सुनील दवंगे, अहिल्यानगर:
Ahilyanagar News: अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटारव कोकाटे यांना कार्यालयातच घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या चुलत भावासह 10 जणांकडून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पंचायत समितीत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर येथील पंचायत समिती कार्यालयात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. पंचायत समिती कार्यालयामध्ये घुसून तालुका अभियान व्यवस्थापकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नंदलाल पोपटराव कोकाटे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
VIDEO: अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकरांचा सर्वात मोठा खुलासा; प्रत्यक्षदर्शींनी सगळं सांगितलं
राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ शरद थोरात व त्यांच्या समर्थकांकडून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 5-6 जणांकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. या मारहाण प्रकरणात रात्री उशिरा संगमनेर शहर पोळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रायवाडी या गावांमध्ये बिडी ओढताना अंथरुणाला आग लागल्याने एकाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, यात ग्यानोजी जमदाडे या 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.. या व्यक्तीला अर्धांगवायूचा आजार होता त्यात बिडी पिण्याची तलब असल्याने अंथरुणावर आगपेटी पेटवून बिडी ओढत असताना अंथरुणाला अचानक लागून यात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Pune News: वसंत मोरेंना झटका! कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; कारण काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world