जाहिरात

Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील ते खिळे नव्हते; मग नेमकं काय घडलं? कंत्राटदाराचा वेगळाच दावा

छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खिळे ठोकले गेल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.

Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील ते खिळे नव्हते;  मग नेमकं काय घडलं? कंत्राटदाराचा वेगळाच दावा
भररस्त्याच्या काही भागात खिळेसृश्य वस्तू ठोकण्यात आली होती.

संजय तिवारी, प्रतिनिधी

Samruddhi Highway News : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री तीन गाड्यांचे टायर फुटल्याची घटना समोर आली होती. महामार्गावरील काही भागावर लावलेल्या खीळे सदृश्य टोकदार वस्तूंमुळे वाहनांचे टायर अक्षरश: फाटून गेले होते. काही गडबड असल्याचं लक्षात येताच त्यांनी मागच्या वाहनांना थांबवलं. समृद्धी महामार्गावर वेगाने वाहनं येत असतात, त्यांना वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. 

मात्र समृद्धी महामार्गावरील काही भागात ठोकलेली खिळेसदृश्य वस्तू ग्राउटिंग इन्जेक्शनचे नोजल असल्याचं समोर आलं आहे. रस्ते दुरुस्तीसाठी हा उपाय केला जातो.  


समृद्धी महामार्गावरील कथित खिळ्यांप्रकरणी तज्ज्ञ जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार...

रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउटिंग (Epoxy Grouting) हा काँक्रीट रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक प्रभावी उपाय आहे. विशेषतः जेव्हा भेगा स्थिर आणि फार मोठ्या नसतात. तेव्हा या प्रकाराद्वारे रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र डामरी (asphalt) रस्त्यांसाठी हा उपाय योग्य नसल्याचं म्हटलं जातं. 

Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही

नक्की वाचा - Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही

इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे काय? What is epoxy grouting?

इपॉक्सी ग्राउटिंगमध्ये दोन भागांचे उच्च-शक्तीचे इपॉक्सी रेझिन (राल) वापरले जाते. हे कमी-चिकट असलेलं (low-viscosity) मिश्रण भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे टाकले जाते. हे रेझिन भेगेमधील रिकाम्या जागेत खोलवर शिरते आणि पूर्णपणे भरते. कडक झाल्यावर ते काँक्रीटला पुन्हा जोडते आणि रस्त्याची मूळ ताकद परत आणते.

बॅरिकेट लावलं होतं पण....

MSRDC चे grouting चे काम सुरू होते. समृद्धी महामार्गावर मुंबई दिशेकडील पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण 15 मीटर लांबीचे सूक्ष्म तडे गेले होते. त्यामध्ये खिळ्यामधून मटेरियल पास करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे काम करत असताना दोन लेन सुरू होत्या आणि काम सुरु असलेल्या लेन मध्ये barricating करण्यात आले होते. असा दावा कंत्राटदारांकडून करण्यात येत असून एक गाडी बॅरिकेट तोडून काम सुरू असलेल्या लेनमध्ये गेल्याने ती पंचर झाली आणि त्यामागे आणखी काही गाड्या पंक्चर झाल्या, असे त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र, नेमकं उलट, वस्तुतः तिथे बॅरिकेटींग नव्हती असा प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com