
Maharashtra Rain News: मुंबईमध्ये दहिहंंडी, गणेशोत्सवाची लगबग सुरु असतानाच पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई शहर, उपगनरामध्ये शुक्रवारपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी दिवसभर कोसळत होता. या धुवांधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळाले.
पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस
शुक्रवार ते शनिवार या २४ तासात मुंबईमध्ये पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी 8.30 पासून सुरु झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी 8.30 पर्यंत सुरुच होता. या २४ तासात 244.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या मागील पाच वर्षातील सर्वाधिक पाऊस होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये 268.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पाच वर्षांनी २४ तासात सर्वाधिक पाऊस कोसळला.
Mumbai Rain Update: पावसाचा लोकल सेवेवर परिणाम! मध्य रेल्वे 15-20 मिनिटे उशिरा
पावसाच्या या तुफान बॅटिंगमुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव भरुन ओसंडून वाहू लागला आहे. तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन आता मिटलं आहे.
धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा! (Mumbai Dam Water Level)
त्याचबरोबर मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठाही ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधून पाणी पुरवले जाते. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये २४ लाख ४ हजार ९८१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी हा पाणीसाठा ८.५९ टक्के होता. आता या सातही धरणांमध्ये मिळून ९०.१६ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. यापैकी, मोडकसागर धरण ८८.४९ टक्के, तानसा ९८.८ टक्के, मध्य वैतरणा ९६.२६ टक्के, भातसा ८८.६५ टक्के, वहार ८७ टक्के, तुळशी २५.८८ टक्के आणि ऊध्वं वैतरणा धरणाचा पाणीसाठा ८५ .८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार; 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट
राज्यात पावसाचे सहा बळी
दरम्यान, मुंबई, पुण्यासह राज्यभरात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटनाही घडल्या असून आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात विविध घटनांत चौघांचा बळी गेला, तर मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी घरांची पडझ़ड, शेतीमालाचे नुकसान तसेच पशुधनही दगावल्याचं समोर आले आहे. पुढील चार तास पावसाचा जोर असाच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world