
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर त्याचे विश्लेषण सुरू आहे. काही जण त्यांच्या भाषणाचं कौतूक करत आहेत. तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत. अशा वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.या ट्वीटमुळे ट्वीस्ट निर्माण होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ट्वीटमध्ये अजित पवार आणि राज ठाकरे यांची तुलना करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले आहे. त्यात ते म्हणतात. राज ठाकरे यांनी काल केलेलं भाषण नक्की ऐकलं पाहिजे.राजकीय फायद्यासाठी आज बरेच नेते खरं बोलणं टाळतात. दिशाभूल करतात. परंतु राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल पण स्पष्ट बोलणारे नेते अजित दादा पवार आणि राज ठाकरे हे दोनच आहेत. असं म्हणत त्यांनी या दोन नेत्यांमधील साधर्म्य सांगितलं आहे. एक प्रकार तुलनाच त्यांनी एकमेकांशी केली आहे.
पुढे ते लिहीतात दोघांनीही कधी जातीचं,धर्माचं राजकारण केलं नाही.दोघेही सत्य परस्थिती डोळ्यासमोर ठेऊन परखडपणे भूमिका मांडतात. असं सागंत यशवंतराव चव्हाण साहेब यांचे पुरोगामी आणि आधुनिक विचाराचे वारसदार अजित पवार आहेत. तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे राज ठाकरे आहेत असं त्यांनी थेट सांगितलं आहे. त्यांच्या या ट्विटनं नवा ट्वीस्ट निर्माण होवू शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज ठाकरे यांनी काल केलेलं भाषण नक्की ऐकलं पाहिजे.राजकीय फायद्यासाठी आज बरेच नेते खरं बोलणं टाळतात दिशाभूल करतात परंतु राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल पण स्पष्ट बोलणारे नेते अजित दादा पवार आणि राज ठाकरे हे दोनच आहेत.दोघांनेही कधी जातीच,धर्माचं राजकारण केलं नाही.दोघेही सत्य…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) March 31, 2025
कारण राज ठाकरे यांनी आपल्या भाषणा गंगा नदीची स्वच्छता, औरंगजेबाची कबर याबाबत मांडलेली मतं ही महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेसाठी अडचणीची आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांने राज हे खरं बोलले असं म्हणून महायुतीत भाजप आणि शिवसेनेची एक प्रकार कोंडी केली आहे. तसं पाहीलं तर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कधी ही जमलं नाही.त्यांनी नेहमीच अजित पवारांवर टीका केली आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्याच नेत्याने राज ठाकरे यांचे गुणगान गायले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world