राज्यभरात लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे मतदारांमध्ये आपला हक्क बजावण्यासाठी उत्साह पाहायला मिळत असतानाच अनेक ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्याही घटना समोर येत आहेत. कुठे इव्हीएममध्ये बिघाड, कुठे राजकीय राडा तर कुठे बोगस मतदानाच्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राज्यात कुठे काय घडलं?
राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, त्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या. कोल्हापुरातील विक्रम हायस्कूल येथील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची तक्रार समोर आली होती. तांत्रिक बिघाडामुळे हे मशीन बंद पडल्याचे सांगण्यात होते.
नक्की वाचा: Solapur Politics : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे भाजपची बी टीम; ठाकरे गटाचा नेता भडकला
कोल्हापुरप्रमाणे छत्रपती संभाजीनगरसह अकोल्यातील पूर्व विधानसभा मधील 221 मतदान केंद्रांवर तब्बल 40 मिनिट ईव्हीएम मशीन बंद होती. तसेच धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. पालघरच्या बोईसर विधानसभा मतदार संघात विजपुरवाठा खंडित झाल्याने मतदान अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
दोन तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने मतदान केंद्रांवर अंधार झाला. मतदान केंद्रावर दिवे आणि पंखे बंद असल्याने कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. तसेच जळगाव जिल्ह्यात सकाळी 7 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत 20 ईव्हीएममध्ये बिघाड झाला.व्हीव्ही पॅड , कंट्रोल युनिट अशा एकूण 20 मशीन यावेळी बदलण्यात आल्या.
महत्वाची बातमी: Beed Vidhan Sabha : उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू, बीडमधील मन सुन्न करणारी घटना
राजकीय राडे
नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या समर्थकाला 'तुझा मर्डर फिक्स अशी धमकी दिली. दुसरीकडे वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे सर यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
बीडमध्ये परळी विधानसभा मतदार संघात आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली.यांचे रूपांतर पुढे हाणामारी मध्ये गेले सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली.
मुंबईमधील कोपरखैरणे सेक्टर ४ मध्ये माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांसोबत मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात शंकर मोरे यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीडमध्ये उमेदवाराचा मृत्यू
मतदानाला काही मिनिटे शिल्लक असतानाच बीड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world