जाहिरात

10th-12th Exam : कॉपीसाठी चॅट जीपीटीची मदत, शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता; राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात उघड झालेल्या कॉपी प्रकरणांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठी कारवाई केली आहे.

10th-12th Exam : कॉपीसाठी चॅट जीपीटीची मदत, शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता; राज्य शिक्षण मंडळाची मोठी कारवाई 
AI Image

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

10th-12th Exam Copy Case : दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात उघड झालेल्या कॉपी प्रकरणांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठी कारवाई केली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड झालेल्या मास कॉपीच्या घटनांनंतर राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ८१ शिक्षक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर १० डमी विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. 

८१ कर्मचाऱ्यांचं निलंबन...

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. परीक्षा केंद्रांवर बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार पुराव्यासह समोर आले. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलत विविध जिल्ह्यांतील एकूण ८१ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून तब्बल १७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातही पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका केंद्रावर तर विद्यार्थ्यांना चॅट जीपीटीच्या मदतीने कॉपी करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणात तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

नक्की वाचा - Pune News : अजित पवारांनी पुण्यासाठी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण; त्यांच्याच नावाने ओळखला जाणार

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरदरम्यान तब्बल १० डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांवर आणि जबाबदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील कॉपी प्रकरणांवर शिक्षण मंडळाने कडक कारवाईचा बडगा उगारल्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत मोठा संदेश दिला गेला आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com