Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या १७ पैकी १६ जागा जिंकत महायुतीने गुलाल उधळला आहे तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी बाजी मारत सर्वांना धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या १७ पैकी सहा जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज लागलेल्या ११ जागांपैकी सर्व जागांवर भाजपने गुलाल उधळला आहे. महायुतीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे.
MLC Result LIVE: नाशिकमध्ये सर्वात मोठा उलटफेर,!अपक्ष गोकुळ गीतेंचा धमाका, वाचा लाईव्ह अपडेट्स
आजच्या 11 मतदारसंघातील लढतीत कुणाचा विजय ? कुणाचा पराभव ?
- नांदेड : अमर राजूरकर (भाजप, विजयी) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस) (पराभव)
- नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप, विजयी) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस) (पराभव)
- भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप, विजयी) नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) (पराभव)
- छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप, विजयी)विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना) (पराभव)
- परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) (विजय) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) (पराभव) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष) (पराभव)
- जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप, विजय) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना)
- सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप, विजयी) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) (पराभव)
- नाशिक : गोकुळ गिते (अपक्ष) (विजयी) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना) (पराभव)
- सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप, विजयी) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) (पराभव)
- धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप, विजयी) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
- अमरावती : प्रवीण पोटे (भाजप, विजयी)हर्षदीप देशमुख (काँग्रेस) (पराभव) विरुद्ध विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित) (पराभव)
बिनविरोध विजयी उमेदवार
- वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
- पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
- ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
- यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
- अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे, भाजप