जाहिरात
6 hours ago

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates: गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. आज मुंबई, पुण्यासह ,ठाणे, पालघर,रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आळा आहे.  आज सकाळपासून मुंबई शहरात ढगाळ वातावरण असून पावसाची अधूनमधून रिपरिप सुरु आहे. सध्या रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचे तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. 

Rain LIVE Updates: वर्ध्याच्या बोर नदीत बुडून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

वर्ध्याच्या सुकळी (स्टेशन) जवळून वाहणाऱ्या बोर नदीत दुर्दैवी घटना, १५ वर्षीय शौर्य निलेश टेंभरे या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू.

पोहण्यासाठी गेलेल्या शौर्यचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडून करुण अंत. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली… सामाजिक कार्यकर्ते  आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी   बाहेर काढण्यात यश आले.

LIVE Updates: शहीद भगतसिंगाचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार

महान क्रांतिकारक शाहिद भगतसिंग व इतर शहिदांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला ज्ञात असावे यासाठी आगामी काळात शहीद भगतसिंग व इतर शहिदांचा जीवनपटाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या जउळके येथे जाट  बावीसी समाजातर्फे आयोजित शहीद शहीद भगतसिंग यांच्या 118 व्या जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केली.यावेळी देशभरातील जाट समाजातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील हजारो जाट  समाज बांधव उपस्थित होते.यावेळी शहीद भगतसिंग यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र जाट समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

Rain Live Update: सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

पारंपारिक शेतीला देऊन आधुनिक पद्धतीने पपई लागवड केलेल्या वाकडीतील कोल्हे कुटुंबीयांना सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जोरदार फटका बसलाय. कोल्हे यांनी आपल्या साडेचार एकरात पपईची लागवड केली होती. फळही चांगल आले पण जिल्ह्यात सातत्याने पडत असलेला पाऊस अतिवृष्टी आणि या दुरुस्ती मुळे शेतात साचलेलं पाणी यामुळे या पपईच्या बागेचं पूर्त नुकसान होत आहे. पाणी पिवळी पडत आहेत, फळांवर डाग पडतात,  शेतातील साचलेलं पाणी निघत नसल्याने खोड कुजून जात आहेत

Rain LIVE Update: उजनीतून भीमा पात्रात विसर्ग वाढवला

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून भीमा नदी पात्रात उजनी धरणातून 86 हजार 600 क्युसेकने विसर्ग केला जातोय. उजनी धर्माच्या 16 दरवाजातून हा विसर्ग केला जातोय. काल कमी करण्यात आलेल्या निसर्गात रात्रीपासून पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे.

Sangali Rain LIVE Updates: सांगोल्यातील 30 हजार हेक्टरवरील डाळिंबाचे मोठे नुकसान

डाळिंबाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असणाऱ्या सांगोला तालुक्यातील 30 हजार हेक्टर वरील डाळिंबाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो कोटींचा आर्थिक फटका सांगोला तालुक्याला बसलाय. डाळिंबाच्या शेतीवर सांगोला तालुक्याचा अर्थचक्र अवलंबून आहे. एक्सपोर्ट कॉलिटीचा डाळिंब सगळं पाण्यात गेले. मात्र पावसाच्या पाण्यामुळे सांगोल्याचा अर्थचक्रच आता थांबले गेले. 

Mumbai Rain LIVE Update: जायकवाडी धरणातून विसर्ग

आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी २२:४५ ते २३:०० या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्र १० ते २७ असे एकूण १८ (नियमीत द्वार) दरवाजे ०.५ फूट उचलून ११.५ फूट पर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदी पात्रात ९४३२ क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात येईल.

Mumbai Rain LIVE Update: मुंबई,ठाणे, पालघर,रायगड मध्ये आज ऑरेंज अलर्ट

मुंबई,ठाणे, पालघर,रायगड मध्ये आज ऑरेंज अलर्ट...तूर्तास मुंबई शहरात ढगाळ वातावरण पावसाची अधून मधून रिपरिप... सध्या रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुरळीत...

Listen to the latest songs, only on JioSaavn.com