेते बच्चू कडू यांचाही कॅप्टन खरात सोबतचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बच्चू कडूंचा कॅप्टन खरातसोबतचा व्हिडिओ व्हायरल
कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशातच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचाही अशोक खरात याच्यासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कॅप्टन अशोक खरात बच्चू कडूंशी बोलत त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगतो. I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या, असं कॅप्टन खरात बच्चू कडू म्हणताना दिसत आहे, ज्यानंतर बच्चू कडू त्याच्या पाया पडत आहेत.
VIDEO: अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकरांचा सर्वात मोठा खुलासा; प्रत्यक्षदर्शींनी सगळं सांगितलं
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे २०२२ च्या महाविकास आघाडी सरकारच्या बंडखोरीत बच्चू कडू शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते, तरीही त्यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यात बच्चू कडू यांचा समावेश होता. बंडानंतर शिंदे सरकार स्थापन झाले, परंतु बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
भोंदू बाबा खरातच्या पाया पडले बच्चू कडू...#VideoViral #AshokKharat pic.twitter.com/6ughxOUmBy
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) March 24, 2026
कॅप्टन खरात प्रकरणावर काय म्हणाले बच्चू कडू?
दरम्यान, एक दिवसापुर्वीच बच्चू कडू यांनी या भोंदुबाबा प्रकरणावर बोलताना महत्त्वाचे विधान केले होते. भोंदू बाबाच्या वाढत्या जमातीला आपणच कारणीभूत आहोत. नेते तर जबाबदार आहेतच आणि लोकही तेवढे जबाबदार आहेत. एवढे खुळे नेते आहेत की तिथे जाऊन पाय पसरतात, पाया पडतात, पाय धुतात. कठीण आहे बापाचे पाय धूत नसतील त्याचे पाय धुतात, असं ते म्हणाले होते. तसेच राजकीय नेत्यांसोबत कोणीही फोटो काढते म्हणजे त्याला जबाबदार राजकीय नेत्याला धरायचे कसे? असा उलट सवालही बच्चू कडू यांनी केला होता.
Ahilyanagar Crime: नगरमध्ये मोठा राडा! बाळासाहेब थोरातांच्या भावाकडून अधिकाऱ्याला मारहाण
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world