Mumbai Local Conversion Claim: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धर्मांतराशी संबंधित टोळ्या (नेटवर्क) सक्रिय असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. तसेच रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारकडे संबंधित लोकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रेल्वे नेटवर्कचा, विशेषतः पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एसी ट्रेनचा वापर ख्रिश्चन मिशनरी आणि कथित भोंदू बाबांकडून केला जात आहे, असा या संघटनेने रविवारी (21 जून) जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे केला आहे.
"कॅन्सर बरा करण्याचा दावा"
निवेदनात असेही म्हटले गेले आहे की, प्रार्थनेद्वारे कॅन्सर (कर्करोग) बरा करण्याचा दावा करणाऱ्या ख्रिश्चन "चंगाई सभांचा" प्रचार करून प्रवाशांना अशा प्रकारच्या पोस्टर्सच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. यासोबतच "बंगाली बाबांच्या" दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही लावल्या जात आहेत.
(नक्की वाचा : Dombivli News: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, डोंबिवलीत मनसे आक्रमक; शहरात तणाव)
गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी
या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एक निवेदन सोपवल्याचे समितीने सांगितले. अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर आणि अशा प्रकारचे कथित दिशाभूल करणारे पोस्टर्स तसेच जाहिराती छापणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी केली आहे.
(Content Source: PTI)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world