जाहिरात
2 hours ago

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणात अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरलं असून मुठा नदीत विसर्ग सुरू केल्याने एकता नगरमध्ये पाणी शिरलं. यामुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे. नाशिक धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. 

Ratnagiri Rain: रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला, जगबुडी नदी अजूनही धोका पातळीजवळ

 रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा ओसरला असून, हवामान विभागाने आज जिल्ह्याला पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग अद्यापही अधिक आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४१.७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, दापोली आणि चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर इतर तालुक्यांमध्ये २५ ते ४५ मिमी दरम्यान पाऊस नोंदवला गेला आहे. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, खेडमधील जगबुडी नदी अजूनही धोका पातळीच्या जवळून वाहत असून, संगमेश्वर तालुक्यातील बावनदी देखील दुथडी भरून वाहत आहे.

Nashik News: रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली, दुतोंडी मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले

नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओल्यांडलाचे चित्र असून रामकुंड परिसरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत  पावसाचा इंडिकेटर मानल्या जाणाऱ्या दुतोंडी मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

आळंदीत पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बंद

आळंदी नगरीत हजारो वारकरी दाखल झालेत. मात्र पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बंद आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वारकऱ्यांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आले आहे.

Nashik Rain: नाशिक महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने महापालिका आयुक्तांचा निर्णय. शहरातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाला महापालिकेच्या सूचना.

Kolhapur Rain: पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड–शिरढोण पुलावर पाणी

पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड–शिरढोण पुलावर पाणी आलं आहे.. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून कुरुंदवाड ते शिरढोण मार्गे इचलकरंजीकडे जाणारा मुख्य मार्ग तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक अब्दुललाट ते जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली आहे

Nashik Rain: नाशिकमध्ये आतापर्यंत 120 मिमी पावसाची नोंद

नाशिकमध्ये आतापर्यंत 120 मिमी पावसाची नोंद. शहरातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना तर काही ठिकाणी रस्ता खचल्याने वाहने अडकल्याच्या घटना समोर. पुढील काही तास हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा

Nashik Rain: रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत आले पुराचे पाणी

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील पहाटेपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ.  पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत आले पुराचे पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरे पाण्याच्या वेढ्यात 

jalgaon Rain: हतनुर धरणाचे 6 दरवाजे उघडले, 11,195 क्युसेक पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग सुरू

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 11 हजार 195 क्युसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गातही वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे तापी नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे तसेच प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ratnagiri Rain: गुहागर तालुक्यातील विसापूर पांगारी येथील रस्ता मुसळधार पावसामुळे खचला

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील विसापूर पांगारी येथील रस्ता मुसळधार पावसामुळे खचल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे गावात जाणारा हा मुख्य रस्ता तब्बल साडेतीन ते चार फूट खोल खचला असून, यामुळे गावात जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या मार्गावरील प्रवासाला मोठा धोका निर्माण झाला असून, याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. 

Raigad rain: रायगडमध्ये पुन्हा पुर परिस्थिती, महाड, नागोठणे शहरात शिरले पाणी

रायगड जिल्ह्यात पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर वाढत असल्याने पुराचा धोका वाढतो आहे.  सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या धोका पातळीवरून वाहत असून महाड, नागोठणे, रोहा शहरात पुराचे पाणी शिरले आहे.  रविवार आणि सोमवार असे दोन दिवस रायगडमध्ये पुर परिस्थिती होती काल मंगळवारी वातावरण सर्वसामान्य झाले होते आणि बुधवारी पहाटे पुन्हापासून पुन्हा रायगडमध्ये पुर परीस्थिती निर्माण झाली आहे.  जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि प्रमुख शहरांना पुराचा तडाखा बसला आहे यामुळे रायगडमधील जनजिवन विस्कळीत झाले आहे.

Nashik Rain: नाशिकच्या कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस

 नाशिकच्या कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कळवणच्या पश्चिमपट्ट्यात वडाळा-आमदर गावाला जोडणारा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे..रस्ता खचल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात. दादर, वरळी, महालक्ष्मी,मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस.

Pune News: माळीण फाट्यावर दरड कोसळली; आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प

आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोसळलेली दरड दोन घरांवर येऊन पडल्याने मोठा धोका निर्माण झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Pune News: घोड नदीच्या पाणीपातळीत वाढ, जुन्नर–घोडेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून वाहणारी घोड नदी दुथडी भरून वाहत असून चिंचोली येथील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर–घोडेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Pune Rain: भीमाशंकर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोड नदीला मोठा पूर

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भीमाशंकर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोड नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Nashik Rain: नाशिकच्या दिंडोरी रोड नायरा पेट्रोल पंपच्या मागे कॉलनी परिसरात गुडघाभर पाणी

नाशिकच्या दिंडोरी रोड नायरा पेट्रोल पंपच्या मागे कॉलनी परिसरात गुडघाभर पाणी भरलं. रामचंद्र नगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.  महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना एक तासापासून संपर्क साधूनही अद्याप कोणीही हजर नाही.  जोरदार पावसाने नाशिक महापालिकेच्या पावसळापूर्व कामांचा उडाला बोजवारा.

Nashik Rain: सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीत भरलं पाणी

सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीत पाणी भरलं.  मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये शिरले पाणी. पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर पाण्यात.  पाथर्डी रामदेवनगर पाण्यात.

मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची दमदार हजेरी

 नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची दमदार हजेरी.  सर्वाधिक पाऊस अंबोली 224 मिमी, इगतपुरी 205 मिमी, त्र्यंबक 148 मिमी, गौतमी-गोदावरी परिसर 121 मिमी पाऊस. 

 नाशिक शहरात गेल्या 12 तासात 120 मिमी पाऊस कोसळला. पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू. 

  • दारणा धरण 72.77% 
  • गंगापूर 53.34%
  • कश्यपी 40.93% 
  • कडवा 49.64%
  • करंजवण 23.07%
  • चणकापूर 60.20% 

गौतमी-गोदावरी धरणातून 1,280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4,732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.

Maharashtra Rain Alert: विदर्भात आठवडाभर पावसाची शक्यता

Pune Rain : खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे.  पुण्यातील एकता नगर सोसायटी परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली.  मुठा नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये घुसलं पाणी.  पुणे महानगरपालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर.

Pune Rain: लोणावळ्यात 48 तासांत 1290 मिमी पाऊस

पुणे शहर, उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारी सकाळपर्यंतही कायम राहिला. घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल एक हजार २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

त्यापैकी गेल्या २४ तासांतच ६२० मिलीमीटर पाऊस झाला.  दुसरीकडे पुणे शहरातही पावसाचा जोर कायम असून, जुलै महिन्यातील एकूण पर्जन्यमान ३०९.१ मिलीमीटर झाले. 

त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात २०१४ नंतरच्या काळात हा जुलै मधील चौथा सर्वाधिक पाऊस ठरला.

Show full article

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com