जाहिरात

Maharashtra Rain: 24 तासात 10 बळी, धोका अद्याप टळलेला नाही; पुण्याला अलर्ट, मुंबईत कशी असेल स्थिती? 

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात सुरू असलेल्या तुफान पावसाने 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Rain: 24 तासात 10 बळी, धोका अद्याप टळलेला नाही; पुण्याला अलर्ट, मुंबईत कशी असेल स्थिती? 

Maharashtra Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई-पुण्यात तर सर्वसामान्यांची दैना झाली. मराठवाडा आणि कोकणातही तुफान पाऊस सुरू होता. यामुळे नद्यांना पूर आला होता. मुंबई-पुण्यात तर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान आजही राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Mumbai-Pune weather News)

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि मुंबई उपनगराला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाची रिमझिम सुरू असेल. 

पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Maharashtra Rain Update : मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू

नक्की वाचा - Maharashtra Rain Update : मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू

24 तासात 10 बळी

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात सुरू असलेल्या तुफान पावसाने 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नांदेडमध्ये पूरात वाहून गेलेले चार जण, मुंबईत भिंड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू  आणि सिंधुदुर्गात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. 
 

कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली

सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत पातळी 40 :3 फुटावर आहे. आज दिवसभरात 8 फुटाने पाणी पातळी वाढली  आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित झाले आहेत तब्बल 617  लोकांचा यामध्ये सहभाग आहे.  आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. सकाळ पर्यंत आणखी पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे.

सततच्या पावसामुळे तापी नदीला मोठा पूर

पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे 41 पैकी 24 दरवाजे उघडल्याने तापी नदीला पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेज मधून तापी नदीत 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकाशा आणि सारंगखेडा तापी नदीच्या काठावरील 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रकाशा बॅरेजचे 6 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन करण्यात आलं आहे. धरणातून तापी नदीत पत्रात 1 लाख 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com