जाहिरात

Sunil Tatkare: 'सचिन तेंडुलकर अन् अजित पवारांचा रेकॉर्ड मोडणे अशक्य...', सुनील तटकरेंचे विधान

आमच्या आणि राज्यातील जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत  की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत," अशी इच्छाही सुनील तटकरेंनी व्यक्त केली. 

Sunil Tatkare: 'सचिन तेंडुलकर अन् अजित पवारांचा रेकॉर्ड मोडणे अशक्य...', सुनील तटकरेंचे विधान

रायगड: रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे, यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम कोणी मोडू शकत नाही, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले सुनील तटकरे?

"राज्यात उपमुख्यमंत्री पद 1978 साली पहिल्यांदा निर्माण झाले, पण सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री व्हायचा आणि राज्याचा अर्थ संकल्प मांडण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम जसा मोडला जाणार नाही तसा अजित पवारांचा सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम मोडला जाणार नाही," असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले. 

Raj Thackeray MNS: 'अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..', राज ठाकरेंचे सरकारला थेट आव्हान

आज "राज्यातच नव्हेतर देशभरात अजित पवार यांचे नेतृत्व एका वेगळ्या पद्धतीने ओळखले जात आहे. संसदेतही अजित पवार क्या कर रहे है? अशा विचारणा होते. तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आनंद होतो, एक प्रकारचा विश्वास मिळतो असे म्हणत आमच्या आणि राज्यातील जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत  की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत," अशी इच्छाही सुनील तटकरेंनी व्यक्त केली. 

Maharashtra CM Devendra Fadnavis: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नेहरूंनी मांडला होता!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com