8 hours ago

एकनाथ खडसेंचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं रेव्ह पार्टी प्रकरणात नाव आल्यानंतर आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद होणार आहे. हडपसर येथील इंद्रप्रस्थ सोसायटी येथे सकाळी 10 वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आज उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Jul 29, 2025 22:34 (IST)

कल्याणमध्ये मनसेचा राडा, गेमझोनवाल्याला फटकवले

घरातून पैसे चोरून शाळा बंक करून लहान विद्यार्थी गेमजोन मध्ये जातात मनसे पदाधिकारी यांनी गेमजोन चालवणाऱ्याला विचारला जाब उलट सुलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी गेम झोन मधील कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात परत लहान मुलं स्कूल युनिफॉर्म मध्ये इथे दिसले तर गेमजोन तोडून टाकणार मनसेचा इशारा

Jul 29, 2025 21:06 (IST)

बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत

 राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या  पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे.

Jul 29, 2025 18:24 (IST)

Live Update : प्रांजल खेवलकर यांच्या सोबत अन्य 4 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  दोन महिलांना मात्न्यार यालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  अटकेत असलेल्या अन्य पाच आरोपींना  2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

Jul 29, 2025 16:45 (IST)

Live Update : राज्यसभेत जे पी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक वाद

खासदार जे पी नड्डा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना “मेंटल बॅलन्स गेला.” असल्याचं राज्यसभेत वक्तव्य केलं. त्यानंतर सभागृहात विरोध बाकांवरून गदारोळ करण्यात आला. जे पी नड्डा यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांकडून केली. खरगे म्हणाले माफी मागितल्या शिवाय आम्ही सोडणार नाही.  त्यावर जे पी नड्डा यांनी दिलगीरी व्यक्त केली.  जे पी नड्डा म्हणाले, खरगे भावनांमध्ये तुम्ही वाहत गेला आणि पंतप्रधान पदाचा आब तुम्हाला राखता आला नाही.

Advertisement
Jul 29, 2025 16:21 (IST)

विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिचे उद्या रात्री नागपुरात आगमन

बुधवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी दिव्या देशमुख हिचे तिच्या आईसह नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. यावेळी भारतीय चेस पदाधिकारी देव पटेल आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन चे प्रवीण ठिपसे यांच्या नेतृत्वात स्वागत केले जाणार आहे. यावेळी तिचा छोटेखानी सत्कार देखील करण्याचा चेस प्रेमींचा मानस आहे.

Jul 29, 2025 15:48 (IST)

Live Update : काँग्रेसनेते सुरेश वरपूरकर यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसनेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूरकर यांनी भाजपमध्ये अखेर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

Advertisement
Jul 29, 2025 12:15 (IST)

Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे - अजित पवार

पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Jul 29, 2025 11:58 (IST)

Live Update : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक संदर्भात महत्वाची बैठक

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक संदर्भात महत्वाची बैठक 

टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीची बैठक 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक 

टिळक रोड वरील विसर्जन मिरवणुकी संदर्भात नियोजन करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळांची बैठक 

दरवर्षी पुणे शहरातील विसर्जन मिरवणुक ही अनेक काळ रेंगाळते 

याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता 

विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ कमी करण्याबाबत बैठकीत होणार चर्चा

Advertisement
Jul 29, 2025 11:32 (IST)

Live Update : भद्रनाग स्वामी मंदिरात उसळली भक्तांची गर्दी

नागपंचमी च्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात असलेल्या भद्रनाग स्वामी  मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी  झाली आहे. विदर्भा सह मध्यप्रदेशातील भाविक दर्शनासाठी भद्रावतीत येत असतात. नागमंदिरात नागपंचमी व महाशिवरात्री निमित्त एक दिवसाची यात्रा भरते. भाविकांना सकाळी ६ वाजता पासून दर्शनासाठी मंदिराचे दार उघडत प्रवेश देण्यात आले. नागनाथ स्वामींचे दर्शन घेण्याकरिता विदर्भ  तसेच मध्यप्रदेशातील संसर, पांढुर्णा येथील भाविक मोठय़ा संख्येने दाखल झालेले आहे या मुळे  शहरातील संपूर्ण रस्ते गर्दीने फुललेले आहे प्रत्येकास सुव्यवस्थीत  पणे  दर्शन घेता येण्यासाठी विश्वस्त मंडळासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्शनासाठी भाविकांच्या मंदिरा बाहेर पर्यंत रांगा लागल्या आहेत. 

Jul 29, 2025 10:57 (IST)

Live Update : पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात

पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात

या भागातील जवळपास 90टक्के भात लावणी पूर्ण 

जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच भात लावणीसाठी समाधान कारक पाऊस झाल्यानं, जुलैच्या शेवटापर्यंत भात लावणीची कामं वेळेवर पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू

भात लावणी करताना शेतकऱ्यांकडून पारंपारिक भलरीची गीत गायली जात जातं असल्यानं, ग्रामीण भागात ठिकठिकाणी भलरीचे सूर पडतायत कानावर

Jul 29, 2025 09:58 (IST)

Live Update : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

आज किंवा उद्या यादी येण्याची शक्यता

नावे अंतिम झाल्याची माहिती

सर्वसमावेशक यादी असणार

यामध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधला जाईल

हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष झाल्यानंतर 6 महिन्यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा होणार

Jul 29, 2025 09:42 (IST)

Live Update : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच; मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच 

खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ

पुण्यात खडकवासला धरणातून २८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

पुण्यातील मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली

पुण्यात पावसाची विश्रांती मात्र धरण पाणलोट क्षेत्रात संतधार सुरू

नदी पात्रातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद

भिडे पुलासह नदीपात्रात पाणीच पाणी 

मुळा आणि मुठा नदीपात्रातल्या सर्व रस्त्यांवर पाणी

Jul 29, 2025 08:43 (IST)

Live Update : पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये शिरलं पाणी

पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंग मध्ये शिरले पाणी

मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी

पुण्यातील एकता नगर भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी

खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे

नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे

Jul 29, 2025 07:56 (IST)

Live Update : उमरगा तालुक्यातील डाळिंब येथे पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

उमरगा तालुक्यातील डाळिंब येथे पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

एक आठ वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा, परिसरात हळहळ व्यक्त 

सुशांत चव्हाण आणि प्रमोद  चव्हाण असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे

 पाचच्या सुमारास शिवाजीनगर जवळील पांजर तलावात आढळून आले दोघांचे मृतदेह

Jul 29, 2025 07:43 (IST)

Live Update : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आज निश्चित, राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राजीनामा घेतला जातो का याकडे लक्ष

विधानसभा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर प्रचंड टीका होत होत होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या विधानानंतर ही टीका आणखीनच वाढली. यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी त्यांचा राजीनामा घेतला जाणार हे जवळपास निश्चित मानले जात असून दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीपर्यंत हा निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं असेल

Jul 29, 2025 07:42 (IST)

Live Update : पुण्यातील खडकवासलातून 28 हजार क्युसेक वेगानं विसर्ग

पुण्यातील खडकवासलातून 28 हजार क्युसेक वेगानं विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Topics mentioned in this article