Maharashtra SSC Admit Card 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 19 जानेवारी रोजी एसएससी (इयत्ता 10वी) हॉल तिकीट 2026 जाहीर केले आहे. महाराष्ट्र एसएससी लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडणार आहे. mahahsscboard.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना वितरित केले जाऊ शकते. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. शाळेकडून दिलेल्या हॉल तिकीटवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का असेल, याची खात्री विद्यार्थ्यांनी करुन घ्यावी.
इयत्ता दहावीचे हॉल तिकीट 2026 कसे डाउनलोड करायचे| Steps To Download Maharashtra SSC Hall Ticket 2026
1. अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in ला भेट द्या
2. Latest Notifications सेक्शनमधील SSC या लिंकवर क्लिक करा
3. खाली स्क्रोल करून "Login for Institute" हा पर्याय निवडा
4. SSC सेक्शनखालील "Sign in Here" वर क्लिक करा
5. युजरनेम (Username) आणि पासवर्ड सबमिट करा
6. रोल नंबरची श्रेणी निवडा आणि एसएससी हॉल तिकीट डाउनलोड करा
7. हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा
Maharashtra SSC Hall Ticket 2026: त्रुटी (एरर) असल्यास काय करावे (Maharashtra SSC Hall Ticket 2026: What To Do In Case Of An Error)
- विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव किंवा जन्मतारीख यासारख्या वैयक्तिक माहितीत काही चूक असल्यास संबंधित शाळेने निर्धारित शुल्क भरून "Application Correction" लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्ती अर्ज सादर करावा.
- विभागीय मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्त केलेले महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट "Correction Admit Card" या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.
- विषय किंवा शिक्षणाच्या माध्यमाशी संबंधित बदल थेट विभागीय मंडळाकडे कळवावे.
- महाराष्ट्र एसएससी प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास शाळेने योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी तसेच शिक्का मारून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world