Maharashtra Assembly Election Exit Poll Result: दोन महिन्यांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकांचा धुरळा आज शांत झाला. राज्यातील 288 जागांसाठी मतदान पार पडले. मतदान पार पडल्यानंतर आता 23 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पुर्वी विधानसभा निकालाचा एक्झिट पोल आता समोर आला आहे. विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये राज्यात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
NDTV पोल ऑफ पोल्सचा अंदाज काय?
विधानसभेचे मतदान झाल्यानंतर एनडीटीव्ही मराठीने पोल ऑफ पोल्स म्हणजेच विधानसभा निकालाचा एक्झिट पोल जाहीर केला. एनडीव्ही मराठीच्या या चर्चासत्रात राज्यातील ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषकांनी सहभाग घेत आपला अंदाज व्यक्त केला आहे. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, मिलींद बल्लाळ, प्रकाश पवार हे यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीच्या बाजूने कौल जात असल्याचे दिसत आहे.
1. अभय देशपांडे:
भाजप: 76, 82
शिवसेना शिंदे गट: 38-42
अजित पवार: 22-25
मनसे: 2
काँग्रेस: 55-61
उद्धव ठाकरे गट: 29-32
शरद पवार गट: 36-40
इतर: 16-18
महायुती:1 39-128
महाविकास आघाडी: 128- 136
2. मिलिंद बल्लाळ
भाजप: 75 -82
शिवसेना शिंदे गट:35-40
अजित पवार गट: 15-18
मनसे:5- 8
काँग्रेस 60, 70
उद्धव ठाकरे गट: 35, 40
शरद पवार गट: 30- 35
इतर: 12-15
महायुती: 125- 135
महाविकास आघाडी: 130 t0 135
3. प्रकाश पवार
भाजप: 75
शिवसेना शिंदे गट: 30
अजित पवार: 20
मनसे: 1,2
काँग्रेस: 50
उद्धव ठाकरे गट: 45
शरद पवार गट: 45
इतर: 20, 22
महायुती: 125
महाविकास आघाडी: 140
नक्की वाचा: शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंच्या गाडीवर गोळीबार
इलेक्टोरल एजचा अंदाज - महायुती - 121, मविआ- 150, अपक्ष - 20
पोल डायरीचा अंदाज -122-176, मविआ - 69-121, इतर 12-19
चाणक्य स्ट्रॅटजीसचा अंदाज - महायुती -152-160 मविआ - 130-138 इतर- 6-8
मॅट्रिझचा अंदाज - महायुती 150-170, मविआ -110-130 अन्य 8-10
पीपल्स पल्सचा अंदाज - महायुती 175-195 मविआ-85-112 अपक्ष- 7-12
महत्वाची बातमी: लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट! राजकीय राडे, मारहाणीच्या घटना, कुठे काय घडलं?