Maharashtra Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता पावसाळा संपला असं अनेकांना वाटत असेल. मात्र अद्यापही पावसाळा संपलेला नाही. पुढील सात दिवस राज्यातील 17 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंजाबसह अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. पुरामुळे येथील अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यंदा लवकर म्हणजे मे महिन्यात पावसाला सुरुवात झालेली असली तरी सप्टेंबर महिन्यात पावसाळा संपेल असे अनेकांनी अंदाज बांधले असतील. मात्र हवामान विभागाकडून पुढील सात दिवसांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस उत्त पश्चिम भारतात पावसाचा अंदाज आहे. उत्तरपूर्व भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मेघालय, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाची अंदाज आयएमडीकडून व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा - Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील ते खिळे नव्हते; मग नेमकं काय घडलं? कंत्राटदाराचा वेगळाच दावा
महाराष्ट्रात काय असेल स्थिती?
महाराष्ट्राबद्दल सांगायचं झाल्यास, हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पुढील सात दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यल्लो ते ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमळा, परभणी, बीड आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
सिंधुदुर्गमध्ये यंदा समाधानकारक पाऊस
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भातशेती बहरली. सध्या भाताच्या रोपाला फुलोरा दिसून येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पाऊस अतिशय मुबलक झाल्याने पावसाळी भात शेतीला पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या जून पासून साडेतीन महिने अतिशय सुंदर पद्धतीचा पाऊस झाला आहे. परिणामी यावर्षी ची भात शेती अतिशय सुंदर पद्धतीने उगवलेले पाहायला मिळत आहे. आता सप्टेंबर महिन्यात पाऊस जवळपास परतीचा मार्गावर असणार असून शेती आता पोटरायला सुरुवात झाली आहे. अशाच पद्धतीने पावसाने जर अजून उसंत घेतली तर यावर्षी भात शेती चांगल्या पद्धतीने उबरणार आहे.. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट मानली जात आहे.