पावसामुळे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठा गोंधळ निर्माण केला आहे. ज्यामुळे ऑपरेशन थिएटर जलमय झालं. रुग्णालयातील अनेक विभागात पावसाचं पाणी शिरलं. या परिस्थितीमुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पाण्याची काढणी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. या परिस्थितीवर मात करून रुग्णालयाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, आतापर्यंत 19 रुग्णांची नोंद
नवी मुंबईत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असून, आज नवी मुंबईत चार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांकडून अटक
शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांकडून अटक
स्वतःवर बनावट फायरिंग प्रकरणी वारजे पोलिसांकडून निलेश घारेला अटक
काही दिवसांपूर्वी त्याच्या कारवर फायरिंग झाल्याचा बनाव निलेश घारेने रचला होता
पण पोलिसांच्या तपासात निलेश घारे यांनी स्वतःवरच फायरिंग करून घेतल्याचं झालं होतं उघड
याच प्रकरणी आता निलेश घारे याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे
फायरिंग करणाऱ्या मुख्य आरोपीसोबत स्वतः निलेश घारे यांनी रचला होता कट
कोल्हापुरच्या इंगळी गावात भूस्खलन,16 घरांना धोका
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलयं. त्यामुळे कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन झाल्याचं समोर आलयं. इंगळी गावातील सहामोट विहिरीच्या तटबंदीचं भूस्खलन होवून रस्ता खचल्याने 16 घरांना धोका निर्माण झालायं. दरम्यान प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी देखील या परिसरात भूस्खलन होवून 8 दुकानांच मोठं नुकसान झालं होतं.
148 कोटी खर्चाच्या अष्टविनायक विकास आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाबळेश्वरात मुसळधार पाऊस
महाबळेश्वरात मुसळधार पाऊस
मान्सून महाबळेश्वरात दाखल झाल्याची परिस्थिती
रस्त्यावर पाणीच पाणी
गटराचा छोट्या साईजमुळे पाणी रस्त्यावर साठले
पर्यटक वैतागले
Live Update : हगवणे कुटुंबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
सोसाट्याचा वाऱ्यासह नवी मुंबईत पावसाला सुरुवात
नवी मुंबईत पावसाला सुरुवात
सोसाट्याचा वाऱ्यासह नवी मुंबईत पावसाला सुरुवात.
काल दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबईत पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
खरीप पिकांसाठी एम एस पी जाहीर, केंद्र सरकारची मोठी घोषणा
खरीप पिकांसाठी एम एस पी जाहीर करण्यात आली आहे. त्यात केंद्र सरकारची मोठी घोषणा केली आहे. एमएसपी देण्यासाठी सरकारने दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा समजली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Live Update : मुंबईत पुन्हा धो धो; पुढील 3 तास 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Live Update : मुंबईत पुन्हा धो धो; पुढील 3 तास 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
Live Update : कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
दोन दिवसापूर्वी एका महिलेचा झाला होता मृत्यू
आज एका ६६ वर्यीय वयोवृद्धाचा मृत्यू
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे एकूण ५ रुग्ण
एकाला डिस्चार्ज मिळाला तर दोघांवर उपचार सुरु
Live Update : लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाकडून फॉर्च्युनर गाडी भेट
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणीच्या राणीसावरगाव येथील ओबीसी बांधवांनी महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर कार ही गिफ्ट दिली आहे आज राणीसावरगाव येथील रेणुका मातेच्या मंदिरासमोर ही गाडी भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना हाकेंनी समाजाच ऋण व्यक्त केलं
Live Update : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 7 जण जखमी
छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या कारचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे दुभाजकाला धडकून अपघात घडला असून यात कारमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहे.
Live Update : मंडणगडमध्ये मंडळ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, फेरफार नोंदीसाठी 30 हजारांची घेतली लाच
मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व मंडणगड उपकोषागार कार्यालय येथील शिपाई मारुती भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. काल सायंकाळच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय आवारात ही कारवाही करण्यात आली. ही सापळा ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..
Live Update : पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा, टँकरची संख्या 15 टक्क्यांनी घटली
पुण्यात टँकरची संख्या १५ टक्क्यांनी घटली
पुणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येत घट
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा
शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता
त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती
महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या
मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाची माहिती
मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती. आता ही मागणी १५ टक्के कमी झाल्याची माहिती
Live Update : मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
वादळी वारे आणि मुसळधार पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या घराचे छत गेले उडून तर भिंत ही कोसळली
साखरेवाडी गावात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्या
तर उन्हाळी कांदा, सोयाबीन, उशिरा पेरणी झालेल्या ज्वारी सारख्या पिकांचे ही नुकसान
दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी येथील ग्रामस्थ आता या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रतीक्षा करतायत
Live Update : पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
पुणे शहरात गोळीबाराच्या घटनेत वाढ
शहरात गेल्या 5 महिन्यात 6 वेळेस गोळीबार
तर वर्षभरात पुणे शहरात 21 ठिकाणी गोळीबाराच्या घटना
पुणे पोलीस काय ॲक्शन घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष
Live Update : कोल्हापुरात धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार आहे. काल दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली होती. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अधून-मधून रिपरिप सुरूच आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी 47 टक्के, तर तुळशी धरण 52 टक्के भरले आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपतळीत वाढ झाली आहे. सध्या नदीची 19 फुटच्या वर आहे. जिल्ह्यातले 12 बंधारे सध्या पाण्याखाली आहे. घरांच्या पडझड, व्यवसायांवर परिणाम, वाहतूक खोळंबा, असं लाखांच नुकसान झालं. या पावसानं शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. सूर्यफूल, भुईमूग या पिकांच मोठं नुकसान झालंय.
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्वतयारीसंबंधी आज बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्वतयारीसंबंधी आज बैठक
- सर्व 10 मानाच्या पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार
- दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर होणार बैठक
- भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची माहिती
Live Update : नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, बळीराजा लागला शेती मशागतीच्या कामाला
नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने झाल्याने बळीराजा खरिपाच्या हंगामासाठी तयारीला लागला असून खरीप पेरण्यांसाठी शेती मशागतींच्या कामांना वेग आला तर.ज्या ठिकाणी शेतात पेरणी योग्य ओल तयार झाली त्या ठिकाणी आता मका टाकण्याचे काम सुरू झाले तर खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबगही सुरू झाली आहे.